Vechit Marquee

सूची: अनुक्रमे ▶ वर्गीकरण ▶ लेखमाला ▶ लक्षवेधी ◼

शुक्रवार, ३० मार्च, २०१८

‘माझा’ धर्म आणि मी


  • धर्म ही स्वीकारण्याची, अनुसरण्याची गोष्ट आहे, लादण्याची नव्हे. माझा धर्म कोणता हे मीच ठरवणार, अन्य कुणी ठरवून कसे चालेल? जर मी ‘पास्ताफारियन’ आहे आणि मी ‘फ्लाईंग स्पागेती मॉन्स्टर’ या देवाची पूजा करणार आहे, तर इतर कुणी त्यावर कसे काय आक्षेप घेऊ शकतील? जन्मजात मिळालेला धर्म हाच तुमचा धर्म असला पाहिजे, असे बंधन जगाच्या पाठीवर कुठेही नाही . पण बहुतेक माणसे आळशी असतात. वारशाने, अनायासे जे मिळाले तेच श्रेष्ठ मानून चालतात. इथवर ठीक असते. पण इथेच न थांबता, पुढे इतरांनीही ते मानावे म्हणून आग्रह धरतात, इतरांचा धर्म मोडून काढायचा प्रयत्न करतात. हा मूर्खपणा तर आहेच, पण इतरांच्या अधिकारांचे उल्लंघनही आहे. आम्ही बहुसंख्य आहोत म्हणजे आम्ही म्हणू तसे नियम, हे बहुमताच्या राजकीय व्यवस्थेबाबत खरे आहे. पण तोच नियम धार्मिक बाबतीत लावता येणार नाही. राजकीय व्यवस्था ही केवळ तेवढ्याच धार्मिक गोष्टींत हस्तक्षेप करु शकेल, जिच्या द्वारे तिच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी, सामाजिक परस्परसंबंध, हक्क नि आचारसंहिता, संपत्तीचा विनियोग इत्यादि बाबतीत संघर्ष होऊ शकत...

    पुढे वाचा »

बुधवार, २८ मार्च, २०१८

मास्तरकीचे दिवस


  • मी गणिताचा मास्तर होतो. राजकारण्याला जशा निवडणुका चुकत नाहीत, तशा मास्तरला परीक्षांचे पेपर सेट करणे नि तपासणे हे भोग टळत नाहीत. अशाच एका पेपरमध्ये एका टॉपरच्या पेपरमध्ये एका प्रश्नाच्या उत्तराला – जे पूर्ण चूक होते – मी शून्य मार्क दिले. ती माझ्याकडे विचारणा करायला आली. मी ते गणित कसे सोडवायचे ते दाखवून, रीत आणि उत्तर दोन्ही समजावून दिले, आणि तुमचे दोनही चुकले हे पटवून दिले. ते मान्य करुनही तिचा तर्क होता, ‘पण इतके लिहूनही शून्य मार्क कसे काय देऊ शकता तुम्ही?’ मी म्हटलं, ‘अहो तुम्हाला गीतेतले श्लोक लिहायला सांगितले, तुम्ही मनाचे श्लोक लिहून ठेवले... कसे मार्क देणार?’ आपल्या परीक्षा व्यवस्थेत विद्यार्थ्यांनी मास्तरांना चांगलेच जोखून ठेवले आहे. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर माहीत नसले, तरी पानभर काहीतरी लिहून ठेवायचे असा त्यांचा बाणा असतो. (काही मंडळी तर सरळ प्रश्नच पुन्हा उतरवून काढत) फूटपट्टी घेऊन बसलेले मास्तर लांबीनुसार मार्क देतात. ‘मार्क देणार्‍या’ अशी ख्याती असलेल्या एका मॅडमच्या क्लासमध्ये असावे, म्हणून लोक चक्क एक सेमिस्टर ड्रॉ...

    पुढे वाचा »

शुक्रवार, २३ मार्च, २०१८

देवबाप्पा, डार्विन आणि शेल्डन


  • विषयसंगतीमुळे हा लेख ‘ वेचित चाललो... ’ वर हलवला आहे. हा लेख इथे वाचता येईल. - oOo -

    पुढे वाचा »

बुधवार, २१ मार्च, २०१८

‘नर्मदासे सीख’ च्या निमित्ताने...


  • समाजाचा मोठा भाग हा दुसर्‍या भागातील लोकांच्या दुरवस्थेबद्दल बहुधा उदासीन असतो. एकतर समाज म्हणून आपण आधीच नियतीवादी आणि त्यामुळे अक्रियाशील. स्वत:च्या उन्नतीसाठी वा समस्या-निवारणासाठी आपण फारसे नेमके काही न करता, बुवा-बाबांचे मठ आणि कुठल्या कुठल्या देवळांची वाट धरणारे, त्यातून आपल्या कुठल्याही समस्येचे निवारण होते असे समजणारे. अशा समाजात परदु:ख फारसे त्रास देत नाही. तिथे मग त्याच्या निवारणासाठी धडपड करणारे ( भले तुमच्या मते चुकीच्या वा परिणामकतेच्या बाबतीत उणा असलेल्या मार्गाने का होईना ) हे मूर्ख असतात असे समजणारे, अमेरिकन मॉडेल आदर्श मानणारे लोक आता ‘सामाजिक बांधिलकी’ या शब्दालाही चॅलेंज देऊ लागले आहेत. ‘माझे हित साधले की समाजाचे हित आपोआप साधले जाते’ असले कुण्या खांद्यावर घेऊन प्रसिद्ध केलेल्या तथाकथित विचारवंताचे विधान आपापल्या झेंड्यावर मिरवणारे; आणि त्याच वेळी जात-धर्मादि कळपात पुन्हा पुन्हा घुसून आपल्या तथाकथित वैयक्तिकतावादाचे थडगे बांधणारे , आपल्या स्वार्थाला आता तात्त्विक अधिष्ठान देऊ पाहात आहेत. त्यात सध्या ‘विकास, विकास, विकास’ अशी गर्जना करु लागलेला कळप तर आपल्याला...

    पुढे वाचा »

रविवार, ११ मार्च, २०१८

स्ट्रँड, पॉप्युलर आणि पुस्तक-व्यवहार


  • मुंबईच्या प्रसिद्ध ‘स्ट्रँड’ पाठोपाठ पुण्यातील ‘पॉप्युलर बुक हाऊस’ बंद होत असल्याची बातमी वाचायला मिळाली*. मी मुंबईकर नसल्याने स्ट्रँडचा अनुभव नाही, पण जे वाचायला मिळते आहे, त्यावरुन पारंपरिक पुस्तकविक्रीचे मॉडेल कालबाह्य झाल्याने अव्यवहार्य होऊन ते बंद करावे लागले असे दिसते. आता ‘पॉप्युलर’च्या सुनील गाडगीळांनीही हाच सूर आळवला आहे. स्ट्रॅण्ड बंद होण्याची दिलेली कारणे कितपत खरी हे तपासून पाहण्यासाठी माझ्याकडे पुरेसा डेटा नाही. पण ‘पॉप्युलर’ बाबत मी थोडेफार बोलू शकतो. दोन वेळचे अन्न मिळवण्याची भ्रांत होती, तोवर पुस्तक विकत घेणे हा प्रकार संभवत नव्हता. खासगी क्लासेसमधून काही वर्ग घेणे सुरु केले, त्यांचे पेपर तपासून देण्यातून काही प्राप्ती होऊ लागली, तेव्हा दोन-तीन महिन्यांतून एखादे पुस्तक विकत घेणे परवडू लागले. तेव्हा पुस्तके विकत घेण्याचे ठिकाण होते ‘पॉप्युलर बुक हाऊस’. त्याच्या शिवाय अप्पा बळवंत चौकात ‘रसिक साहित्य’ आणि डेक्कनवरचे दीक्षितांचे ‘इंटरनॅशनल बुक हाऊस’. बाकीची दुकाने प्रामुख्याने शालेय पुस्तकेच विकत असत. ‘इंटरनॅशनल’ मध्...

    पुढे वाचा »

शनिवार, १० मार्च, २०१८

राजकीय मिथकांची निर्मिती आणि संघर्ष


  • दुसर्‍या महायुद्धात जर्मन सेनेची रशियात वेगाने सरशी होत होती. लवकरच त्या स्टालिनग्राडवर येऊन धडकतील अशी चिन्हे दिसू लागली होती. ‘स्टालिनग्राड पडणे म्हणजे रशियाची निर्णायक पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरु होणे’ असाच अर्थ काढला जात होता. मेजर कुऽनिग नावाच्या जर्मन स्नायपरची दहशत रशियन सैन्याने घेतली होती. फासे पलटायचे तर काही चमत्काराची गरज होती. पण कम्युनिस्ट रशियामध्ये चमत्कारांच्या अपेक्षेला स्थान नव्हते. आपल्या आजोबांनी शिकवलेल्या अजोड नेमबाजीच्या बळावर शिकार करणार्‍या ‘वासिली झाईत्सेव’ या एका मेंढपाळाला कोमिसार दानिलोव हा अधिकारी हेरतो, त्याला लाल सैन्यात दाखल करुन घेतो. इथून पुढे वासिलीने मारलेल्या प्रत्येक जर्मन सैनिकासाठी एक एक हेल्मेट वाढवत स्टालिनग्राड मध्ये पोस्टर्स लावली जातात. त्या पोस्टरवरील दररोज वाढत जाणारी हेल्मेट्सची संख्या पाहून जनतेच्या आणि सैन्याच्या मनात नवी उमेद निर्माण होते. मेजर कुऽनिगची दहशत हळूहळू कमी होत जाते. केवळ पंधरा-वीस हेल्मेट्सची पोस्टर्स युद्धग्रस्त स्टालिनग्राडला युद्धसंन्मुख करतात, आणि जर्मनीच्या भावी पतनाची नांदी गातात. ...

    पुढे वाचा »

मंगळवार, ६ मार्च, २०१८

नक्षलवादी उजवे आणि सनातनी डावे


  • लेनिनच्या रशियाने भारताला केलेली मदत उल्लेखून ‘लेनिनचा’ पुतळा पाडला म्हणून निषेध करणारे, आणि लेनिनने कित्ती लोक मारले, त्याचा पुतळा फोडला म्हणून काय झालं? हा प्रश्न विचारणारे दोघेही चकले आहेत. कदाचित हेतुत: तसे करत असतील तर संकुचित आहेत, स्वार्थी आहेत असे म्हणावे लागेल. पुतळा फोडणे ही कृती फोडणार्‍याच्या मनातील हिंसेची अभिव्यक्ती आहे. ‘आम्हाला न पटणारे सगळे आम्ही हिंसेने उखडून टाकू, हा आमचा अधिकार आहे', असे ते मानतात, असा याचा अर्थ असतो. इथे नक्षलवाद्यांची आठवण होते. आम्हाला मान्य नसलेली व्यवस्था आम्ही हिंसक मार्गानेही उलथून टाकू, त्यात त्या व्यवस्थेशी निगडित असलेल्या कुणाचीही हत्या करणे समर्थनीय आहे, तो आमच्या दृष्टिने स्वीकारार्ह मार्ग आहे असे ते मानतात. लेनिनचा पुतळा उखडणारे वैचारिकतेच्या दुसर्‍या टोकाला असूनही तोच डीएनए शेअर करतात हे वारंवार सिद्ध झाले आहे . भारताला मदत केलेल्या रशियाचा नेता ‘म्हणून’ त्याचा पुतळा फोडणे अनिष्ट नाही हो; कुणाचाही पुतळा फोडणे हे अनिष्टच समजायला हवे. ती हिंसक कृती म्हणजे कायदा हातात घेणे आहे, आपणच नि...

    पुढे वाचा »

सोमवार, ५ मार्च, २०१८

प्रेम कुणावरही करावं


  • विषयसंगतीमुळे हा लेख ‘ वेचित चाललो... ’ वर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo -

    पुढे वाचा »

शनिवार, ३ मार्च, २०१८

परवा आमचा पोपट वारला


  • ‘परवा आमचा पोपट वारला’ असा निरोप अतुल पेठेंकडून मिळाला होता. म्हणून रीतीप्रमाणे चार जणांना सोबत घेऊन काल त्यांना भेटायला गेलो. आता चार लोक औपचारिक प्रश्न विचारतात तसे आम्ही विचारु म्हटलं नि थोडावेळ बसून निघू असा प्लान होता. पण कसलं काय. एक तासाहून अधिक काळ पार धरुन अख्खी ष्टोरीच ऐकवलीन्‌ या माणसानं. नतद्रष्ट तर इतका की तासभर हसवत ठेवलं आणि. बरं दिसतं का सांगा बरं हे? प्रसंग काय नि आपण वागतो काय. पेठेंसारख्या ‘सुलझा हुआ’ आदमी असं वागेल अशी अग्गदी कल्पना नव्हती होऽ. पोपट झाला म्हणून काय झालं, शेवटी एक फ्यामिली मेंम्बरच तो, शिवाय नावाने थेट जुन्या राज्यकर्त्यांच्या वंशावळीशी नाते सांगणारा, साधासुधा नव्हे. मऽग? अगदीच ताळतंत्र सोडलन् हो या माणसानं. शिट्या काय वाजवतो, त्यावर गाणी काय म्हणतो, आणि कुठली कुठली पात्र आणून समोर उभी करतो. या एका माणसाच्या अंगी नाना कळा आहेत हे ठाऊक होतेच, पण म्हणून काय सभ्य माणसांची नक्कल करायची, आं? पण त्यांच्या पोपटाच्या अंगीही नाना कळा! कोणत्या ते मी का सांगू, जा आणि विचारा पेठेंनाच. एक तासाभराचा वेळ मात्र...

    पुढे वाचा »

शुक्रवार, २ मार्च, २०१८

खरा इतिहास, खोटा इतिहास


  • अमका इतिहास हा ‘खोटा इतिहास’ आहे नि अमका इतिहास ‘खरा इतिहास’ आहे हे अनेक लोक छातीठोकपणे सांगतात, तेव्हा मला प्रचंड न्यूनगंड येतो. मुद्रित माध्यमांचा शोध लागून दस्तऐवजीकरण चालू झालेल्या काळातील, किंवा एका दिवसांतच एका देशातून दुसर्‍या दूरवरच्या देशात पोचता येईल इतकी अत्याधुनिक विमानसेवा सुरु झालेल्या काळातील; काही घटना, उक्ती/उद्धृते यांच्याबद्दल ठामपणे सांगणे मला अवघड जाते. तिथे प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास यांच्याबाबत ठामपणे खरे-खोटे करणारे लोक त्यांच्या त्यांच्या धर्माच्या प्रेषिताहून महान असतात, असे माझे नम्र मत आहे. आता हेच बघाना, एका विज्ञानविषयक वीडिओ बघत असताना एकदम ठेच लागली. त्यात एक खगोलशास्त्रज्ञ असं म्हणाली, "Albert Einstein had said, 'Not only is the universe stranger than we imagine, it is stranger than we can imagine." अनेकदा माणसं उद्धृत करण्याच्या ओघात मूळ माणसाची वाक्यरचना – हेतुत: वा अनवधानाने – बदलून टाकतात, त्या भरात त्याचा अर्थही अनेकदा छटा बदलतो. उदा. उत्क्रांती अथवा डीएनएबाबत बोलताना अनेक वैज्ञानिक अथवा माहितीपटाचे अभिवाचक ‘नर आपला डीएनए जि...

    पुढे वाचा »

गुरुवार, १ मार्च, २०१८

ठणाठणा वाजे बीन


  • ‘एखाद्या कामाची पद्धतशीरपणे लहान लहान कामांत विभागणी करुन ते पार पाडणे, वा एखाद्या प्रश्नाचे विश्लेषण करुन त्याचे उत्तर शोधणे हे आपले कौशल्य आहे’ हा माज उतरवायचा असेल तर एक करा. घरी एक ‘बीनबॅग’ आणा! नाही, माझे डोके पूर्ण ताळ्यावर ठेवूनच मी लिहिले आहे हे. --- बॅग येते. तुम्ही बीन्स स्वतंत्रपणे मागवता. ‘बीन्स भरताना दारे खिडक्या घट्ट लावून घे’ अशी अनुभवजन्य ताकीद मित्राने तुम्हाला दिलेली असते. तुम्ही तो सल्ला तंतोतंत पाळता. थोड्या चुकार बीन्स वगळता – त्यांच्यावर बारीक नजर ठेवून तुम्ही लगेचच ताब्यात घेता – अगदी व्यवस्थितपणॆ बॅगमध्ये त्या भरता. अजिबात गोंधळ न होता काम पार पाडल्याबद्दल खुश होऊन, स्वत:लाच शाबासकी देता. काही दिवस जातात... सफाईसाठी तुम्ही बॅग उचलता, तर पाठीमागे एक दोन बीन्स इकडे तिकडे पळताना दिसतात. अख्खी बॅग उलथीपालथी करुन एक एक वीण तपासून कुठे फट दिसते का ते पाहता. काही सापडत नाही. ‘असतील भरताना बॅगला बाहेरुन चिकटून राहिलेल्या’ म्हणून तुम्ही दुर्लक्ष करता. असे तीनचार दिवस जातात. मग पुन्हा दोन चार बीन्स कुठेतरी...

    पुढे वाचा »