-
कांदिद, कालिदास, आणि आरती देवी « मागील भाग --- मागील भागात ज्यांचा उल्लेख केला तो कालिदास असो वा आरती देवी, त्यांच्या सामाजिक आयुष्यातील साध्ये सिद्ध करण्यासाठी आपल्या जिवाभावाच्या जोडीदारांना विरह-वेदनेला सामोरे जाण्यास भाग पाडले आहे. हवे ते साध्य करण्यासाठी मूळ स्थानापासून दूर जाताना, जिवाभावाच्या व्यक्तीपासूनही दूर जाणे अपरिहार्य नव्हते. कालिदासाला मल्लिकेशी विवाह करून तिलाही सोबत नेणे शक्य होते. विलोमने– त्यांच्या सामायिक मित्राने– त्याला त्यावर पुन्हा पुन्हा डिवचलेही आहे. परंतु जोडीदाराला अर्ध्या वाटेत सोडणे हा सर्वस्वी स्वार्थी निर्णय म्हणता येणार नाही, कारण त्या निर्णयप्रक्रियेत त्या दोघांचीही बाजू येतेच. त्यामुळे कुठल्याही कौटुंबिक निर्णयात तो त्यांना अनुकूल घेतला जाण्याची एक शक्यता असतेच. परंतु परतुनि जाण्याच्या असोशीने, इत… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
चित्रपट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
चित्रपट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५
परतुनि ये घरा... - ३ (अंतिम) : ययाती, बुधा आणि... माणूस
Labels:
आकलन,
कथा,
चित्रपट,
जिज्ञासानंद,
मिथ्यकथा,
विश्लेषण,
साहित्य-कला
रविवार, ९ फेब्रुवारी, २०२५
परतुनि ये घरा... - २ : कांदिद, कालिदास, आणि आरती देवी
-
पेराल्टा, ऑर्फियस आणि नचिकेता « मागील भाग --- तुरुंगवारी अथवा मृत्युदर्शन हे टोकाचे नि वेदनादायक वळण आहे. आयुष्यात अपरिहार्यपणे अथवा अनाहुतपणे येणार्या इतर काही प्रमाथी नि आवेगी वळणांनाही, माणसे आपल्या इच्छाशक्ती, कुवत, कौशल्य नि चिकाटीने वळशामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करतात. जगण्याची गाडी पुन्हा मूळ स्थानी नेऊन प्रवास सुरू करण्याचा अट्टाहास, आटापिटा करताना दिसतात. त्यांचा तो आटापिटा अनेकदा 'You can never go back home' या उक्तीचा अनुभव देऊन जात असतो. कांदिद: प्रसिद्ध विचारवंत वोल्तेअरच्या ‘ कांदिद ’ची कथा काहीशी मागील भागात सांगितलेल्या ऑर्फियस-युरिडिसीच्या वळणाची. पण त्याचे संघर्ष कैकपट व्यापक. त्याचे त्याच्या देखण्या आतेबहिणीवर– Cunégonde– प्रेम आहे. परंतु तिचे वडील बॅरन (१) म्हणजे उमराव घराण्यातील आहेत. आपल्… पुढे वाचा »
Labels:
आकलन,
कथा,
चित्रपट,
जिज्ञासानंद,
मिथ्यकथा,
विश्लेषण,
साहित्य-कला
मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२
इतिहास, चित्रपट नि मी
-
'काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षागृहात असताना, त्यांच्याबद्दल भवती न भवती चालू असताना एका मित्राने त्याच्या फेसबुक-पोस्टबाबत मी व्यक्त व्हावे यासाठी मला टॅग केले होते. त्याला दिलेला हा प्रतिसाद. माझ्या स्वयंभू परंपरेला अनुसरून सर्वच गटांना नाराज करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. एरवी माझ्या दृष्टिने प्रासंगिकता हा आता टाकाऊ विषय आहे हे सुरुवातीलाच नोंदवून ठेवतो. एखाद्या लेझर विजेरीच्या भिरभिरत्या लाईटच्या मागे नाचणार्या मांजरासारखे नाचायला मला आवडत नाही. --- मुळात इतिहास हा विषय मला त्याज्य आहे. ’इतिहासातून प्रेरणा मिळते’ हे भंपक विधान आहे. इतिहासातून फक्त झेंडे आणि शस्त्रे मिळतात.'माणसे त्यातून शिकतात’ हे शेंडाबुडखा नसलेले विधान आहे. ’शालेय जीवनात इतिहास हा विषय शिकवूच नये. ज्याला खरोखर रस असेल त्याला पुरेशी समज आल्यावर… पुढे वाचा »
शुक्रवार, २१ मे, २०२१
जैत रे जैत : I couldn't go home again
-
मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या वाटेने जात एक मानदंड निर्माण करणारे जे चित्रपट आहेत त्यात दोन-तीन दशकांहून अधिक काळ ज्याचा बोलबाला टिकून राहिला असे मोजकेच. गाव-पाटील आणि त्याने केलेला अन्याय, त्याविरोधात बंड करुन उठलेला कुणी तरुण, या दोन्हीवर लावणी आणि लावणीवालीचा तडका; सोशिक शेतकरी; प्रेमस्वरुप आई; फुलाला फूल धडकून ज्यांच्या प्रेमाचा इजहारे इश्क पडद्यावर होतो असे माफक प्रणयपटू नि त्यांची कथा; हसण्या-हसवण्याच्या वाटेने गल्ला जमा करत गेलेले चित्रपट आणि अर्थातच महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या काळातील कथानकांच्या आधारे मांडलेले कथानक... हे मराठी चित्रपटाचे ढोबळ प्रवाह. राजकारणातल्या डावपेचांचा आणि त्यावर परिणाम घडवणार्या समाजकारणाचा वेध घेणारा एखादा सिंहासन (१९७९), आपल्या एका प्रश्नानेच गावच्या सत्ताधार्याच्या मनात द्वंद्व … पुढे वाचा »
मंगळवार, ७ एप्रिल, २०२०
‘कोर्ट’ आणि एका ‘असंवेदनशील’ प्रेक्षकाच्या नजरेतून चित्रपट
-
१७ तारखेला (२०१५) 'कोर्ट' रिलीज झाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो दाखवला गेला तेव्हा प्रचंड गर्दीने प्रवेश मिळाला नव्हता. त्यानंतर अनेक पुरस्कार मिळाल्यानंतर त्याबद्दल अधिकाधिक चर्चा होऊ लागली. लोक उत्सुकतेने तो रिलीज होण्याची वाट पाहू लागले होते. चित्रपट मराठी असल्याने किती काळ टिकेल हे ठाऊक नसल्याने रिलीज झाल्या-झाल्या बघून टाकण्याचे बहुतेकांनी ठरवले होते. चित्रपट रिलीज झाला. अनेकांनी फर्स्ट-डे-फर्स्ट शो पाहून घेतला. वृत्तपत्रांतून आलेल्या समीक्षेतून बहुतेकांनी त्याला उत्तम रेटिंग दिले गेले. पहिल्या एक-दोन शोमधेच असा अनुभव येऊ लागला, की सर्वसामान्य प्रेक्षकाची प्रतिक्रिया निराशेची होती. स्वयंघोषित चित्रपट रसिक/समीक्षकहा धक्का होता. त्यातून काही जणांनी प्रेक्षक 'असे कसे दगड हो?' अशी प्रतिक्रिया देऊ केली. थोड… पुढे वाचा »
बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९
शोले पुन्हा पाहिल्यानंतर
-
विषयसंगतीमुळे हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »
बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९
नॉर्मा आणि कम्मो
-
’हे जीवघेणं गाणं आहे!... हो ना?" "हो!" "हे ऐकलं की एका मिनिटानं आयुष्य कमी होतं आणि अर्ध्या मिनिटानं वाढतं!" जगण्यात काही क्षण असे सापडतात की तिथे अचानक स्तिमित होऊन माणूस स्तब्ध होतो. ’कल और आएंगे नग्मोंकी खिलती कलियाँ चुननेवाले । मुझसे बेहतर कहनेवाले, तुमसे बेहतर सुननेवाले ॥’ म्हणत साहिरने माझ्यातल्या बुतशिकनला बुत बनवून ठेवला होता. वरची दोनच वाक्ये समोर ठेवून सासणेंनी मला पुतळाच बनवून ठेवले. काही वर्षांपूर्वी ’सनसेट बुलेवार्ड’ नावाचा एक चित्रपट पाहिला होता. सायलेंट मूवीजच्या जमान्यातील कुणी प्रसिद्ध नटी, नॉर्मा. बोलपटाच्या आगमनानंतर झालेल्या तंत्रबदलातून जी वावटळ निर्माण झाली, त्यातून चंदेरी दुनियेतून पाचोळ्यासारखी बाहेर फेकल्या गेलेल्यांपैकी एक. अत्यंत आत्मकेंद्रित, आपल्याच विश्वात जगणारी नॉर्मा, वास्… पुढे वाचा »
शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७
‘कट्यार काळजात घुसली’ - एक दृष्टिक्षेप (उत्तरार्ध) : रत्नजडित पण बिनधारेची कट्यार
-
सेरिपी « मागील भाग --- ‘कट्यार...’ नाटकाबद्दल बाबत बोलताना प्रामुख्याने त्यातील व्यक्तिरेखांचा विचार मागील भागात केला आहे. आता याच व्यक्तिरेखा चित्रपटात कशा येतात ते पाहणे रोचक ठरेल. पण सुरुवातीलाच हे स्पष्ट केले पाहिजे, चित्रपटाचे नाव नि कथानकाचा गाभा तोच असला, तरी चित्रपट ही एक स्वतंत्र कलाकृती आहे हे अमान्य करता येणार नाही. तेव्हा ‘नाटकात जे आहे ते इथे का नाही, किंवा चित्रपटात नव्याने जे आले आहे ते का आले आहे?’ हे दोन प्रश्न गैरलागू आहेत. ते चित्रपटकथा-लेखकाचे स्वातंत्र्य मान्य करायला हवे. परंतु दोन्हींमध्ये जे सामायिक आहे, त्याची तुलना मात्र करणे शक्य आहे नि न्याय्यही. चित्रपटात सामान्य प्रेक्षकासाठी बरेच रंग गडद करावे लागतात हे मान्य. पण चित्रपटात गडदच काय पण भडक करून, वर पात्रांची नि कथानकांची संपूर्ण मोडतोड केली आहे. इतकी की … पुढे वाचा »
सोमवार, १० ऑगस्ट, २०१५
जग दस्तूरी रे...
-
विषयसंगती ध्यानात घेऊन हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. . - oOo - पुढे वाचा »
शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०१४
आरसा दाखवणारा ‘रेगे’
-
पौगंडावस्था आणि तारुण्य या सीमारेषेवर उभा असलेला कुणी एक रेगे. त्या वयात संभ्रम कमी होत त्याची जागा प्रचंड ऊर्जा आणि ऊर्मीने घेतलेली असते. याच वयात माणसे अधिक प्रयोगशील असतात, धाडसी असतात. बेदरकारपणा, धोका पत्करण्याची तयारी याच काळात सर्वात अधिक असते. अगदी रेगेसारखा पापभीरू मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगाही त्याला अपवाद नसतो. दहीहंडी पाहायला गेलेला रेगे. योगायोगानेच तिथल्या हाणामारीत सहभागी असल्याच्या संशयाने त्याची वरात पोलिस स्टेशनात आणली जाते. त्याच्यासारख्या पार्श्वभूमीच्या तरुणाला पोलिस स्टेशनचे आतून दर्शन घडावे अशी वेळ आलेली नसतेच. त्यामुळे एकीकडे भलत्याच लफडयात अडकल्याची, परीक्षा बुडण्याची आणि मुख्य म्हणजे आई-वडील काय म्हणतील ही अगदी खास मध्यमवर्गीय भीती आहेच. पण त्याच वेळी ‘आयला, आपण पहिल… पुढे वाचा »
गुरुवार, १४ जून, २०१२
शोध तुकारामाचा
-
तुकाराम बोल्होबा आंबिले हे नाव – निदान विशी उलटलेल्या – मराठी माणसाला नवीन नाही. लिखित माध्यम असो, ध्वनि माध्यम असो वा चित्रपट माध्यम असो, यातील कोणतंही माध्यम असं नाही ज्यातून आपण तुकोबाला पाहिलं, अनुभवलं नाही. तुकोबाचे आपले भावबंध इतके अलवार आहेत, की तुकोबाचे नाव घेतले की आपण हळवे होतो. त्यामुळे तुकोबाच्या जीवनचरित्राशी आपण अगदी बांधले गेलेले आहोत. पण या भक्तिभावाची परिणती ही की तुकोबाचे चार निवडक अभंग, त्याची ‘कर्कशा’ पत्नी आवली, त्याचा प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेशी झालेला संघर्ष, इंद्रायणीतून पुन्हा वर आलेली त्याची गाथा नि त्याच्या सदेह वैकुंठागमनाचे गूढ एवढ्यात तुकोबारायाबद्दलची आपली माहिती – नि रुचीही – संपते. एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा विकास त्याची जडणघडण यावर प्रभाव पाडणारे अनेक घटक असतात. मानसशास्त्रात माणसाच्या व्यक्तिमत्त्व… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)










