शुक्रवार, १ मार्च, २०१९

श्वेतकोकीळे

जिथे मुलाचे हात पोहचतात,
चांदोबा, तिथे तू उगवशील?
जिथे मानवजात युद्ध थांबवेल,
श्वेतकोकीळे, तिथे तू गाशील?

(वैरामुत्तु यांनी ’कण्णत्तिल मुत्तमिताल’ या तमिळ चित्रपटासाठी लिहिलेल्या गीतामधून: इंग्रजीवरुन केलेला अनुवाद)

केव्हाही वाचल्या तरी या चार ओळी मला नेहमीच हलवून सोडतात. मग मला घोबादीचा ’टर्टल्स कॅन फ्लाय’ आठवतो. त्याच्या अखेरीस ते अंध मूल ’मॉमी’ अशी हाक मारतं तेव्हा बसलेला भूकंप वाटावा इतका जोरदार हादरा पुन्हा जाणवतो.

त्याच चित्रपटांत सर्व तरुण नि वृद्ध गमावलेल्या त्या गावात युद्धाच्या कचर्‍यातून लोखंड वेचून त्या भंगारवर गुजराण करणारी मुलांची टोळी आठवते. त्या तशा परिस्थितीतही त्यांच्यात - त्यांच्या पातळीवर का होईना - निर्माण होणारी वर्चस्वाची लढाई आठवते. लोखंडी भंगार वेचायला जाऊन भू-सुरुंगाच्या स्फोटात दोन्ही हात गमावलेला पंधरा सोळा वर्षांचा थोरला भाऊच धाकट्या बहिणीचा पोशिंदा होतो ते ही आठवते... हे आठवू लागले की मग संवेदना हरवलेल्या, ’एकदाचे युद्ध होऊन जाऊ द्या’ म्हणणार्‍यांची अधिकच कीव येऊ लागते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा