Vechit Marquee

सूची: अनुक्रमे ▶ वर्गीकरण ▶ लेखमाला ▶ लक्षवेधी ◼

मंगळवार, २३ जून, २०२०

अगायायायायफोन


  • काही महिन्यांपूर्वी एका कार्यशाळेमध्ये आम्ही एका चित्रपटाचा शो आयोजित केला होता. मर्यादित लोकांसाठी असल्याने थिएटर नव्हते. तेव्हा सरळ लॅपटॉपवरुन प्रोजेक्टरला जोडावे असा प्लान होता. प्रोजेक्टर असो वा बाह्य मॉनिटर वा टीव्ही, वाटेल त्याला एक एचडीएमआय केबल जोडली की तो लॅपटॉप बिचारा निमूट चित्रपट वा गाण्याचा नळ सोडून पाणी वाहतं करतो असा अनुभव आमचा. पण आमचा माज साफ उतरला कारण दिग्दर्शक महाशयांचा लॅपटॉपचा धर्म वेगळा होता... साहेब आले ते अ‍ॅपल घेऊन. त्यांच्या त्या लॅपटॉपने आधी आमच्या प्रोजेक्टरकडे बघून नाक मुरडले नि ’पोरगी नकटी आहे, मी सोयरिक करणार नाही’ म्हणून जाहीर केले. मग एक यूएसबी फ्लॅशडिस्क ऊर्फ पेनड्राईव्हवर घेऊन तो प्रोजेक्टरला जोडू असे ठरले. तो प्रयोग सुरु झाला नि महाशय यूएसबीला नाके मुरडू लागले. मग दुसरा एक समंजस लॅपटॉप आणून तिला थोडा मेकप केला. आता साहेब राजी झाले. राजी झाले, अक्षता पडल्या. पण आता दादला नांदवायलाच तयार नाही. आता काय झाले बाबा? म्हणून दादापुता केला तर म्हणे, ’ही आधी दुसर्‍या घरी नांदून आलेली दुसरेपणाची बाईल मला दिलीत. ही माझ्या स्टेटसची नाही.’ मग पुन्हा नाकदुर्‍...

    पुढे वाचा »

रविवार, १४ जून, २०२०

जग जागल्यांचे ०९ - मोर्देशाय वानुनू: एक चिरंतन संघर्ष


  • वर्णभेदभेदी कॅथी हॅरिस « मागील भाग --- ७ जून १९८१, इराक अण्वस्त्रांसाठी उपयुक्त इंधन तयार करत असल्याचा आरोप करत त्या देशातील ओसिरॅक अणुभट्टीवर इस्रायलने बॉम्बवर्षाव केला. आजवर इस्रायलने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आपल्या अणुकार्यक्रमाबाबत कायम ’नरो वा कुंजरो वा’ भूमिका ठेवली होती. उघड झालाच, तर तो स्वसंरक्षणार्थ आहे अशी मखलाशी यातून करणे शक्य होते. त्यांच्याच एका तंत्रज्ञाने लवकरच तो उघड केलाही. त्याचे नाव मोर्देशाय वानुनू. एका कर्मठ ज्यू घरात जन्मलेला मोर्देशाय दहा वर्षांचा असताना आपल्या भलामोठ्या कुटुंबासह इस्रायलमध्ये स्थलांतरित झाला. लष्करी अभियांत्रिकी सेवेत तीन वर्षांच्या सक्तीच्या लष्करी सेवेनंतर सैन्यात भरती होण्याचा प्रस्ताव नाकारुन त्याने पुढील शिक्षणासाठी तेल अविव विद्यापीठात प्रवेश घेतला. शिक्षण संपल्यावर त्याने इस्रायलच्या ’निगेव अणुसंशोधन केंद्रा’त कामास सुरुवात केली. इथे वानुनूची आर्थिक प्राप्ती सरासरी इस्रायली नोकरदाराच्या कित्येक पट अधिक होती. एक सुस्थिर नि सधन आयुष्याची सुरुवात होत होती. रोजगार चालू असतानच १९७९ मध...

    पुढे वाचा »

अण्वस्त्रस्पर्धा आणि नग्न महासत्ता


  • इस्रायलच्या एका व्हिसलब्लोअरवर लेख लिहित होतो. जगाच्या डोळ्यात धूळ फेकून राबवलेल्या अणुकार्यक्रमांमधून इस्रायलने म्हणे १५० न्यूट्रॉन बॉम्ब बनवण्याइतके इंधन जमा केले आहे ! प्रश्न पडला... ... काय करायचे हो या १५० बॉम्ब्सचे? सांगा ना. नाही म्हणजे आमच्या डिस्नेच्या ’डकटेल्स’मधला अंकल स्क्रूज जसा आपले पैसे रोज मोजून खुश होतो तसे आहे का हे? की खरंच काही कामाचे आहेत इतके बॉम्ब? नाही, मी शांततावादी भूमिकेतूनही नाही, सध्या निव्वळ गणिती मूल्यमापनाच्या आधारे हा प्रश्न विचारतो आहे. इस्रायलची सारी शत्रू-शेजारी राष्ट्रे- अगदी सगळी इस्लामिक राष्ट्रे धरली तरी, उध्वस्त करायला असले ते पन्नास बॉम्ब्स सहज पुरतील. मग उरलेल्या शंभरेक बॉम्ब्सचे काय लोणचे घालायचे का हो ? कशासाठी निर्माण केले ते? का जमवले? उत्तर एकच, माणूस हा हपापलेला प्राणी आहे. उपयुक्ततेचा विचार न करता तो हपापलेपणे गरजेच्या कित्येक पट जमवत राहतो... जमवत राहतो. पैसा मिळतो म्हणून जमवत राहतो. मग खूप पैसा झाला, की त्या पैशातून - एकावेळी एकातच राहाता येत असूनही- एकाहुन अधिक घरे बांधतो. त्या...

    पुढे वाचा »

रविवार, ७ जून, २०२०

रंगार्‍याचा ब्रश


  • रंग लावण्याचा ब्रश हा परावलंबी असतो. भिंती(!)वर रंग लावण्याचे काम त्याचे असते खरे, पण रंग कोणता लावायचा ते डब्यात कोणता रंग आहे यावरुन ठरते. ’जा मी हा केशरी रंग लावणार नाही. लाल किंवा हिरवा आणलास तरच लावेन’ असे ब्रश कधी रंगार्‍याला सांगू शकत नाही. रंगार्‍याने निवडलेला रंग भिंतभर पसरवण्याचे काम तो इमानेइतबारे करत असतो. रंगार्‍याने आज लाल रंगाशी सलगी केली की ब्रश त्याचे फटकारे भिंतीवर मारतो. तो ओतून देऊन रंगार्‍याने ’केसरिया बालम’ निवडला की ब्रश त्या रंगाने भिंत रंगवून काढतो. थोडक्यात रंगार्‍याचा रंग बदलला की ब्रशचा रंग बदलतो, आणि त्याच्या "भिंती"चाही! ब्रशचा मालक असलेल्या रंगार्‍याच्या निष्ठा मात्र ब्रशइतक्या घनतेच्या नसतात, त्या तरल असतात. रोख पैसे मोजणार्‍या कुणाही घरमालकाच्या भिंतींना तो निवडेल तो रंग लावण्याची त्याची तयारी असते. त्यातही एका खोलीत एक रंग, दुसर्‍या खोलीत दुसराच अशी निवड असली तरी बिनतक्रार आपले काम करत राहतो. शिवाय रंग व्यवस्थित बसला नाही तर ब्रशच्या नावे खडे फोडून रंगारी तो फेकून देतो आणि नवा ब्रश आयात करतो. र...

    पुढे वाचा »

सोमवार, १ जून, २०२०

बेगिन, बालाकोट, बुश आणि अंधारातील अधेली


  • ७ जून १९८१ रोजी इस्रायलने इराकवरील ’ओसिरॅक’ अणुभट्टीवर हल्ला करुन ती उध्वस्त केल्याचे जाहीर केले. ’या अणुभट्टीमध्ये अण्वस्त्रांना आवश्यक असणारे इंधन बनवले जात आहे’ असा इस्रायलने आरोप केला होता. ’भविष्यात एक अण्वस्त्रसज्ज शेजारी निर्माण झाल्याने आमच्या राष्ट्राचे सार्वभौमत्व धोक्यात येईल. त्याविरोधात ’pre-emptive strike करण्यात आला, धोक्याला अंकुर फुटताच आम्ही तो खुडून टाकला’ असा दावा इस्रायलने केला. या हल्ल्याला ’ऑपरेशन ऑपेरा’ असे नाव देण्यात आले होते. या हल्ल्यामध्ये ही ’अणुभट्टी उध्वस्त केली’ असे इस्रायलने जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात तिचे बाह्य नुकसानच झाले होते. गाभ्याला फारसा धक्का लागला नव्हता. ती उभारणार्‍या फ्रेंच तंत्रज्ञांनी नंतर तिची डागडुजी करुन ती पुन्हा कार्यान्वित केली. याच धर्तीवर पुढे २००३ मध्ये असंख्य संहारक अस्त्रांच्या पर्वतावर बसलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी इराक सर्वसंहारक अस्त्रांची निर्मिती करत असल्याचा आरोप करत त्या देशावर हल्ला केला. ’ऑपरेशन ऑपेरा’ दरम्यान ज्या इराकच्या अणुभट्टीवर हल्ला झाला त्या इराकने अण्वस्त्र प्रसारबंदी करारा...

    पुढे वाचा »