सोमवार, १६ मार्च, २०२०

गुगल, कम्युनिस्ट, लिनक्स आणि बरंच काही

How can I remove Google from my Life:
https://www.theguardian.com/technology/askjack/2018/dec/20/how-can-i-remove-google-from-my-life

---

इन्ट्रेस्टिंगली हीच समस्या राजकीय पातळीवर कम्युनिस्टांची आहे...

<< In general, the problem with Linux on smartphones looks much like its problem on PCs. Many and various groups enjoy developing new versions of the operating system, which are all more or less doomed from birth. None of them have the skills, the interests or the money to create viable platforms that include the hardware, apps, services, packaging, marketing, advertising, distribution and support on the sort of scale needed to sustain a real product. Without those, they are unlikely to attract much interest beyond hobbyists and enthusiasts. >>

...उत्पादनाच्या संशोधन, अभ्यास, चिकित्सा यात ते इतके रममाण झालेले असतात की ते बाजारात विकण्यासाठी काय करावे लागेल याचा विचार करण्यास त्यांच्याकडे वेळ, बौद्धिक ऊर्जा आणि इच्छाशक्ती शिल्लकच राहात नाही. ते दर्जेदार, चो्ख उत्पादन बनवण्याचा इतका आटापिटा करतात की इतके केल्यावर व्यावसायिक पातळीवर ते सामान्यांना परवडण्याजोग्या किंमतीत विकता येणार नाही याचे भान त्यांना राहात नाही. उत्पादन विकायचे असेल तर त्याच्या उत्पादन खर्चाचे व विक्री किंमतीचेे भान ठेवावे लागते. आणि ते दोन्ही आटोक्यात ठेवायचे तर आपल्या इच्छेहून दुय्यम प्रतीचे उत्पादन विकावे लागते. एकदा ग्राहकाची रीघ वाढली, ब्रॅंड प्रस्थापित झाला की मग क्रमाक्रमाने उत्पादनाची गुणवत्ता सुधारत नेली तर तुमच्यावरील विश्वासाखातर लोक अधिक दाम मोजायला तयार होत असतात, जे सर्वस्वी नव्या उत्पादनाबाबत घडत नसते.

हा पर्याय मान्य नसेल तर तुम्हाला मग भांडवलशाहीचे ऋणाईत उत्पादकांचे तत्व स्वीकारावे लागते. यात एखाद्या भांडवलदाराकडून भरपूर पैसा आगाऊच उचलून (याला आणखी काही भांड्वलशाही उपचार आधी करावे लागतात.) एकसमयावच्छेदेकरुन जाहिराती आणि उत्पादनांचा पूर बाजारात सोडता यायला हवा. (मोदींनी हाच मार्ग अनुसरला.) या लोंढ्याच्या गतिज उर्जेमुळे प्रस्थापित काही स्पर्धक थोडे परिघाबाहेर सरकवले जाऊन तुमच्या उत्पादनाला जागा तयार होते.

’माझ्याकडे लै भारी उत्पादन आहे. ज्याला हवे त्याने माझ्या घरी येऊन विकत घ्यावे.’ हा माज उत्पादकाला परवडत नसतो राव. भांडवलशाहीमध्ये पर्वताने महंमदाकडे जाण्याचा प्रघात रुढ झाला आहे आता.

#कुठूनहीकम्युनिस्ट
----

मूळ लेखाबद्दल:
आज स्मार्टफोनच्या जगात केवळ अ‍ॅंड्रॉईडवाले गुगल आणि आयओएस वाले अ‍ॅपल हे दोनच पर्याय का उपलब्ध आहेत याचा उत्तम लेखाजोखा. याच जोडीने डेस्कटॉप अथवा लॅपटॉपच्या जगातही केवळ विंडोज आणि आयओएस या दोनच प्रणाली का असतात, स्मार्टफोनवरची जाएंट असणारी अ‍ॅंड्रॉईड अजूनही तिथे का चाचपडते आहे याचा वेध कुणीतरी घ्यायला हवा. लिनक्स केवळ सर्व्हर साईड्ला आपले बस्तान बसवून कम्युनिस्टांसारखी ’आम्ही ब्वा बुद्धिवादी’ म्हणत सुशेगात राहिली आहे.

-oOo- 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा