बुधवार, ११ मार्च, २०२०

कम्युनिस्ट पक्षाचा खासदार

तो कम्युनिस्ट पक्षाचा खासदार झाला.

वैचारिकतेची, तटस्थतेची शेंडी तूप लावून उंच केली आणि संसदेत प्रवेश केला.

त्याने संसदेचे सभागृह आतून पाहिले.

तो पाच वर्षे शेवटच्या बाकावर बसला.

त्याने आपली वैचारिक शेंडी उंच राहते या प्रामाणिक समजातून तो प्रस्तावांवर, विधेयकांवर कधी सरकारविरोधात, कधी तटस्थ राहिला. अर्थात त्याच्या मताने ते प्रस्ताव ना पास चे नापास झाले ना नापासाचे पास.

पाच वर्षांनंतर त्यांची टर्म संपली आणि तटस्थतेची शेंडी घेऊन तो मतदारसंघात परतला.

पुढच्या निवडणुकीत पडला.

वैचारिक शेंडी अजूनही उंच आहेच. फक्त आता ती ताठ ठेवण्यास तूप कमी पडते आहे.

#मीच_पयला च्या राजकारणा #मीच_लय_भारी च्या राजकारणाने शह देता येतो यावर आता तो व्याख्याने देत हिंडतो आणि अधूनमधून सोबतीचे दोन मित्र घेऊन कलेक्टर कचेरीवर मोर्चा नेऊन निवेदने देतो.

फावल्या वेळात मिल्की-वे आकाशगंगेत मार्क्सच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी चंद्रावर जाऊन व्याख्याने देतो.

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा