शुक्रवार, ८ मार्च, २०१९

विकास म्हणजे...

(कुसुमाग्रज आणि पाडगांवकरांची क्षमा मागून)

विकास म्हणजे... माध्यम-पोपटपंची
विकास म्हणजे... वृत्तपत्रातील पानभर जाहिराती

विकास म्हणजे... रंगवलेले फुटपाथ
विकास म्हणजे... फुटपाथवरची स्मार्ट बाकडी
विकास म्हणजे... गगनचुंबी पुतळे
विकास म्हणजे... सहा इंची रस्ता केल्याचा सहा फुटी फ्लेक्स
विकास म्हणजे... खर्चिक टॉय ट्रेन
विकास म्हणजे... विकास म्हणजे गोमा गणेश
विकास म्हणजे... भाताशिवाय बोलाची कढी
विकास म्हणजे... कुणाबद्दल द्वेषसंपृक्त अढी
विकास म्हणजे... नोटाबंदीच्या रांगेत मेलेल जीव
विकास म्हणजे... जीएसटीने मारलेले छोटे धंदे
विकास म्हणजे... कॉंक्रीट ओतलेले रस्ते
विकास म्हणजे... क्रॅश झालेला सर्वर
विकास म्हणजे... मंदिर वहीं बनाएंगे
विकास म्हणजे... चुन चुन के मारेंगे
विकास म्हणजे... जिंकलेल्या निवडणुका
विकास म्हणजे... विरोधकांचे चारित्र्यहनन
-
विकास म्हणजे नाही ... शिक्षणाला प्रोत्साहन
विकास म्हणजे... ’तोट्यातल्या’ शाळांचे हनन
विकास म्हणजे नाही ... पर्यावरण रक्षण
विकास म्हणजे... वन आणि खारफुटींचे निर्दालन
विकास म्हणजे नाही... रोजगाराच्या संधी
विकास म्हणजे... फक्त नोटाबंदी
विकास म्हणजे नाही... सामाजिक बंधुभाव
विकास म्हणजे... द्वेष आणि हिंसाचार
विकास म्हणजे नाही... सत्यमेव जयते
विकास म्हणजे... असत्यमेव जयते
--
विकास म्हणजे, विकास म्हणजे, विकास असतो...
पण अडानी, अंबांनींचा आणि आपला सेम नसतो !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा