-
‘कट्टा’ हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर येतो, तो कॉलेजजवळील चहाच्या टपरीवर जमलेला विद्यार्थ्यांचा घोळका. चहाची टपरी नसेल तर कधी कॉलेजच्या आवारातील एखाद्या वृक्षाचा पार असेल, कॉलेजच्या दाराजवळील कुंपणाचा पट्टा असेल. जिथे जिथे चार टाळकी बसतात, नि कुटाळक्या करतात तो कट्टा. कटिंग चहा नि क्रीमरोलच्या साथीने मॅथ्स-थ्री मधे झालेल्या काशीपासून अमीर खानच्या टूथब्रश मिशीपर्यंत, कुठल्याशा चित्रपटातील गाजलेल्या किस् पासून आपापल्या आवडत्या मिस पर्यंत वाट्टेल त्या विषयावर तासन् तास काथ्याकूट करत बसण्याची जागा. त्यात मग एखाद्या उदयोन्मुख कवीच्या कवितांबद्दल चर्चा होईल, क्वचित ‘या वेळी पुरुषोत्तमला कोणतं नाटक घ्यायचं’ याच्यावर उहापोह होईल पण बहुतेक वेळ निव्वळ टैमपास. तेव्हा ‘कट्टा ऑन द रॉक्स’ असे शीर्षक घेऊन आलेला हा कार्यक्रम अशाच साध्यासरळ उद्देशाने आला असेल असा माझा समज झाला. कट्टा जमवण्याचे वय केव्हाच मागे सरलेल्या माझ्यासारख्याला, नावावरूनच निव्वळ तरुणाईसाठी आहे असे भासवणार्या या कार्यक्रमाबाबत उत्सुकता असण्याचे काही कारण नव्हते. (वयाला न शोभणारे भड...
पुढे वाचा »
रविवार, २३ डिसेंबर, २०१२
‘कट्टा... On The Rocks’: संक्रमणावस्थेतील पिढीचा आत्मशोध
मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१२
‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - १०: न्यायालयांचा ‘न्याय’ आणि आयोगाचे ‘सहकार्य’
-
युरपिय संसदेत रोश आणि अॅडम्स << मागील भाग न्यायालयांचा ‘न्याय’: अॅडम्सचे अपील स्विस सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर (१९७८-७९ च्या सुमारास) जॉन प्रेस्कॉट यांच्या सल्ल्यावरून एक प्रसिद्ध वकील डायफेनबाकर हे अॅडम्सला भेटले नि त्यांनी त्याचा खटला बारकाईने अभ्यासला. त्यांच्या मते अॅडम्सने दोन गोष्टी करायला हव्या होत्या. पहिली म्हणजे त्याने त्याच्याविरुद्ध स्विस सरकारने केलेल्या अन्यायाचे प्रकरण मानवी हक्क न्यायालयाकडे न्यायला हवे होते, नि दुसरे स्विस खटल्यात त्याने स्विस कायद्याच्या ११३व्या कलमाचा आधार घ्यायला हवा होता. या कलमात असा स्पष्ट उल्लेख आहे की ‘आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्थान हे स्वित्झर्लंडच्या अंतर्गत कायद्यापेक्षा वरचे मानण्यात यावे’. ज्यांच्या मार्फत अॅडम्स आयोगाच्या सातत्याने संपर्कात होता, ते विली श्लीडर हे स्वत: निष्णात कायदेपंडित मानले जात होते. त्यांनी अथवा युरपिय आयोगाने कोणतीही कायदेशीर मदत वा सल्ला अॅडम्सला देऊ केला नाही. वास्तविक स्विस न्यायालयाच्या निर्णयानंतर सहा महिन्याच्या आत मानवी हक्क न्यायालयात हे प्रकरण नेण्याचा निदान सल्ला तरी ते अॅडम्स...
