-
(कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या चरणी हे विडंबन सादर...) भातुकलीच्या खेळामधलीं तात्या आणिक कोणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥ तात्या वदला, “मला न कळली, शब्दांविण तव-भाषा घरी पोचतां, पुसिन तेथील, धुरकटलेल्या कोषा (१) ” का कमळीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी ? ॥१॥ कमळी वदली बघत एकटक लाल-लाल तो तारा “उद्या पहाटे दुसर्या वाटा, तिज्या गावचा वारा” पण तात्याला उशिरा कळली, गूढ अटळ ही वाणी ॥२॥ तिला विचारी तात्या, “का हे हात असे सोडावे ? त्या दैत्याने माझ्याआधी, तूंस असे कवळावे ?” या प्रश्नाला उत्तर नव… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५
अर्ध्यावरती डाव मोडला...
बुधवार, ११ जून, २०२५
काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता
-
(मागच्या पोस्टमध्ये ‘खाण्यावरती बोलू काही’ म्हणून जे बोलायचे ते बोलून घेतले. पण आता असे लक्षात आले की अजूनही थोडे बोलायचे राहिले आहे. एखादा पदार्थ आवडला की पोट भरल्यावरही भूक असल्याची भावना शिल्लक राहाते ना, तसे काहीसे. म्हणून ही खाद्यावरची दुसरी पोस्ट, वेगळ्या वाटेवरून जाणारी.) मराठी काव्यक्षेत्र हे निरंतर फळते-फुलते– काहींच्या मते फसफसते (म्हणजे द्रव कमी नि फेस जास्त) असे क्षेत्र आहे. माझ्या फेसबुक वास्तव्या-दरम्यान दररोज किमान दहा मराठी कवितांचे आगमन होते असा अनुभव आहे. पण अशा संपृक्त जगात जी विषमता दिसते, त्याने आमचे मन नेहेमी विषण्ण असते (१) . अगदी रांगोळी टिंबांच्या कहाण्या, हिमालयाची उशी करुन झोपण्याच्या वल्गना करणार्या किंवा कवितेची चूळ थुंकून जगाला भस्म करुन टाकू इच्छिणार्या महत्त्वाकांक्षा... वगैरे ‘हायर कविते’चे क्षेत्र त… पुढे वाचा »
रविवार, ११ मे, २०२५
Will He...?
-
रोममधील कॅथलिक चर्चचे सर्वोच्च धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर नवे पोप म्हणून चर्चच्या सर्वोच्चपदी आरूढ झालेले Robert Fancis Prevost हे गणित विषयातील पदवीधर आहेत. या संयोगवश सुचलेली ही कविता. Will He...? Pope Leo XIV Is it a new hope, if a Mathematician becomes a Pope? Will he count fractions, and not just whole numbers? Will he be rational, filter out infinite irrational? Will he prefer integration over the age-old differentiation? Will he draw a line with a color other than white? Will he connect to the point outside his circle? Will he...? पुढे वाचा »
बुधवार, २३ एप्रिल, २०२५
पहलगाम आणि आपण
-
काल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जीव गमावलेल्या देशवासियांच्या कुटुंबियांसोबत सहवेदना, संवेदना व्यक्त करण्याऐवजी, समाजमाध्यमांवर मोदी-धार्जिण्या नि मोदी-विरोधक गटांतील अनेक नीच मंडळींनी एकमेकांबद्दलच्या फसफसणार्या द्वेषाचे दर्शन घडवले. मोदी-धार्जिण्या मंडळींनी ‘मणिपूरवाले’ आता बोलत नाहीत असे एकतर्फी जाहीर करत त्या दंगलींच्या वेळी जो तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला होता त्याचे उट्टे काढले. तर यांच्या विरोधी गटातील अनेकांनी या निमित्ताने मोदींवर शरसंधान करण्याची संधी साधली; ‘मग मोदी नाही का अशा गोष्टींचं राजकारण करत?’ असा प्रश्न विचारुन एकप्रकारे मोदी-धार्जिण्यांचाच तर्क वापरला. जेणेकरुन आपल्या विरोधी गटाची नि आपली मानसिकता वेगळी नाही, केवळ बाजू वेगळी आहे हेच सिद्ध केले. अशा घटनांबाबत झालेल्या चुका, त्रुटी या… पुढे वाचा »
मंगळवार, १८ मार्च, २०२५
वांझ राहा रे
-
(कालच्या नागपूर दंगलीच्या निमित्ताने...) हे जे काही भयंकर घडते आहे ते ‘त्यांच्यामुळे’ यावर समस्तांचे एकमत झाले... . . ... प्रत्येकाच्या मनात ‘ते’ कोण याची व्याख्या वेगळी होती इतकंच. कुणी म्हणाले हे मुस्लिमांचे पाप (आणि रमताराम अर्बन नक्षल आहेत) कुणी म्हणाले हे हिंदुत्ववाद्यांचे पाप (आणि रमताराम छुपे संघी आहेत) कुणी म्हणाले हे बामणांचे पाप (आणि रमताराम मनुवादी आहेत) कुणी म्हणाले हे फ्रस्ट्रेटेड बहुजनांचे पाप (आणि रमताराम ब्रिगेडी आहेत) कुणी म्हणाले हे पुरोगाम्यांचे पाप (आणि रमताराम अंधभक्त आहेत) कुणी म्हणाले, हे मध्यमवर्गीयांचे पाप (आणि रमताराम वर्गद्रोही आहेत) --- रमताराम म्हणाले: Photo by Maan Limburg on Unsplash तुमच्या बीजातच विष आहे! वांझ राहा रे, वांझ रा… पुढे वाचा »
मंगळवार, ३० एप्रिल, २०२४
मी लिंक टाकली
-
संसदीय निवडणुकांची धामधूम चालू असल्याने समाजमाध्यमांवर असणारे ट्रोल्स सक्रीय होत आहेत. सत्ताधार्यांच्या सोयीसाठी कोणत्याही मुद्द्याला हिंदू-मुस्लिम वादाचा तडका देण्यास ते तत्पर होऊ लागले आहे. अनेक तोंडांनी, हातांनी आणि अकाउंट्समधून प्रसवलेले प्रचारसाहित्य परस्परांच्या लेखन-लिंक्स नि दाखले देत वेगाने पसरवणे चालू आहे.पावसाळ्याच्या तोंडावर जसे बेडकांचे ड्रांव ड्रांव अधिक कर्कशपणे ऐकू येऊ लागते, तसेच यांचे दुर्दरगान निवडणुकीच्या पुढील टप्प्यांत अधिक कर्कश होत जाईल. स्वत:च्या जिवाची बाजी लावून मालकाला संभाव्य धोका वाटणार्या प्रत्येकावर भुंकणार्या श्वानाप्रमाणे यांचे वर्तन होत असते. वारयोषिता स्वत:चे पोट जाळण्यासाठी चोळीची गाठ सोडते; हे मालकाला आपला दलाल मानून त्याच्यासाठी आपली चोळी त्यागतील नि आपल्या अब्रूला त्याच्या राजकीय समर्थनाच्या बाजा… पुढे वाचा »
बुधवार, ६ मार्च, २०२४
दीक्षितांच्या जगन्नाथाप्रत—
-
Photo credit: ShotPrime via Canva. ( ज. के. उपाध्ये यांची क्षमा मागून...) ‘घसरतील पँट जरा, मम डाएट अनुसरता’। वचने ही गोड-गोड देशि जरी आता ॥ध्रु.॥ सलाड समोरी आल्यावर भूक ही निमाली । चमचमीत खाद्य विविध, विविध पेयेही स्मरली । गुंतता तयांत, कुठे वचन आठविता ॥ स्वैर तू पतंग, जनि भाषण झोडणारा । ‘सहजी होय वजन-घट’, नित ऐसे फेकणारा । दाविशी कुणी, ‘हा पाहा, कसा लठ्ठ होता’ ॥ जठरातील या भूक, तुज जाणवेल का रे ? जिंव्हा नच, कृत्याच (१) कवण, उमगेल का रे ? यापरता दृष्टिआड होऊनि जा आता ॥ - oOo - (१). कृत्या(उच्चारी: कृत्त्या). एक राक्षसी, विशिष्ट विध्वंसक हेतू मनात ठेवून तंत्रसाधनेच्या आधारे जिची निर्मिती वा आवाहन केले जाते. [↑] पुढे वाचा »
सोमवार, २३ ऑक्टोबर, २०२३
शतक हुकलेल्या खेळाडूप्रत—
-
दिनांक: २२ ऑक्टोबर २०२३ भारताचा प्रमुख आधारस्तंभ फलंदाज विराट कोहली दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याच्या उंबरठ्यावर असताना बाद झाला. नव्वदीमध्ये रेंगाळलेला कोहली ९५ धावांवर खेळत असताना एकाच षटकाराने शतकाकडे उडी मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. मिडविकेटला एक सोपा झेल देऊन तो बाद झाला. तो नव्वदीत पोहोचल्यापासून उत्कंठेने श्वास रोखून सामना पाहात असलेल्या त्याच्या चाहत्यांची दारूण निराशा झाली. एकीकडे आपल्या आवडत्या खेळाडूचे शतक नि विक्रम हुकला याचे वैफल्य आणि असा बेजबाबदार फटका मारून बाद झाल्याबद्दलचा राग व वैताग या दोहोंतून व्यक्त झालेली ही संमिश्र भावना. --- ( कवि अनिल यांची क्षमा मागून ...) आज अचानक विकेट पडे ॥ ध्रु.॥ भलत्या वेळी भल… पुढे वाचा »
मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३
काका सांगा कुणाचे...?
-
महारठ्ठदेशी दुसरे बंड होई. राष्ट्रवादी नामे महाराष्ट्रवादी पक्षाचे दहा लोक शिंदे सरकारांच्या दरबारी रुजू होती. इतर अनेकांनी सरकारपक्षाकडे प्रयाण केल्याचे ऐकू येई. परंतु अध्यक्ष कानावर हात ठेवी. म्हणे आम्हांसी काई ठाऊक नाही. परंतु ठोस कारवाई ना करी. चेले सारे अधिवेशनाला दांडी मारिती. कुणाचा कोण काही कळेना होई. कार्यकर्ता संभ्रमित होई. दादांना पुसे, ’काका कोणाचे?’ दादा गालातल्या गालात हसे नि गुणगुणू लागे... ( शान्ताबाईंची क्षमा मागून.) ल ल्ला लला ललला, ल ल्ला लला ललला काका सांगा कुणाचे? काका माझ्या मोदींचे ! मोदी सांगा कुणाचे? मोदी माझ्या काकांचे ! चवल्यापावल्या (१) चळतात, सत्तेच्या रिंगणी धावतात नाना संगे दादा अन् भवती, सेनेचे शिंदेही धडपडती ! आभाळ हेपले वरचेवरी, का… पुढे वाचा »
रविवार, ३० जुलै, २०२३
आंब्याचे सुकले बाग
-
( कवि अनिल यांची क्षमा मागून.) आंब्याचे सुकले बाग, नासली सारी अढी बरळली छपरी मिशी, मु.पोस्ट सबनीसवाडी मनी तिच्या जळे आग, नेहरु नामे अंग भाजे गांधी नामे वणवा पेटे, ठणाठणा तोंड वाजे या दो नावांची लागे, झळ आतल्या जीवा गाभ्यातील जीवनरस, सुकत ओलावा किती जरी केला शंख, बोंबाबोंब केली आंब्याचे सुकले बाग, चारलोकी शोभा झाली - कवि स्वप्निल - oOo - पुढे वाचा »
शुक्रवार, २८ जुलै, २०२३
उंबरठ्यावरून
-
’ कुण्या एकाची सत्तागाथा ’ आणि 'ह्याला भाजप आवडत नाही...' या ’राजकीय विरहगीता’नंतर त्याच दोन मित्रांच्या राजकीय जीवनातील एक टप्पा. ( संदीप खरे यांची क्षमा मागून.) मन तळ्यात, मळ्यात… ताईच्या खळ्यात (१) ॥ध्रु.॥ सत्ता साजुकसा तूपभात त्याच्या नि तुझ्या ताटात ॥१॥ मनी खुर्चीचे मृगजळ तुझ्या हाकेची साद कानात ॥२॥ इथे काकाला सांगतो काही... काही बाही... तुझी-माझी गट्टी मनात ॥३॥ उतू जाई उर्मी चित्तातून तुझा सारथी (२) उभा दारात ॥४॥ माझ्या नयनी सत्ता-चांदवा आणि गूज तुझ्या डोळ्यात ॥५॥ - बोलिन खरे --- (१). शेतातील खळे. (२).ड् रायव्हर. - oOo - (‘बंडूची फुले’ या आगामी काव्यसंग्रहातील ‘दादा-नानांच्या कविता’ या विभागातून.) पुढे वाचा »
शुक्रवार, १२ मे, २०२३
जल्पकांस—
-
( शाहीर रामजोशी यांच्या पायीच्या धूलिकणातून फुटलेला अंकुर) ’कोर्ट’ चित्रपटामध्ये शाहिराच्या भूमिकेत वीरा साथीदार. गटागटाने ट्विटा मारूनि सोटा धरिशी का मनीं जगाची उठाठेव कां तरी? पोस्टीत अथवा ट्विटेत (१) हो का, रिळांत (२) घ्या हो कधी स्नेहाचे नांव निज अंतरी काय मनांत धरूनि इतरांशी वाकडे ही काय जगाचे हित करतिल माकडे आंतून थरकती, बाहेर वीर फाकडे अगा शेळपटा उगा स्वत:ला शूर म्हणविसी गड्या करुनि फुकाच्या काड्या भला जन्म हा तुला लाभला मनुष्यप्राण्याचा धरिशी का डूख अहि (३) सारखा ट्विटेट्विटेवर शिळा पडो या, बिळांत लपुनि फेका तरिही न होय ’तयाची’ (४) कृपा दर्भ वृत्तीचा मनीं धरोनी टोचशी कोणा फुका जाळिशी तव रुधिराला वृथा गुंडउदंडउद्दंड झुंड झुंडीची कृपा न सार्थक, वांझच सार… पुढे वाचा »
शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३
कविचा वडा
-
https://pixers.hk/ येथून साभार. “डोंगराला आग लागलेली आहे... डोंगराला आग लागलेली आहे, आणि तू बटाटेवडा खातो आहेस...?” कविता सादर करणार्या कविने माझ्याकडे बोट दाखवले. मी दचकलो! बटाटेवडा निसटून चटणीमध्ये... आणि ड्रग्जचा व्हावा तसा मला चटणीचा ओव्हरडोस “... याला तूच जबाबदार आहेस!” ऐकणार्या चार जणांकडे फिरवून कविने बोट माझ्यावर रोखले. “पण मी कुठे लावली ती आग?” मी वड्यापासून तिखट चटणी निपटून काढत विचारले. “पण ती लागताक्षणीच विझवायला धावलाही नाहीस तू.” कविने डोळे वटारत म्हटले. “तू तरी कुठे विझवायला गेलास?” मी हेत्वारोप कम व्हॉटअबाऊटरी असा दुहेरी राष्ट्रीय तर्क अनुसरला. “पण मी कवी आहे आणि कविता वाचतो आहे.” कवी छाती फुगवून म्हणाला. “मी ही खादाड आहे आ… पुढे वाचा »
सोमवार, २४ एप्रिल, २०२३
ह्याला भाजप आवडत नाही... (ऊर्फ इलेक्शनचा ’गारवा’)
-
(’ कुण्या एकाची सत्तागाथा ’ या ’राजकीय विरहगीता’नंतर त्याच दोन मित्रांच्या राजकीय जीवनातील एक टप्पा.) (कवि सौमित्र यांची क्षमा मागून...) ह्याला भाजप आवडत नाही, त्याला भाजप आवडतो. निकाल हाती आल्यावर हा त्याच्या तावडीत सापडतो. ’मी तुला आवडतो, पण भाजप आवडत नाही, असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही.’ ’भाजप म्हणजे चिखल सारा, एक तू सुदृढ कमळ.’ ’भाजप म्हणजे हुकमी सत्ता, अमित किती प्रेमळ.’ ’भाजप नंतर दगा देतो, भाजप दगाबाजी’ ’भाजप म्हणजे वॉशिंग-मशीन, भाजप तरती होडी.’ ’भाजप म्हणजे मुरगळल्या माना, भाजप म्हणजे मुकी वरात.’ ’भाजपमध्ये, तपासातून सुटून, मन होऊन बसतं निवांत.' जेव्हा जेव्हा इलेक्शन येते, दरवेळी असं होतं सरकारवरून भांडण होऊन, लोकांमध्ये हसं होतं भाजप आवडत नसला, तरी … पुढे वाचा »
मंगळवार, १८ एप्रिल, २०२३
कुण्या एकाची सत्तागाथा (एक राजकीय विरहगीत )
-
राजकीय आखाड्यामध्ये एका राजकीय नेत्याच्या विरोधी पक्षनेत्याशी असणार्या साट्यालोट्याबद्दल सतत कुजबूज होत असते. एका पंच पंच उष:काली दोघांनी बांधलेली गाठ ज्येष्ठांच्या आशीर्वादाअभावी सोडावी लागल्यानंतर त्यांच्यातील संबंधांबद्दल अधूनमधून वावड्या उठत असतात. त्यात कितपत तथ्य आहे ते त्या दोघांनाच ठाऊक. एक नक्की, भूतकालातील त्या आशादायी पहाटेची आठवण काढत त्यांच्यातील एक जण संध्याकाळी उदास फिरताना दिसतो. एका हताश क्षणी त्याने शब्दबद्ध केलेली आपली विरहवेदना... https://www.bhaskar.com/ येथून साभार (कविवर्य ’ आरती प्रभू ’ यांची क्षमा मागून...) तो येतो आणिक जातो येताना कधी सह्या आणितो अन् जाताना चिठ्या मागतो येणे-जाणे, देणे-घेणे असते सारे जे न कधी तो सांगतो येताना क… पुढे वाचा »
शनिवार, १ एप्रिल, २०२३
पदवीधरा...
-
(एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने खुद्द पंतप्रधानांची पदवी दाखवावी अशी मागणी केली. त्यावर पंतप्रधानांच्या राज्यातील न्यायालयाने त्या मुख्यमंत्र्याला २५,०००/- चा दंड केला. या अनुभवावरून संगीताचार्य गो. ल. माल यांनी अशा प्रकारची मागणी करणार्यांना इशारा देणारे हे पद रचले.) ( देवल मास्तरांची क्षमा मागून...) पदवीधरा हा बोध खरा जिज्ञासा कबरीं पुरा ॥ संशय खट झोटिंग महा देऊ नका त्या, ठाव जरा ॥ ईडीपिडा त्राटिका जशी । कवटाळिल ती, भीती धरा ॥ छिन्नमस्ता* ती बलशाली । आव मानितां, घाव पुरा ॥ --- * पूर्ण जीभ बाहेर काढलेलं महाकालीचं एक रूप. - oOo - गीत/संगीत गो. ल. माल नाटक: संशयलोळ चाल: चल झूठे कैसी... पुढे वाचा »
रविवार, २६ मार्च, २०२३
राजसा, किती दिसांत...
-
उशीरा केलेल्या आंघोळीदरम्यान पकडलेला Eureka moment... ( लग्नापूर्वी प्रियेसाठी चंद्रावर जाण्यास सिद्ध असलेला प्रियकर नवरा नि बाप झाला की स्नानासाठी मोरीपर्यंत जाण्यासही उत्सुक नसतो. अति झालं म्हणजे त्याची पूर्वीची प्रिया नि आताचं खटलं त्याला निर्वाणीचा इशारा देते.) ( कविवर्य सुरेश भट यांची क्षमा मागून.. .) आंघोळून टाक आज, विसळून अंग अंग राजसा किती दिसांत न्हायला नाहीस सांग त्या तिथे जुन्या खणात, पेंगतो तव गंजिफ्रॉक हाय रे नको तयाचे, झोपेतच होणे दुभंग दूर दूर राहतो बघ, रुसला तुझाच लेक साहवेना त्या जराही, प्राचीन तव देहगंध गार गार या हवेत घेऊनी पंचा समेत मोकळे करून टाक एकवार सर्व अंग काय हा तुझा रे श्वास, दर्प हा इथे भकास बोलावण्यास तुला, उठला पाण्यावरी त… पुढे वाचा »
सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३
सत्तेचे सोपान
-
कधी पापा, पाठीवर थापा कधी हपापा, कधी गपापा कधी थट्टा, कधी रट्टा कधी सत्ता, कधी बट्टा कधी चंदन, कधी भंजन कधी खंडन, कधी भांडण कधी झेंडा, कधी दंडा कधी चंदा, कधी गुंडा कधी थाप, कधी व्हॉट्स-अॅप कधी चाप, कधी मार-काप कधी खांदा, कधी फंदा नाही मंदा, कधी धंदा - रमताराम पुढे वाचा »
शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३
फुकट घेतला मान
-
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या व्यावसायिक धोरणांबद्दल अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित करणारा अमेरिकास्थित ’हिन्डेनबर्ग’चा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यावर त्यांच्या शेअर्सनी गटांगळ्या खाण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यात स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि एलआयसी यांच्यामार्फत गुंतलेल्या सर्वसामान्यांच्या पैसा धोक्यात आला. अदानींनी मुद्द्यांचा प्रतिवाद करण्याऐवजी राष्ट्रवादाची ढाल पुढे केली. त्याला अनुसरून स्वयंघोषित राष्ट्रभक्तांचे बुद्धिहीन जथे अदानींच्या समर्थनार्थ धावले... ( शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर यांची क्षमा मागून...) “नाही खर्चली कवडी दमडी, नाही सांडिला घाम फुकट घेतला मान, भाऊ (१) मी फुकट घेतला दाम.” “कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे हुशारी; देशबंधूच्या बचतीतील मी, सहज … पुढे वाचा »
गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२
श्रावण सजणी श्रावण गं
-
( गीतकार पी. सावळाराम यांची क्षमा मागून) श्रावण सजणी श्रावण गं, पाळिन कधीतरी श्रावण गं ॥धृ.॥ रटरटणारी चिकन-सागुती, फसफसणारे रंगीत पाणी नित्य घालते मला मोहिनी... श्रावऽण*! पातेल्यातील गंधित वारे, पिसाट फिरता जठर उफाळे झरझर वाढीत फिरते रमणी... श्रावऽण! रंगीत पाणी, मादक धुंदी, गात्रीं भरुनी मनात शिरली मोहाचा क्षण, झापड नयनी... श्रावऽण! - गीतकार: पी. रमताराम - oOo - (* हा शब्द टाहो फोडल्यासारखा दु:खार्त उच्चारणे आवश्यक) पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)