Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

गुरुवार, २१ मे, २०२६

पास्ता आणि झुरळ


  • मुल्ला नसरुद्दिनचा म्हणून एक किस्सा सांगितला जातो— हे सारे किस्से ‘अपौरुषेय’ असल्याने त्यात सतत भर पडत असते. त्यातले काही सीमोल्लंघन करुन इतर देशांत तेनालीरामचे, बीरबलाचे, इसापचे... म्हणून प्रसिद्ध होतात. त्यांचे काही इकडे आयात केले जातात आणि ‘आपलेच मूळचे’ यावर फावल्या वेळात भांडायला मूर्ख जमातींना मुद्दे मिळून जातात— ते जाऊ दे. किस्सा असा की एकदा मुल्लाने लोकांची फिरकी घ्यायचे ठरवले. ‘आज मशिदीमध्ये अन्नदान होणार आहे नि कुणीही घरात चूल न पेटवता जेवणासाठी तिकडे जायचे आहे’ असे त्याने पसरवून दिले. लोक– विशेषत: स्त्रिया, खुश झाले. चला आज गोडधोड खायला मिळणार म्हणून सुखावले. ठरली वेळ झाली नि सगळॆ लोक ठेवणीतले कपडे घालून मशिदीकडे धावू लागले. पाचच मिनिटांत वसती ओस पडली. दोन-तीन मिनिटांत मुल्लाही ठेवणीतले कपडे घालून पिशवीत ताट-वाटी घेऊन निघाला.… पुढे वाचा »

बुधवार, १३ मे, २०२६

सत्ताकारण: बंगाल, भारत आणि त्यापलिकडे


  • नुकत्याच पार पडलेल्या बंगाल निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने मनोज अगरवाल यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक केली होती. तर त्यापूर्वी भाजपची बीजे पेरण्यासाठी आवश्यक नांगरट म्हणून पार पडलेल्या Special Intensive Revision ऊर्फ SIR साठी विशेष निरीक्षक म्हणून सुब्रतो गुप्ता यांची नेमणूक केली होती. या दोघांनीही आयोगाने नि भाजपने दिलेली कामे चोख पार पाडली नि भाजपचे सरकार आणण्यात आपला वाटा उचलला. निवडणूक आयोगाच्या या हस्तकांना आज नव्या भाजप सरकारने भरघोस बक्षीस दिले आहे. मनोज अगरवाल यांची बंगालचे मुख्य सचिव (Chief Secretary) म्हणून, तर सुब्रतो गुप्ता यांची मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे मुख्य सल्लागार म्हणून नेमणूक झाली आहे. गुजरात मॉडेल हे साधारणपणे असे आहे. जोरदार भाषणबाजीने जनतेला गार करुन सोडणारा बुवा म्हणून म्हणून मिरवले जात… पुढे वाचा »