’वेचित चाललो...’ वर नवीन:   

हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१९

राजकारणावरील लेखन म्हणजे...

राजकारणावरील लेखन म्हणजे
अळवावरचे पाणी,
वाळूत (बीऽऽऽऽऽऽप),
फेस ना पाणी.

राजकारणावरील लेखन म्हणजे
अळवावरचे पाणी,
आजचा खरवस,
उद्या नासकवणी.

राजकारणावरील लेखन म्हणजे
अळवावरचे पाणी,
आजची गुद्दागुद्दी
उद्या फक्त रद्दी

राजकारणावरील लेखन म्हणजे
अळवावरचे पाणी,
माध्यमांच्या हाती
टीआरपीचे लोणी.

राजकारणावरील लेखन म्हणजे
अळवावरचे पाणी,
बालकांनी मोजले म्हणे,
आकाशातले तारे

राजकारणावरील लेखन म्हणजे
अळवावरचे पाणी,
नेते निमूट भरती पाणी
रमतारामाच्या घरी

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा