’वेचित चाललो...’ वर नवीन:   

हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

शनिवार, ९ मार्च, २०१९

कुणाच्या खांद्यावर...

मी मध्यंतरी एका प्रोजेक्टमध्ये अडकलेला असल्याने दोन महिने फेसबुकपासून दूर होतो. तेव्हा आणि एरवीही अनेक मंडळी मला फोन करुन ’तू लिहीत राहा बरं का रे. यांची खोड मोडली पाहिजे.’ असे तथाकथित प्रोत्साहन देत. ’अरे पण तुला पटते तर तुझ्या परीने तू ही लिहित जा की.’ असा सल्ला मी देई. त्यावर ’अरे आम्हाला तुझ्यासारखं थोडीच लिहिता येईल.’

हा ’आम्ही काय बुवा सामान्यच’ आव भारतीय मानसिकता अतिशय चतुराईने अंगावरची जबाबदारी झटकण्यासाठी वापरते असा माझा अनुभव आहे.

मोदी आणि मोदीभक्त यांना लष्कराने लढावे नि आम्हाला घरबसल्या युद्ध जिंकल्याचे, पाकिस्तानला धडा शिकवल्याचे झेंडे, पत्रकारांना बोलावू बोलावू अलका टॉकीज चौकात मिरवता यावेत असे वाटते (त्यांचे देशप्रेम हे इतरांच्या जिवावर, इतरांच्या खर्चाने सिद्ध करायचे असते त्यांना.) तसेच या तथाकथित विरोधकांचे असते असे मला दिसून आले. स्वत:च्या वॉलवर फारसे काही नाही; किंवा अत्यंत सपक, कोणतेही माल मसाले नसणारे गुळगुळीत लेखन ही मंडळी करतात. आणि आतून हा असा जाज्ज्वल्य विरोध वगैरे बनाव.
काळेंच्या काठीने साप मरावा अशी यांची इच्छा.

आणखी काही जण ’आमचेही तुझ्यासारखे मत आहे रे. पण काय करणार. व्यावसायिक/ ऑफिसमधले संबंध खराब होतील म्हणून बोलता येत नाही.’ असे कारण पुढे करतात. ही जमात तर सर्वात नालायक. म्हणजे जे बदल घडावेत अशी यांची इच्छा आहे त्याच्यासाठी तुम्ही कष्ट करा हे निर्लज्जपणे सांगतात. आमच्या स्वार्थाला धक्का बसता कामा नये बरं का, काळेंच्या स्वार्थाला बसला तरी चालेल.

हा सणसणीत बेशरमपणा आहे हे यांच्या गावीही नसते. भित्रेपणे संपात सहभागी न होता मालकनिष्ठा दाखवत, त्यातून मिळालेल्या आर्थिक वाढीचे गणित मात्र इतरांपेक्षा अधिक चपळाईने करणारी.

मी तर म्हणतो कदाचित हे उलट दिशेने आपल्या भक्त बॉसशी बोलताना, ’तो मंदार ना. अरे डोक्यावर पडलेला आहे तो. सतत मोदींचा द्वेष. इतकं ग्रेट काम केलं मोदींनी...’ च्या आट्याही सोडत असेल. खरंतर ही जमात नेहमी ’चित भी मेरी, पट भी मेरी’ टाईपची असते. अशा केवळ खासगीत तुमच्या बाजूला असलेल्यांवर भरवसा ठेवून नये, हे मी फार लहानपणी शिकलो आहे. एकवेळ सणसणीत विरोधक परवडला, तो तुम्हाला विरोध करणार हे बहुधा नक्की असते. (उलट कधी सहमत झालाच तर नुकसान नव्हे, फायदाच असतो) पण हे ’मी तुमचाच’ म्हणणारे पाय अडकवून केव्हा पाडतील सांगता येत नाही.

यातली काही डरपोक जमात तुमच्या पोस्ट, मुद्दे उचलून सिक्रेट ग्रुपमध्ये नेऊन तुमची टिंगलटवाळीही करत असते. स्वत:च्या वॉलवर उघडपणे लिहिण्याची त्यांची छाती नसते. मग आपल्यासारखेच डरपोक जमवून ते सिक्रेट ग्रुपच्या बंद दाराआड या बाजूची, त्या बाजूची टवाळी करत बसतात.

लोकहो, आपापल्या विरोधकांपेक्षाही या जमातीपासून सावध नि स्वत:ला दूर राखण्याचा प्रयत्न करा.

#ऐशाअभक्ताशीसंगशिरसीमालिख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा