शुक्रवार, १ मार्च, २०१९

तुही पार्टी कंची तुही पार्टी?

मी समाजवादी राजकारणावर लेख लिहिला,
तू समाजवादी आहेस ...
ते म्हणाले!

मी आपद्धर्म म्हणून कॉंग्रेसला मत द्यावे लागेल म्हणालो,
तू खांग्रेसी आहेस...
ते म्हणाले!


मी कुठल्याशा मुद्द्यावर मोदींचे बरोबर आहे म्हणालो,
तू छुपा संघी आहेस...
ते म्हणाले!

मी एका मुरलेल्या कॉम्रेडसोबत मार्क्सवर चर्चा केली,
तू अर्बन नक्षलवादी आहेस...
ते म्हणाले!

कधी हे बरोबर, कधी ते बरोबर असू शकतात म्हणालो,
तू कुंपणावरचा कावळा आहेस...
सारे म्हणाले!

मग कंटाळून ’हे सारे येडे आहेत’ म्हणालो !

#तुहीपार्टीकंचीतुहीपार्टी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा