’वेचित चाललो...’ वर नवीन:   

हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१३

नासाचे अभंग

(थोडी गंमत. काही दिवसांपूर्वी काही मित्रांशी गप्पा मारता मारता 'नासा म्हणे' ची आठवण आली नि अचानक हे असं झालं.)

डावीकडे भारत,
उजवीकडे लंका
सेतू मधोमध
नासा म्हणे

गणकी श्रेष्ठ भाषा,
गीर्वाण ही थोर
जळो भूतकाळ
नासा म्हणे

किरणोत्सारी भेव
नाही मुळी वाव
गोमयाच्या आड
नासा म्हणे

जगी या शिक्षण
श्रेष्ठ एका स्थानी
हिंदुस्थानी आज
नासा म्हणे

भारती थोरियम
पडले हो विपुल
आणा ते ढापून
नासा म्हणे

ऐशा नासा नरे
ररा झाला त्रस्त
पोचे वॉशिंग्टनी
करे रुजवात

कोण हा रमत्या?
नि कोणता भारत?
जाणतो संस्थान!
नासा म्हणे

हाकलला ररा
परतुनी ये घरा
नका काही सांगू
नासा म्हणे

परि ऐसे देखो
संतुष्ट 'हा' फार
भली मोडे खोड
नासा म्हणे

श्रेष्ठ आमच्या देशा
कोसे* हा फार
सूर्या शनिश्वर
नासा म्हणे

ररा म्हणे आता
गांजलो मी फार
नको व्यर्थ चर्चा
नासा म्हणे

ररा झाला निवांत
मिळे थोडी उसंत
इतक्यात कानी येई
'नासा म्हणे'

-रमताराम

* हा मटामराठीचा चलाखीने केलेला वापर आहे हे सुज्ञांच्या ध्यानी आले असेलच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा