किंबहुना खरे काय, खोटे काय आणि घटना आणि सहभागी व्यक्तींच्या मूल्यमापनातील तफावत काय, या तीनही गोष्टी त्यात वेळी उपस्थित असलेल्यांच्याच खर्या अर्थाने महत्वाच्या. इतरांच्या पूर्वग्रहाचा, स्वत:च्याच इमेज बिल्डिंगच्या आवरणातून आलेल्या. त्याबाबत जागृती व्हावी, विचारांत बदल व्हावा हा आग्रह धरणारे प्रामाणिक असतात, पण पार्ट्या पाडून दोषारोपाचे खेळ खेळत बसणारे विकृत असतात. त्यांना मी काडीचे महत्व देत नाही. पण त्याचबरोबर जबाबदारीने समजून घेऊ पाहणार्याच्या निष्कर्ष वा मूल्यमापन प्रक्रियेत येऊ शकणारे संभाव्य चकवे मात्र नक्की ध्यानात घ्यायला हवेत.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांची कन्या पॅटी डेविस हिलाही तरुणपणी व्हाईट कॉलर बलात्काराला सामोरे जावे लागले. तेव्हा तर सोडाच पण पुढे रीगन राष्ट्राध्यक्ष झाल्यावरही तिने याबाबत वाच्यता केली नाही. अमेरिकेसारख्या प्रागतिक देशात खुद्द राष्ट्राध्यक्षाच्या मुलीची ही स्थिती तर इतर मागास देशांतील स्त्रियांची काय अवस्था असेल याची कल्पना करा.
ज्याप्रमाणे ऑस्कर त्या प्रत्यक्ष घटनेतून जात असता त्याची मनस्थिती कशी असावी याचा उलगडा करण्याचा प्रयत्न सोनालीने केला होता, त्याचप्रमाणे पॅटीने त्या अनुभवातून जात असताना आपल्या मनस्थितीचे वर्णन केले आहे. ती घटना म्हणजे एखाद्या त्रयस्थाने मोबाईलमध्ये शूट केल्याप्रमाणे सर्व काही बिनचूक तपशीलासह आठवायला हवी असा समज असणार्या - स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही हा तिचा अनुभव आवर्जून शेअर करतो आहे.
पॅटी डेविस यांच्यावरील बातमीची लिंक: https://www.washingtonpost.com/opinions/i-was-sexually-assaulted-heres-why-i-dont-remember-many-of-the-details/2018/09/21/8ce0088c-bdab-11e8-8792-78719177250f_story.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा