शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

गणपत वाणी...

आद्य विडंबनाचार्य मा. केशवकुमार आणि आमचे विडंबन गुरु मा. केशवसुमार ऊर्फAniruddha Abhyankar यांच्या कृपेने...

---

गणपत वाणी विडी पिताना
अंगावरती घेई शॉल
म्हणायचा अन् मनाशीच की
या जागेवर बांधिन मॉल;

फैलावुनि मग दोन्ही हात
आणि दावुनि एक तर्जनी
भिरकावुनि ती अशीच द्यायचा
सवयीने मग भलती थाप


मतदाराची कदर न राखणे
वीज, पाणी अन् अन्न महाग
डिझेल अन् पेट्रोल इराणी
विकून बसणे टका गिणित;

अतर्क्य स्वप्नांचा धूर सोडणे
कधी बुलेटचा कधी गंगेचा
झगमग जळत्या मॅडिसनी
वाचित गाथा बापूजींचा.

कोट पेहरुनी सुवर्णवर्खी
किंमती फक्त शत लक्षांचा
जमाव सोबतीस भाटांचा
अशी भाषणे झोडित होता

कांडे गणपत वाण्याने ज्या
तोंडापुरती ऐशी केली
अंध भाटांच्या मनामध्ये ती
सदैव रुचली आणिक रुतली.

शॉली गणपत वाण्याने ऐशा
पेहरुनि नित्य फेकुन दिधल्या,
अंध भाटांच्या मनामधी त्या
नाही दिसल्या नाही रुजल्या

गणपत वाणी विडी फाफडा
पिता-खाता शेफारुन गेला;
एक न मागता फटके दोन
जनता देई मग त्याला!

- केशवकलाल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा