बुधवार, ११ मार्च, २०२०

कम्युनिस्ट विचारवंताचा लेख...

पहिल्या निवडणुकीच्या निकालानंतर कम्युनिस्ट विचारवंताचा लेख: कॉंग्रेस संपली आहे विसर्जित करावी.

दुसर्‍या निवडणुकीच्या निकालानंतर कम्युनिस्ट विचारवंताचा लेख: राहुल गांधींनी राजीनामा द्यावा.

तिसर्‍या निवडणुकीच्या निकालानंतर कम्युनिस्ट विचारवंताचा लेख: राहुल गांधींनी आपली जबाबदारी पुरेशी पार पाडली नाही.

चौथ्या निवडणुकीच्या निकालानंतर कम्युनिस्ट विचारवंताचा लेख: कॉंग्रेसने गांधी घराण्याला दूर करावे तरच ती पुन्हा उभी राहील.

पाचव्या निवडणुकीच्या निकालानंतर कम्युनिस्ट विचारवंताचा लेख: तरुणांना संधी देत नाहीत म्हणून कॉंग्रेसी सतत हरत आहेत.

सहाव्या निवडणुकीच्या निकालानंतर कम्युनिस्ट विचारवंताचा लेख: कॉग्रेसने आता मागे हटून सशक्त विरोधी पक्ष उभा करण्यास अवकाश निर्माण करुन द्यावा.

सातव्या निवडणुकीच्या निकालानंतर कम्युनिस्ट विचारवंताचा लेख: राहुल गांधी हे प्रभावहीन नेते आहेत.

आठव्या निवडणुकीच्या निकालानंतर कम्युनिस्ट विचारवंताचा लेख: मोदींचा पराभव करणॆ कॉंग्रेसच्या ताकदीबाहेरचे आहे.

...
...
...

आणि तो लेख लिहित राहिला आणि लेखाच्या मानधनात ओल्ड मंक विकत घेऊन अहद बंगाल तहद त्रिपुरा झालेल्या वाताहतीचे दु:ख त्यात बुडवून टाकत राहिला.

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा