’वेचित चाललो...’ वर नवीन:   

हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

रविवार, ९ सप्टेंबर, २०१८

विवेकवाद आणि धर्म

 नुकत्याच एका लेखात  'हिंदू धर्माचा पाया बुद्धिप्रामाण्यवाद आहे' हे वाक्य वाचून  करमणूक झाली. ज्या धर्माची चौकटही निश्चित नाही तिथे लेखकाला त्याचा पाया कुठून दिसला?

आणि मुख्य म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद (हा शब्द आधी चुकीचा आहे, पण ते जाऊ द्या) आणि धर्म या संकल्पनाच परस्परविरोधी आहेत. बुद्धी किंवा खरंतर विवेक हा 'ज्याचा त्याचा विवेक' या अर्थाने वापरलेला शब्द आहे, त्यात सापेक्षता अनुस्यूत आहे. धर्म तयार चौकट देतो आणि त्यात राहण्याचा आग्रह धरतो, त्याआधारे गटाची उभारणी करतो. (जगातील बहुतेक संघटित धर्मांची उभारणी ही राजकीय सत्तेच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होते असेही काही समाजशास्त्रज्ञ मानतात) यात वैयक्तिक मताला स्थानच नाही. त्यात एक महत्तम साधारण विभाजक हा अपरिवर्तनीय असतो, त्यात तडजोड होऊ शकत नाही. त्यामुळे वैयक्तिक मताला, सापेक्षतेला संधीच नाही. 

याउलट विवेकवाद हा फारतर विचारांची परिमाणे देईल, विचार हा त्या त्या व्यक्तीने स्वतःच विकसित करायचा असतो. एखाद्याचा विचार तुम्हाला पटेल नि तुम्ही स्वीकारालही, पण ती पटण्याची, स्वीकारण्याची कृती कोणत्याही दबावाखाली केलेली नसेल, स्वत:च्या बुद्धीने निश्चित केलेल्या निकषांआधारे केलेली निवड असेल. केवळ एखादी चौकट जन्मजात, आयती मिळाली म्हणून त्याभोवती अस्मितेची तटबंदी उभारून तो किल्ला असल्याची केलेली बतावणी नसेल ती.

विवेकवादी विचार स्वीकारणारा प्रत्येक जण विवेकवादीच असेल असे म्हणता येणार नाही. कदाचित त्याच्या दृष्टीने तो विवेकवादी विचार हाच धर्म बनून गेला असेल अशी शक्यताही आहे.

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा