’वेचित चाललो...’ वर नवीन:   

हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

बुधवार, ११ जुलै, २०१८

सुनेचा स्वैपाक (अर्थात एका नव-सासूची कैफियत)

(एक अ-भावगीत*)

नाही लसणाची फोडणी
नाही जवसाची चटणी
कढी फुळकवणीचे पाणी ||

कशाला न चव-ढव
कशाला ही उठाठेव
झाले हो भाताचे दगड ||

आम्हा आहे चाल-रीत
आम्ही वापरू ग हिंग
जैसा श्रीखंडात रंग ||

अन्नातला भाजीपाला
कच्चा राहिला सगळा
धन्य स्वैपाकाची कळा ||

- बाकीबाई बोरकर (एक नव-सासू)
---

*अभाव-गीत म्हटलं तरी चालेल.

हाच मीटर ढापून बाकीबाब बोरकरांनी नंतर ’नाही पुण्याची मोजणी...’ हे भावगीत लिहिले:
https://www.aathavanitli-gani.com/Song/Nahi_Punyachi_Mojani

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा