Vechit Marquee

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५

एफ-१, वन झीरो फाईव: तंबूत शिरू पाहणार्‍या उंटाची गोष्ट


  • लहानपणी आपण सार्‍यांनीच तंबूत शिरलेल्या उंटाची गोष्ट ऐकली असेल. थोडे डोके तंबूत आणू का, पोटाला थंडी वाजते आहे ते आत घेऊ का, शेपटावर माशा बसून चावताहेत ते आत घेऊ का, असे करत हळूहळू पुरा तंबूत शिरलेला नि अखेर मालकालाच हाकलून तंबूच बळकावून बसलेल्या उंटाची गोष्ट! मुळात मालकाने उंट पाळला, तो त्याची कामे करण्यासाठी पण अखेर तो मालकाचेच काही हिरावून घेऊ लागला.माणसाच्या जगण्यात असे अनेक अदृष्य उंट त्याच्या हक्काचे बरेच काही बळकावून बसलेले असतात, आधी डोके, मग पोट असे करत संपूर्णपणे तंबूत घुसून तो तंबूच ताब्यात घेतात. यात माणसाने स्वतःच निर्माण केलेल्या व्यवस्था फार मोठा वाटा बळकावताना दिसतात. काहीवेळा… पुढे वाचा »

मंगळवार, १० फेब्रुवारी, २०१५

AAPtard मित्रांना अनावृत पत्र


  • माझ्या AAPtard मित्रांनो, या संबोधनाने तुम्ही मुळीच विचलित होणार नाही याची खात्री आहे. कारण तुमच्या नेत्याला त्याच्या आजारावरून, गळ्यातील मफलरवरून झालेल्या हिणकस शेरेबाजीला भीक न घालता तुम्ही त्याचा ‘मफरलमॅन’ बनवून चोख प्रत्युत्तर दिले होते. तसेच ‘रिटार्ड’शी साधर्म्य सांगणारे हे हिणकस संबोधनही तुम्ही मनावर न घेता गल्ली बोळातून आपले काम निष्ठेने चालू ठेवले नि दिल्लीत विजयश्री खेचून आणली. त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन.हे संबोधन देणारे स्वतःला तुमच्यापेक्षा बरेच बुद्धिमान वगैरे समजत असावेत. एखाद्या मंदबुद्धी समजल्या गेलेल्या भावाने, स्वतःला कुशाग्र बुद्धिमान समजणार्‍या भावाला दिलेली ही मात आह… पुढे वाचा »