बुधवार, १८ मार्च, २०२०

मूर्खपणातला सर्वधर्मसमभाव

Praying

गोमूत्रवाले ढेकणाच्या पिलावळीसारखे आपल्या इतस्तत: पळत आहेत. (अनेकानेक रेफरेन्सेस, शोधाल तितके सापडतील.)

चर्च मधले पवित्र पाणी पिऊन लोकांना करोनाची बाधा झाली (https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-saltwater-spray-infects-46-church-goers-in-south-korea-scsg-91-2109169/)

कोरोनाची लागण म्हणजे अल्लाचा कोप म्हणणार्‍या इस्लामी स्कॉलरलाच लागण (https://keralakaumudi.com/en/news/news.php?id=263670&u=islamic-scholar-who-proclaimed-coronavirus-is-allahs-punishment-for-china-tests-positive-for-covid-19)

हे अजून एक दिवटे: <>
https://www.al-monitor.com/pulse/originals/2020/03/bizarre-cures-for-coronavirus-in-iran.html

सच्चा जैनी कहता है इससे डरो ना: https://www.youtube.com/watch?v=Bcw06pwUp08

आणि ज्यांचे पाय जमिनीवर आहेत असे वाटत होते तेही आता अंतराळी उडू लागले. (https://tibet.net/chanting-dolma-mantra-helpful-in-containing-the-spread-of-epidemics-like-coronavirus-his-holiness-the-dalai-lama-to-chinese-devotees/)

या सार्‍यांना सद्बुद्धी द्यावी अशी त्यांच्या त्यांच्या देवाकडे प्रार्थना करतो.

---

आपल्या देशात वस्तूविक्रीपासून, धार्मिक राजकारण, राजकीय क्षेत्र सर्वत्र फीअर माँगरिंग अथवा भीती पसरवून वा तिचा फायदा घेऊन स्वार्थाचे पीक काढणारे हरामखोर महामूर आहेत. मग ते शाकाहारापासून, आमच्या पॅथीत रामबाण उपाय आहे सांगणार्‍यांपर्यंत, ’डावी तर्जनी उजव्या नाकपुडीवर ठेवून उजवी तर्जनी डाव्या नाकपुडीत खुपसा, करोनाचा व्हायरस पेकाटात लाथ बसलेल्या कुत्र्यासारखा क्यंव क्यंव करत पळून जाईल’ पर्यंत काय वाट्टॆल ते सांगणारे ते कोरोनाच्या गाण्यात आपापल्या देवबाप्पाचे नामस्मरण घुसडण्यापर्यंत सगळे चालू आहे.

लोकांच्या भीतीचा स्वार्थासाठी वापर करणार्‍या सार्‍यांना देशद्रोही का म्हणू नये. गल्लीत कुठेतरी कुणीतरी घोषणा दिल्या असे कुणीतरी सांगितले तर माणूस लगेच देशद्रोही ठरण्याच्या जमान्यात समाजात भीती पसरवणारे, त्यावर आपल्या स्वार्थाची पोळी भाजणारे कैकपट अधिक मोठे देशद्रोही आहेत. यांच्या या असल्या मूर्ख उपायांवर भाबडे विश्वास ठेवून क्वारंटाईन केलेले रुग्ण पळून जाण्याची शक्यता आणखी वाढते, आणि हे पळपुटे बाजीराव समाजात अनेकांना ’प्रसाद’ देत जाणार.

संशयितांना, पेशंट्सना क्वारंटाईन करण्याबरोबरच सर्वधर्मीय धर्मगुरु आणि डेर्‍यापासून भांड्यापर्यंत सगळ्याचे स्वामी, बुवा, बाबा, माँ वगैरेंना आधी क्वारंटाईन करायला हवे. त्यांच्याबरोबरच पहिले चॅनेल्स आणि व्हॉट्सअ‍ॅपवर तातडीने आणिबाणी लादून बंद पाडावीत. गल्लीबोळातले टिनपाट खंड्या-बंड्या तोंड वर करुन काहीही सल्ले देत आहेत.
- oOo -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा