-
महाराष्ट्र देशीचे उत्तर भारतीय जामात श्री. विवेक अग्निहोत्री यांनी मराठी वरणभाताला नाके मुरडताना ‘हे कसलं गरीबाचं खाणं. मी दिल्लीचा आहे. तेलाचा थर असणारं तिखट, मांसाहारी खाणं मला आवडतं’ अशी मुक्ताफळे उधळली आणि महाराष्ट्रदेशी संताप उसळला. तांबडा-पांढरा, अख्खा मसूर, वडा-भात, वांगे-भरीत, शेव-भाजी, चकोल्या वगैरेंनी आपले नेहमीचे वरणभाताशी असलेली ईर्षा तात्पुरती म्यान करुन त्यांस बाहेरून पाठिंबा देऊ केला. आम्हीही लोणच्यापासून पोह्यांपर्यंत सर्वत्र साखरेचा वर्षाव करणार्या जमातीशी तात्पुरते जुळवून घेतले. एकुण महाराष्ट्रदेशी दुर्मीळ असा एकोपा दृश्यमान झाला. मुळात अमुक खाणे हे फार शौर्याचे, तमुक खाणे दुय्यम अभिरुचीचे लक्षण वगैरे विनोदी समज नि त्यातून निर्माण झालेल्या अस्मिता हा केवळ महाराष्ट्रदेशीच नव… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
प्रासंगिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
प्रासंगिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५
पौरुषाचा कांगावा
गुरुवार, २२ मे, २०२५
क्रिकेटमधील उपेक्षितास दाद
-
क्रिकेटमध्ये पंच हा प्राणी तेवढाच लोकप्रिय आहे जेवढे निवडणूक प्रक्रियेमध्ये ईव्हीएम ! प्रातिनिधिक स्थिरचित्र. https://www.sportskeeda.com/ येथून साभार. आपण जिंकलो, तर ‘पंचाची कामगिरी नि:पक्ष होती’ असा गौरव करायचा किंवा ‘ते ही शेवटी माणूसच आहेत’ अशी मखलाशी करायची. जर हरलो, तर त्यांचा वापर हुकमी बळी म्हणून खापर फोडण्यास (म्हणजे हिंदुत्ववाद्यांसाठी मुस्लिम, पुरोगाम्यांसाठी मध्यमवर्ग वगैरे वगैरे) त्यांचा वापर करायचा हे ठरलेले असते. त्यातच DRS म्हणजे Digital Review System (त्यालाही मागास भारतीय मानसिकतेच्या बीसीसीआयने बराच काळ ‘बिनचूक नाही’ या बिनडोक तर्कास पुढे करुन रोखून धरले होते.) आल्यापासून पंच हे अधिकच दडपणाखाली काम करु लागले आहेत. त्यांना एखादा निर्णय मिलिसेकंदात घ्यायचा … पुढे वाचा »
बुधवार, २३ एप्रिल, २०२५
पहलगाम आणि आपण
-
काल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जीव गमावलेल्या देशवासियांच्या कुटुंबियांसोबत सहवेदना, संवेदना व्यक्त करण्याऐवजी, समाजमाध्यमांवर मोदी-धार्जिण्या नि मोदी-विरोधक गटांतील अनेक नीच मंडळींनी एकमेकांबद्दलच्या फसफसणार्या द्वेषाचे दर्शन घडवले. मोदी-धार्जिण्या मंडळींनी ‘मणिपूरवाले’ आता बोलत नाहीत असे एकतर्फी जाहीर करत त्या दंगलींच्या वेळी जो तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला होता त्याचे उट्टे काढले. तर यांच्या विरोधी गटातील अनेकांनी या निमित्ताने मोदींवर शरसंधान करण्याची संधी साधली; ‘मग मोदी नाही का अशा गोष्टींचं राजकारण करत?’ असा प्रश्न विचारुन एकप्रकारे मोदी-धार्जिण्यांचाच तर्क वापरला. जेणेकरुन आपल्या विरोधी गटाची नि आपली मानसिकता वेगळी नाही, केवळ बाजू वेगळी आहे हेच सिद्ध केले. अशा घटनांबाबत झालेल्या चुका, त्रुटी या… पुढे वाचा »
शनिवार, २९ मार्च, २०२५
अमेझिंग अॅमेझॉन
-
(कथा, प्रसंग नि एक पात्र काल्पनिक असले तरी अनुभव वास्तव आहे.) काल घरातील ‘धुलाई निर्जंतुकीकरण द्रव्य’ (laundry disinfectant) संपले होते. ते आणायचा होते. इतरही लहान-सहान गोष्टी आणायच्या होत्या म्हणून सकाळी-सकाळी अॅमेझॉनच्या दुकानात शिरलो. आत शिरताक्षणीच तेथील प्रतिनिधीने धडाधड माझ्या मागच्या खरेदी सूचीतल्या वस्तू समोर टाकायला सुरुवात केली. मी म्हटलं, “राजा थांब जरा. मला काय हवे ते मी पाहातो.” तर तो पुन्हा आतल्या दिशेन धावला बरीचशी माहितीपत्रके घेऊन परतला नि डिस्काउंट, एकावर-एक फ्री वगैरे स्कीम्सची माहिती देऊ लागला. मी म्हटलं, “मला फक्त लॉण्ड्री डिसइन्फेक्टन्ट हवा आहे. बाकी किरकोळ गोष्टी माझ्या मी घेईन.” “ओ: शोअर सर,” दोन्ही हात कमरेजवळ एकावर एक असे ठेवत तो अदबीने म्हणाला, कंबरेत किंचित झुकून त्याने एक पाऊल मागे घेतले नि धावत जाऊन (… पुढे वाचा »
बुधवार, १५ मे, २०२४
शब्दांनी हरवुनि जावे
-
आठ-दहा दिवसांपूर्वी गलगोटिया विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांचा राजकीय कारणासाठी उपयोग करून घेण्याचा प्रकार उघडकीस आला. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता - बहुधा- मतदार असलेल्या हे विद्यार्थी आपण इथे काय करत आहोत, हाती धरलेल्या घोषणापत्रांवर काय लिहिले आहे वगैरे बाबत अनभिज्ञ दिसत होते. सद्य राजकीय सामाजिक स्थितीचे प्रतिबिंबच त्यांच्या वर्तनात दिसत होते असे म्हणता येईल. या प्रकारात सर्वात धक्कादायक बाब ही की या प्रतिनिधीने काही जणांना त्यांच्या स्वत:च्या हातात असलेल्या घोषणापत्रावर काय लिहिले आहे हे वाचण्यास सांगितले असता इंग्रजीमध्ये लिहिलेले तर सोडाच काहींना मातृभाषा हिंदीमध्ये लिहिलेली ती घोषणाही वाचता येत नव्हती. यावरून त्यांच्या शिक्षणाबद्दल, यांना मतदार म्हणून मान्यता देण्यात घाई होते आहे का इत्यादि प्र… पुढे वाचा »
मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३
काका सांगा कुणाचे...?
-
महारठ्ठदेशी दुसरे बंड होई. राष्ट्रवादी नामे महाराष्ट्रवादी पक्षाचे दहा लोक शिंदे सरकारांच्या दरबारी रुजू होती. इतर अनेकांनी सरकारपक्षाकडे प्रयाण केल्याचे ऐकू येई. परंतु अध्यक्ष कानावर हात ठेवी. म्हणे आम्हांसी काई ठाऊक नाही. परंतु ठोस कारवाई ना करी. चेले सारे अधिवेशनाला दांडी मारिती. कुणाचा कोण काही कळेना होई. कार्यकर्ता संभ्रमित होई. दादांना पुसे, ’काका कोणाचे?’ दादा गालातल्या गालात हसे नि गुणगुणू लागे... ( शान्ताबाईंची क्षमा मागून.) ल ल्ला लला ललला, ल ल्ला लला ललला काका सांगा कुणाचे? काका माझ्या मोदींचे ! मोदी सांगा कुणाचे? मोदी माझ्या काकांचे ! चवल्यापावल्या (१) चळतात, सत्तेच्या रिंगणी धावतात नाना संगे दादा अन् भवती, सेनेचे शिंदेही धडपडती ! आभाळ हेपले वरचेवरी, का… पुढे वाचा »
सोमवार, ३१ जुलै, २०२३
बा कपिल देवा,
-
बा कपिल देवा, तुम्हांसि नव्या पिढीतील खेळाडूंचे पैसे पाहून पोटात दुखते हे बरे नव्हे. उठसूठ आयपीएलच्या नावे खडे फोडताना या प्रकारच्या बाजारू खेळाचे उद्गाते आपणच आहोत हे विसरु नये. आयपीएलपूर्वी ’झी’च्या सुभाष चंद्रा यांनी चालू केलेल्या ’इंडियन क्रिकेट लीग’चे (ICL) पहिले सूत्रधार आपणच होतात हे लोक विसरले असतील असे समजू नये. आयपीएल वा पैशाच्या मागे लागणारे खेळाडू ही वाईट गोष्ट असेल तर त्याची पायाभरणी दस्तुरखुद्द आपणच केलेली आहे. वृथा नैतिकतेचा आव आणू नये. याच आयपीएलमधून उभ्या केलेल्या पैशातून बीसीसीआयने घसघशीत पैशांची थैली आपल्या ओटीत घातली होती, तेव्हा दर्जेदार क्रिकेटचे रक्त आपल्या हाती लागले आहे असे तुम्हाला वाटले नसावे. २००७ साली ICL चे विजेतेपद मिळवणार्या चेन्नई सुपरस्टार्सचा कर्णधार स्टुअर्ट लॉ. सोब… पुढे वाचा »
रविवार, ३० जुलै, २०२३
आंब्याचे सुकले बाग
-
( कवि अनिल यांची क्षमा मागून.) आंब्याचे सुकले बाग, नासली सारी अढी बरळली छपरी मिशी, मु.पोस्ट सबनीसवाडी मनी तिच्या जळे आग, नेहरु नामे अंग भाजे गांधी नामे वणवा पेटे, ठणाठणा तोंड वाजे या दो नावांची लागे, झळ आतल्या जीवा गाभ्यातील जीवनरस, सुकत ओलावा किती जरी केला शंख, बोंबाबोंब केली आंब्याचे सुकले बाग, चारलोकी शोभा झाली - कवि स्वप्निल - oOo - पुढे वाचा »
शुक्रवार, २८ जुलै, २०२३
उंबरठ्यावरून
-
’ कुण्या एकाची सत्तागाथा ’ आणि 'ह्याला भाजप आवडत नाही...' या ’राजकीय विरहगीता’नंतर त्याच दोन मित्रांच्या राजकीय जीवनातील एक टप्पा. ( संदीप खरे यांची क्षमा मागून.) मन तळ्यात, मळ्यात… ताईच्या खळ्यात (१) ॥ध्रु.॥ सत्ता साजुकसा तूपभात त्याच्या नि तुझ्या ताटात ॥१॥ मनी खुर्चीचे मृगजळ तुझ्या हाकेची साद कानात ॥२॥ इथे काकाला सांगतो काही... काही बाही... तुझी-माझी गट्टी मनात ॥३॥ उतू जाई उर्मी चित्तातून तुझा सारथी (२) उभा दारात ॥४॥ माझ्या नयनी सत्ता-चांदवा आणि गूज तुझ्या डोळ्यात ॥५॥ - बोलिन खरे --- (१). शेतातील खळे. (२).ड् रायव्हर. - oOo - (‘बंडूची फुले’ या आगामी काव्यसंग्रहातील ‘दादा-नानांच्या कविता’ या विभागातून.) पुढे वाचा »
शनिवार, १ एप्रिल, २०२३
पदवीधरा...
-
(एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने खुद्द पंतप्रधानांची पदवी दाखवावी अशी मागणी केली. त्यावर पंतप्रधानांच्या राज्यातील न्यायालयाने त्या मुख्यमंत्र्याला २५,०००/- चा दंड केला. या अनुभवावरून संगीताचार्य गो. ल. माल यांनी अशा प्रकारची मागणी करणार्यांना इशारा देणारे हे पद रचले.) ( देवल मास्तरांची क्षमा मागून...) पदवीधरा हा बोध खरा जिज्ञासा कबरीं पुरा ॥ संशय खट झोटिंग महा देऊ नका त्या, ठाव जरा ॥ ईडीपिडा त्राटिका जशी । कवटाळिल ती, भीती धरा ॥ छिन्नमस्ता* ती बलशाली । आव मानितां, घाव पुरा ॥ --- * पूर्ण जीभ बाहेर काढलेलं महाकालीचं एक रूप. - oOo - गीत/संगीत गो. ल. माल नाटक: संशयलोळ चाल: चल झूठे कैसी... पुढे वाचा »
रविवार, ५ मार्च, २०२३
‘देस’: वैचारिक गोंधळाच्या कृतिशून्यतेचे नाटक
-
गेल्या दशका-दोन दशकांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्र, देश, देशभक्ती वगैरे विचार नि भावनांचे चलनात रुपांतर झाले आहे, आणि आर्थिक अरिष्टात सापडलेल्या एखाद्या देशाच्या चलनाप्रमाणे त्याचे अवमूल्यनही. साधारण २०१४ ते १९ दरम्यान यांचा वापर अक्षरश: सुट्या पैशांसारखा अरत्र-परत्र सर्वत्र होत होता. पण देशभक्ती म्हणजे काय? ती केवळ एक भावना आहे, की तिला कृतीची जोडही हवी? की त्याहून पुढचे पाऊल म्हणजे कुण्या ‘गुरुजीं’च्या आदेशानुसार केलेली ‘डायरेक्ट अॅक्शन’? त्याहीपूर्वीचे प्रश्न ‘देश म्हणजे काय?’, ‘माझा देश कोणता? या दोनही प्रश्नांचे उत्तर सैद्धांतिक, बौद्धिक पातळीवर द्यायचे की केवळ अनुसरणाच्या, हा ज्याच्या त्याचा निर्णय असतो. बहुसंख्या ही अर्थातच अनुसरणाचा मार्ग निवडते. पण पुढचा प्रश्न असा असतो की ज्यांना… पुढे वाचा »
Labels:
जिज्ञासानंद,
नाटक,
प्रासंगिक,
राजकारण,
विश्लेषण
शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३
फुकट घेतला मान
-
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या व्यावसायिक धोरणांबद्दल अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित करणारा अमेरिकास्थित ’हिन्डेनबर्ग’चा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यावर त्यांच्या शेअर्सनी गटांगळ्या खाण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यात स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि एलआयसी यांच्यामार्फत गुंतलेल्या सर्वसामान्यांच्या पैसा धोक्यात आला. अदानींनी मुद्द्यांचा प्रतिवाद करण्याऐवजी राष्ट्रवादाची ढाल पुढे केली. त्याला अनुसरून स्वयंघोषित राष्ट्रभक्तांचे बुद्धिहीन जथे अदानींच्या समर्थनार्थ धावले... ( शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर यांची क्षमा मागून...) “नाही खर्चली कवडी दमडी, नाही सांडिला घाम फुकट घेतला मान, भाऊ (१) मी फुकट घेतला दाम.” “कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे हुशारी; देशबंधूच्या बचतीतील मी, सहज … पुढे वाचा »
सोमवार, २५ जुलै, २०२२
भुभुत्कारुनी पिटवा डंका
-
मी प्रभातफेरीला जातो तो रस्ता चांगला चार-पदरी आहे. रस्त्याचा शेवटचा टप्पा एका वळणापाशी सुरु होतो नि साधारण चारशे मीटर अंतरावर स्टेडियमच्या दारात जाऊन तिथल्या वडाच्या झाडाला टेकून विश्रांती घेतो. त्यामुळे रहदारी नगण्य आणि म्हणून प्रभातफेरीला सोयीचा. सकाळी आमच्यासारखे नव-ज्येष्ठ नागरिक कानटोपी नि स्वेटर घालून, मफलर गुंडाळून काठी टेकत टेकत फिरत असतात. पण हे श्वानवंशीयांचे साम्राज्य आहे. रस्त्याच्या दोन्हीं टोकांना आणि अधेमध्ये पार्क केलेल्या चारचाकी गाड्यांच्या आधाराने यांचे टेहळणी बुरूज आपल्या राज्याचे संरक्षण करण्याचे काम डोळ्यात- आणि नाकांत- तेल घालून करत असतात. याचे उदाहरण म्हणून एक प्रसंग सांगतो. एके दिवशी माझी प्रभातफेरी चालू असताना मी रस्त्याच्या (किंवा भूमितीच्या भाषेत बिनचूकपणे सांगा… पुढे वाचा »
रविवार, ११ जुलै, २०२१
विम्बल्डनचा पावित्र्यभंग
-
टेनिसच्या चाहत्यांच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन ही चारी धाम यात्रा. प्रत्येक धामी तयार केलेल्या कोर्टनुसार कुठे कुठल्या प्रकारचा खेळ पाहायला जावे याचा अंदाज त्यांना असतो. फ्रेंच स्पर्धेसाठी मातीची कोर्ट वापरली जात असल्याने वेगापेक्षा चौफेर खेळाला (territorial play) अधिक महत्व असते. खेळणारी खेळाडू चतुरस्र नसेल तर तिचीची डाळ तिथे शिजत नाही. त्याच्या उलट विम्बल्डनचे. इथे हिरवळीची कोर्ट असतात. त्यामुळे इथे सर्व्ह अॅंड व्हॉली प्रकारचा खेळ अधिक होतो. यात चौफेर खेळापेक्षा अनेकदा बिनतोड (Ace) सर्व्हिस करणारी खेळाडू अधिक प्रभाव पाडत असते. त्याचबरोबर फ्रेंचमध्ये बेसलाईन (म्हणजे कोर्टाची कड) अधिक महत्वाची तर विम्बल्डनमध्ये नेटजवळ वर्चस्व गाजवू शकणार्या खेळाडूच्याला यशाची शक्यता अधिक असते. अमेरिकन स्पर्धेत कृत्रिम हार्डको… पुढे वाचा »
मंगळवार, ६ एप्रिल, २०२१
लॉकडाऊनची धुळवड
-
गेल्या वर्षी पहिला लॉकडाऊनमधील बंधने टप्प्या-टप्प्याने सैल करत दैनंदिन जीवन हळूहळू पूर्वपदावर येत होते. एक-दोन महिन्यात पुन्हा संसर्गाने उचल खाल्ली असता पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली. त्यावर पुण्यातील व्यापारी संघाचे अध्यक्ष म्हणाले, ’लॉकडाऊनमुळे काहीही फायदा झालेला नाही, कोरोना वाढतोच आहे.’ इतके ठाम विधान ऐकून मला हसू आले होते. अर्थात उलट दिशेने ’वा: लॉकडाऊनचा खूप फायदा झाला बघा’ म्हणून कुणी प्रत्युत्तर दिले असते तरी मला त्या ठामपणाचेही हसू आलेच असते. याचे कारण म्हणजे फायदा झाला नाही म्हणणारे ’नाही रे’ लोक किंवा झाला म्हणणारे ’आहे रे’ लोक हे दोघेही त्यांच्या पूर्वग्रह आणि मुख्य म्हणजे स्वार्थाच्या आधारे ’ठोकून देतो ऐसा जी’ करत असतात. त्या विधानांमागे माहिती, डेटा, विश्लेषण वा मूल्यमापनाचा भाग नसतो . … पुढे वाचा »
शनिवार, ५ डिसेंबर, २०२०
वाचाळ तू मैत्रिणी
-
(रमताराम यांच्या संकल्पित ’गीतमारायण’मधी एक गीत.) एका अभिनेत्रीला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आणि ती अभिनेत्री अचानक खूप बोलू लागली, सांगू लागली. एका चित्रपटदरम्यान झालेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झालेल्या अफेअरची चर्चा तिने माध्यमांत रंगवली. संतप्त झालेल्या अभिनेत्याने तिच्याशी कोणताही संबंध असल्याचे नाकारले. बर्याच धुरळ्यानंतर तो वाद शांत झाला. मग अभिनेत्रीने राजकारणातील व्यक्तिंसह बॉलिवूडमधील अनेक सहकार्यांना लक्ष्य केले. बरीच उलथापालथ झाली. त्या अभिनेत्याबाबतच्या वादाचे पडसादही अधूनमधून वर येऊ लागले. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या पार्टीमध्ये अचानक हे दोघे समोरासमोर आले. तिला पाहताच तो अभिनेता संतापाने थरथरु लागला आणि गाऊ लागला... भाष्यचित्रकार: सतीश आचार्य. … पुढे वाचा »
सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०
मुंबईत वीज गेली...
-
मुंबईत वीज गेली म्हणून फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना आणखी एक निषेधाचे पत्र लिहिले चंद्रकांत पाटलांनी राज्यपालांची भेट घेतली दरेकरांनी गेटवेवर अर्धा तास उपोषण केले आणि एका राणेंनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंना जबाबदार धरले पंजाबमधील शेतकर्यांना पाठिंबा देणारा नवा लेख संजय राऊत यांनी लिहिला. कंगनाने ट्विट करुन त्यातील व्याकरणाच्या चुका जाहीर केल्या काँग्रेस नि राहुल गांधींनी काय करावे यावर कम्युनिस्ट विचारवंताने एकशे तेरावा लेख लिहिला आणि सायक्लोस्टाईल करुन आपल्या मित्रांना पाठवला माहिती अधिकाराचा वापर करुन मोराच्या पिसांची संख्या राहुल गांधीनी माहिती करुन घेतली कपिल सिब्बल यांनी त्याबाबत सोनियांकडे तक्रार केली आपले तिकिट कापण्यामागे मुंबई पोलिसाचे षडयंत्र असल्याचा गुप्त … पुढे वाचा »
रविवार, १२ जानेवारी, २०२०
दाद द्या अन् शुद्ध व्हा
-
जेमतेम सकाळ. चहा घेऊन डोळ्यातली उरली-सुरली झोप घालवण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता नि फोन वाजतो. नंबर अपरिचित. सोशल मीडियाबाहेर संपूर्ण अॅंटि-सोशल असलेल्याने अपरिचित क्रमांकावरुन फोन येण्याची शक्यता जवळजव्ळ शून्य. तेव्हा बहुधा राँग नंबर असावा असे गृहित धरुन अनिच्छेनेच उचलता. बोलणारा नाव नि गाव सांगतो नि आपला तर्क बरोबर ठरणार याची खात्री होऊ लागते. पण बोलणारा अचानक परिचित विषयावर बोलू लागतो नि तुमची झोप ताबडतोब पळून जाते. फोन करणारी व्यक्ती पंढरपूर जवळच्या एका गावातील शेतमजूर असते, दलित चळवळीत सक्रीय असणारी आणि स्वत: पूर्वी 'लोकमत’सारख्या वृत्तपत्रांतून थोडेफार लेखन केलेली. पण कौटुंबिक कारणाने शहराकडून पुन्हा गावाकडे परतलेली. तुमचा लेख सकाळी वाचून तातडीने फोन करुन तो आवडल्याचे सांगतानाच त्या अनुषंगाने त्यांचे स्वत:चे विचार मांडत जाते… पुढे वाचा »
बुधवार, १८ डिसेंबर, २०१९
गुड बाय डॉक्टर
-
नेहरु म्हणजे केवळ ’एडविना’ नव्हे सावरकर म्हणजे केवळ ’माफी’ नव्हे पाडगांवकर म्हणजे केवळ ’सलाम’ नव्हे लागू म्हणजे केवळ ’देवाला रिटायर करा’ नव्हे खरंतर या चौघांच्या आयुष्यातील या चार गोष्टी हे खरेतर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे व्यवच्छेदक लक्षण नाहीत, उलट अपवाद अथवा प्रासंगिक मुद्दे आहेत. देशाच्या इतिहासातील नेहरुंच्या अजोड स्थानाऐवजी ज्यांना एडविना आठवते ते बिचारे नेहरुंच्या शिरापर्यंत पाहू शकत नाहीत इतके खुजे असतात. सावरकर म्हणजे माफी अथवा हिंदुत्ववादीच म्हणणारे त्यांचा द्वेष करायचा हे आधी ठरवून त्यानुसार पाहात असतात. पाडगांवकरांसारख्या अस्सल सौंदर्यवादी कवीची ओळख ’सलाम’ या कृत्रिमपणे रचलेल्या, तद्दन प्रचारकी कवितेने होते हे त्यांचे दुर्दैव. समांतर चित्रपटांपासून मेनस्ट्रीम चित्रपट, नाटक असा व्यापक पैस असणार्या लागूंवर स्तुतीवर… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)


















