गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

आजच्या बातम्या

दिनांक अमुक महिना ढमुक वर्ष वगैरे

फडणवीसांनी सरकारवर कठोर टीका केली
राऊतांचा भाजपवर घणाघात
तीनपैकी कुठले तरी राणॆ फुसफुसले
प्रवीण दरेकर फसफसले
चंद्रकांत पाटील राज्यपालांना भेटले
राहुल गांधींना राफेल भेटले
रविशंकर प्रसाद धुसफुसले
ममतादीदी कडाडल्या
अमित शाह बरसले
विप्लब देव बरळले
थोरले पवार हसले
धाकले पवार गरजले
भातखळकर तडमडले
उपाध्ये कडमडले

आयपीएलमध्ये कोलकाता हरले
मुंबई जिंकली
माशी शिंकली
चेन्नईला डसली
दिल्लीसमोर फसली...

... सदर वृत्तपत्र ’जाहिरात-पैसा पब्लिशिंग कंपनी’साठी ओसाडवाडी मुक्कामी संपादक/मालक यांनी छापून प्रसिद्ध केले. यातील मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. जाहिरातीच्या पैशांशी मालक सहमत असले तरी त्यातील दाव्यांशी सहमत असतीलच असे नाही.
---

’या १०३ टक्के पावसातला 
आपल्या वावरात किती पडंल रं?’
एस्टीच्या स्टॅंडवर बोचक्यावर बसलेल्या
गण्याने पेपरची घडी करता करता 
शेजारच्या गणपाला विचारले.
- oOo -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा