![HeyThatsBoccoli](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgafCOmpKf6eJJXzkElROrJxSgkd0Lm2fv7r_BgPS4194ckTSMO4imYIy_ZJZYTLHvMakkXkeFELI790LslHeT2_vsZ3NvE2DVbvgnSNfdv1qRFhz7jh4nfYyimR7wNS6k-gj-oCTwMXIavQytF-9lSXGyU7kW2ywUpLeQM2QlrWMRgcORfP1gb9J703A/s320/HeyThatsBoccoli.jpg)
( गीतकार पी. सावळाराम यांची क्षमा मागून) श्रावण सजणी श्रावण गं, पाळिन कधीतरी श्रावण गं ॥धृ.॥ रटरटणारी चिकन-सागुती, फसफसणारे रंगीत पाणी नित्य घालते मला मोहिनी... श्रावऽण*! पातेल्यातील गंधित वारे, पिसाट फिरता जठर उफाळे झरझर वाढीत फिरते रमणी... श्रावऽण! रंगीत पाणी, मादक धुंदी, गात्रीं भरुनी मनात शिरली मोहाचा क्षण, झापड नयनी... श्रावऽण! - गीतकार: पी. रमताराम - oOo - (* हा शब्द टाहो फोडल्यासारखा दु:खार्त उच्चारणे आवश्यक)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा