Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
नाटक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नाटक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १९ एप्रिल, २०२५

हट्टमालाच्या पल्याड... ज्याचा त्याचा युटोपिया!


  • कित्येक वर्षांपूर्वी अमोल पालेकरांनी साजर्‍या केलेल्या ‘बादल सरकार महोत्सवा’च्या सीडीज मिळाल्या होत्या. त्यात ‘हट्टमालार आपोरे’ या शीर्षकाचे नाटक पाहण्यात आले होते. त्याचा तपशील इतक्या वर्षांनी विस्मरणात गेला असला तरी, ‘चलन/पैसा या संकल्पनेवर हलकेफुलके भाष्य करणारे नाटक’ आहे इतपतच ध्यानात होते. काल पुन्हा एकवार त्याचा प्रयोग पाहिला नि डोक्यात उजेड पडला. काही काळापूर्वी कॉ. दत्ता देसाईंशी तीन दिवस गप्पांचा कार्यक्रम आम्ही केला होता. त्यात मार्क्सला अपेक्षित समाजव्यवस्थेवर बोलणे झाले होते. त्याच्या मते खासगी मालमत्ता ही संकल्पना रद्दबातल केली की, माणसाला आज करावे लागते तसे ऊर फुटेतो काम करावे लागणार नाही. अन्न, वस्त्र, निवास यांची हमी व्यवस्थेनेचे घेतली, तर त्याला त्या व्यवस्थेप्रती आपल… पुढे वाचा »

रविवार, ५ मार्च, २०२३

‘देस’: वैचारिक गोंधळाच्या कृतिशून्यतेचे नाटक


  • गेल्या दशका-दोन दशकांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्र, देश, देशभक्ती वगैरे विचार नि भावनांचे चलनात रुपांतर झाले आहे, आणि आर्थिक अरिष्टात सापडलेल्या एखाद्या देशाच्या चलनाप्रमाणे त्याचे अवमूल्यनही. साधारण २०१४ ते १९ दरम्यान यांचा वापर अक्षरश: सुट्या पैशांसारखा अरत्र-परत्र सर्वत्र होत होता. पण देशभक्ती म्हणजे काय? ती केवळ एक भावना आहे, की तिला कृतीची जोडही हवी? की त्याहून पुढचे पाऊल म्हणजे कुण्या ‘गुरुजीं’च्या आदेशानुसार केलेली ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’? त्याहीपूर्वीचे प्रश्न ‘देश म्हणजे काय?’, ‘माझा देश कोणता? या दोनही प्रश्नांचे उत्तर सैद्धांतिक, बौद्धिक पातळीवर द्यायचे की केवळ अनुसरणाच्या, हा ज्याच्या त्याचा निर्णय असतो. बहुसंख्या ही अर्थातच अनुसरणाचा मार्ग निवडते. पण पुढचा प्रश्न असा असतो की ज्यांना… पुढे वाचा »

रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

प्रस्थान ऊर्फ Exit : दोन भाषणांचे नाटक


  • मागील आठवड्यात ब्राझीलमध्ये उजव्या विचारांचे बोल्सेनारो यांचा पराभव होऊन डाव्या विचारांचे नेते लुला डि’सिल्वा यांची भावी अध्यक्ष म्हणून निवड झाली. याउलट गेली दोन दशके अस्थिर राजकीय परिस्थिती अनुभवणार्‍या इस्रायलमध्ये पाच वर्षांत चौथ्यांदा निवडणूक होऊन उजव्या विचारांचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू निसटत्या बहुमताने निवडून येत पुन्हा एकवार पंतप्रधान होऊ घातले आहेत. लोकशाही राष्ट्रांमध्ये सत्तेचा लंबक असा इकडून तिकडे फिरणे ही नित्याची बाब आहे. समाजातील मूठभर व्यक्ती विशिष्ट वैचारिक भूमिकेशी बांधील असतात. अमका नेता वा पक्ष हा अमुक विचारसरणीचा आहे म्हणून त्याला निवडून देणारे बहुसंख्य लोक त्या वैचारिक भूमिकेबद्दल अज्ञानीच असताना दिसतात. याशिवाय मोठ्या संख्येने नागरिक अथवा मतदार हे प्रामुख्याने राजकीय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विचार करत … पुढे वाचा »

शनिवार, ३ मार्च, २०१८

परवा आमचा पोपट वारला


  • ‘परवा आमचा पोपट वारला’ असा निरोप अतुल पेठेंकडून मिळाला होता. म्हणून रीतीप्रमाणे चार जणांना सोबत घेऊन काल त्यांना भेटायला गेलो. आता चार लोक औपचारिक प्रश्न विचारतात तसे आम्ही विचारु म्हटलं नि थोडावेळ बसून निघू असा प्लान होता. पण कसलं काय. एक तासाहून अधिक काळ पार धरुन अख्खी ष्टोरीच ऐकवलीन्‌ या माणसानं. नतद्रष्ट तर इतका की तासभर हसवत ठेवलं आणि. बरं दिसतं का सांगा बरं हे? प्रसंग काय नि आपण वागतो काय. पेठेंसारख्या ‘सुलझा हुआ’ आदमी असं वागेल अशी अग्गदी कल्पना नव्हती होऽ. पोपट झाला म्हणून काय झालं, शेवटी एक फ्यामिली मेंम्बरच तो, शिवाय नावाने थेट जुन्या राज्यकर्त्यांच्या वंशावळीशी नाते सांगणारा, साधासुधा नव्हे. मऽग? अगदीच ताळतंत्र सोडलन् हो या माणसानं. शिट्या काय वाजवतो, त्यावर गाणी काय म्हणतो… पुढे वाचा »

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

‘कट्यार काळजात घुसली’ - एक दृष्टिक्षेप (उत्तरार्ध) : रत्नजडित पण बिनधारेची कट्यार


  • सेरिपी « मागील भाग --- ‘कट्यार...’ नाटकाबद्दल बाबत बोलताना प्रामुख्याने त्यातील व्यक्तिरेखांचा विचार मागील भागात केला आहे. आता याच व्यक्तिरेखा चित्रपटात कशा येतात ते पाहणे रोचक ठरेल. पण सुरुवातीलाच हे स्पष्ट केले पाहिजे, चित्रपटाचे नाव नि कथानकाचा गाभा तोच असला, तरी चित्रपट ही एक स्वतंत्र कलाकृती आहे हे अमान्य करता येणार नाही. तेव्हा ‘नाटकात जे आहे ते इथे का नाही, किंवा चित्रपटात नव्याने जे आले आहे ते का आले आहे?’ हे दोन प्रश्न गैरलागू आहेत. ते चित्रपटकथा-लेखकाचे स्वातंत्र्य मान्य करायला हवे. परंतु दोन्हींमध्ये जे सामायिक आहे, त्याची तुलना मात्र करणे शक्य आहे नि न्याय्यही. चित्रपटात सामान्य प्रेक्षकासाठी बरेच रंग गडद करावे लागतात हे मान्य. पण चित्रपटात गडदच काय पण भडक करून, वर पात्रांची नि कथानकांची संपूर्ण मोडतोड केली आहे. इतकी की … पुढे वाचा »

‘कट्यार काळजात घुसली’ - एक दृष्टिक्षेप (पूर्वार्ध) : सेरिपी


  • अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणार्‍या कौशल्यांनंतर माणसाने सर्वप्रथम विकसित केलेले कौशल्य असावे ते गाण्याचे. मनोरंजनाचे दालन माणसाने सर्वप्रथम खुले केले ते गाण्याचे दार उघडूनच. एखादे आवडते गाणे, आवडती धून गुणगुणला नाही असा माणूस सापडणे दुर्मिळ. अगदी आपला आवाज बेसूर आहे हे पक्के ठाऊक असलेली माणसेही, निदान बाथरुममध्ये तरी – जिथे समोर कुणी नसल्याने भिडस्तपणा आड येत नाही – अधेमधे आपला गळा तासून पाहतात. असा सुरांचा मोहक दंश जर योग्य वयात झाला, तर त्या डसण्यातून जी बाधा होते, ती अलौकिक अशीच असते. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातल्या सदाशिवला तो सूर सापडतो ‘पंडित भानुशंकरां’च्या गाण्यातून. त्या सुरांनी वेड लावलेला तो दहा-बारा वर्षांचा मुलगा, त्यांच्या अनुपस्थितीतही अनेक वर्षे सांभाळून ठेवतो, आणि अखेर घरच्या जबाबदारी… पुढे वाचा »

सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

विनोद दोशी नाट्य महोत्सव - २: मै हूँ युसुफ और ये है मेरा भाई


  • त्या लहानशा गावात लोक अनेक पिढ्यांपासून राहात आहेत. गावाने अनेक उंबर्‍यांच्या अनेक पिढ्या पाहिल्या आहेत. गावातल्या प्रत्येकाला केवळ तिथे जन्मलेल्याच नव्हे, तर लग्न करून गावात आलेल्या सासुरवाशिणीच्याही चार पिढ्यांचा इतिहास ज्ञात आहे. केस पिकलेल्या, दातांचं बोळकं झालेल्या गावच्या वृद्धांना, गावाच्या रस्त्यांवर नि मैदानावर बागडणार्‍या सार्‍या पोरासोरांच्या जन्माची गाणी अजून याद आहेत. इथे जन्मलेल्या आणि मातीस मिळालेल्या समवयस्कांच्या मजारीवर त्यांनी आपल्या हाताने मूठ मूठ माती टाकली आहे. गावात भांडणतंटे, रुसवेफुगवे आहेत, तसेच त्यात मध्यस्थी करून तड लावणारे बुजुर्गही आहेत. ‘अशा तर्‍हेने ते सुखासमाधानाने नांदत होते’ असे परीकथेतले वास्तव नसले, तरी नांदत्या उंबर्‍यांचे ते गाव ही एक जिवंत परिसंस्था आहे. अचानक एक दिवस बातमी आली. गावाशी काडीचा संबं… पुढे वाचा »

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६

विनोद दोशी नाट्य महोत्सव - १: शब्देविण संवादु...


  • नाटक किंवा एकुणच सादरीकरणाची कला ही शब्दाधारितच असते असा आपला बहुतेकांचा समज असतो, तो बव्हंशी खराही आहे. अगदी अलिकडे वास्तववादी शैलीशी फटकून राहात ‘एकदिश कथनशैली’ (Linear Narrative) नाकारून, घाट अथवा मांडणीचे (form) अनेक प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य घेत असतानाही शब्दांचे महत्त्व तसेच राहते. पाश्चात्त्यांच्या ‘ऑपेरा’ सारख्या प्रकारात असेल, की आपल्याकडे ज्यांना ‘खेळे’ म्हणून ओळखतात तशा दशावतारी किंवा त्या त्या प्रदेशातील पारंपारिक नाट्यप्रकारातही शब्दांचे वर्चस्व वादातीत असते. शब्दांचे महत्त्व नाकारून, केवळ विभ्रम आणि शारीर हालचालीतून कथा जिवंत करण्याचे काम, आजवर कथकली सारख्या नृत्यप्रकाराने केले आहे. तरीही यात मुद्राभिनयाबरोबरच (expression) मानवी शरीराचा वापर पुरेपूर केला आहे. प्रश्न असा आहे, की आता तो ही किमान पातळीवर आणून सादरीकरण शक्य… पुढे वाचा »

रविवार, ९ ऑगस्ट, २०१५

‘ऑल दॅट आय वॉन्ना डू’ : आभासी स्वातंत्र्याचा प्रवास


  • 'Mother died today, or may be yesterday; I can't be sure' कामूच्या ‘द स्ट्रेंजर’च्या सुरुवातीचे हे मर्सोऽचे हे वाक्य म्हणजे साहित्यातील एका नव्या प्रवाहाची नांदी मानलं जातं. अस्तित्ववादी विचारधारेचा प्रभाव असलेल्या साहित्याचा प्रवाह तिथून बळकट होत गेला. वरवर पाहत अब्सर्ड, अर्थहीन जगातील माणसाच्या जगण्यातील तुटलेपणाचा, दिशाहीनतेचा मर्सोऽ प्रतिनिधी दिसतो. जगण्यातील कदाचित सर्वात महत्त्वाचा आधार गमावतानाही त्याबाबत बेफिकीर, खरंतर संवेदनाशून्य कंटाळा असलेल्या, कोणत्याही बंधनातून दूर राहू पाहणार्‍या, गुंतण्याचे टाळणार्‍या व्यक्तींचा प्रतिनिधी बनून राहिला होता. दुसर्‍या महायुद्धानंतर कामूच्या या नायकाची प्रतीरूपे प्रत्यक्ष जगण्यात दिसू लागली आणि साहित्यिकांनीही त्यांचा वेध घेण्यास सुरुवात केली. … पुढे वाचा »