पुढे वाचा »
सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१२
‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - ९: युरपिय संसदेत रोश आणि अॅडम्स
-
सुपर पॉयजन << मागील भाग याच सुमारास या रंगमंचावर राजकारण्यांचा प्रवेश झाला. युरपिय संसदेतील ब्रिटिश प्रतिनिधी मि. जॉन प्रेस्कॉट ( हे सुमारे तीन दशके ब्रिटिश संसदेत लोक-प्रतिनिधी म्हणून काम करत होते नि पुढे १९९७ ते २००७ दरम्यान - टोनी ब्लेअर यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत - ब्रिटनचे उपपंतप्रधानही झाले. ) यांनी अॅडम्सची भेट घेतली. हा सगळा प्रकार संतापजनक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले नि हा प्रश्न युरपिय संसदेत उचलून धरण्याचा आपला निर्णय त्यांनी अॅडम्सच्या कानावर घातला. या निमित्ताने संसदेतीला समाजवादी गट अॅडम्सच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. अॅडम्सवरील अन्यायाचा त्यांनी पुढे सातत्याने पाठपुरावा केला नि युरपियन आयोगाला अॅडम्सला किमान प्रत्यक्ष मदत देण्यास भाग पाडले. जॉन प्रेस्कॉट यांनी युरपिय संसदेमधे हा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले ‘मि. स्टॅन्ले अॅडम्स यांना स्वित्झर्लंडमधे झालेल्या शिक्षेबद्दल आयोगानं स्विस सरकारकडे काय प्रतिक्रिया नोंदवली? दुसरे म्हणजे यानंतर स्वित्झर्लंड नि ई.ई.सी. यांच्यावरील नेमकी बंधनं सुस्पष्ट करेपर्यंत दोघांमधील करार स्थगित करण्याची श...
पुढे वाचा »
मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१२
‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - ८: सुपर पॉयजन
-
खटले आणि निकालांची बारी << मागील भाग रोशच्या व्यावसायिक नीतीला उघडं पाडणारी आणखी एक घटना याच सुमारास घडली (१० जुलै १९७६). उत्तर इटलीमधे ‘सेवेसो’ नावाच्या छोट्या गावात असलेल्या ‘इक्मेसा’(Industrie Chimiche Meda Società Azionaria) नावाच्या कॉस्मेटिक्स उत्पादक कंपनीत एक भीषण स्फोट झाला. काही क्षणापूर्वी नितळ निळं असलेलं आकाश पांढर्या धुराच्या ढगांनी भरून गेलं. या ढगात ‘डायॉक्सिन’ नावाच्या विषारी द्रव्याचं प्रमाण अतिशय जास्त होतं. हे डायॉक्सिन सायनाईडपेक्षा सुमारे १०,००० पट अधिक विषारी द्रव्य आहे [10] . (हे प्रमाण अॅडम्सचा दाव्यानुसार ७०००० पट एवढे होते.) सेवेसोच्या परिसरातील वनस्पती कोमेजून, कोळपून गेल्या; ढगाच्या संपर्कात आलेले पक्षी उडता उडता बाण लागल्यागत टपकन पडून मेले. कित्येक घरट्यांखाली असे मेलेले पक्षी पडलेले दिसून आले. सेवेसोच्या आसपास गवतावर चरणारे अनेक ससे मृतावस्थेत सापडले. त्यांच्या तोंडातून, कानातून आणि आतड्यातून रक्तस्त्राव झालेला आढळला. पाळीव कुत्री नि मांजरे झिंगल्यासारखी स्वतःभोवती गरगर फिरत पडली ती उठलीच नाहीत. तेथील रहिवाशांना अनेक प्रकारचे त्रास ...
पुढे वाचा »
शनिवार, २२ सप्टेंबर, २०१२
‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - ७: खटले आणि निकालांची बारी
-
(दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मालिकेचा पुढील भाग ) काही टिपणे << मागील भाग अॅडम्सला अटक झाल्याचे ई.ई.सी.ला समजणे शक्यच नव्हते. मेरिलिन जिवंत असती तर तिने कदाचित त्यांना कळवलेही असते. तुरूंगाच्या आतून काहीही हालचाल करणे अॅडम्सला शक्यच नव्हते. यासाठी अॅडम्सने तुरुंगातील आपल्या सेलमधे असलेल्या इतर गुन्हेगारांचा वापर करून घेतला. त्या सर्वांना किरकोळ गुन्ह्याखाली तुरूंगवासाची शिक्षा झालेली असल्याने ते लवकरच बाहेर पडणार होते. त्यांच्याकरवी ई.ई.सी.पर्यंत ही बातमी अॅडम्सने पोचवली. ‘ला स्टांपा’ तुरूंगात अॅडम्सची नव्याने चौकशी सुरू झाली. ही चौकशी करणारे पोलिस आयुक्त वर्नर विर्क अॅडम्सला जवळजवळ रोजच विविध प्रश्न विचारत, त्याची अॅडम्स उत्तरे देई. त्या उत्तरांवरून आणखी खोलवर माहिती काढण्याच्या दृष्टीने आवश्यक असे प्रश्न विर्क दुसर्या दिवशी घेऊन येत. हा प्रकार काही दिवस चालल्यानंतर दुसर्या दिवशीच्या प्रश्नांतून दिसणारा तांत्रिक नेमकेपणा पाहून, आदल्या दिवशीची उत्तरे घेऊन विर्कसाहेब कोणाकडे तरी नेत असावेत, नि तेथून त्यावर अधिक नेमके प्रश्न घेऊन येत असावेत हे अॅडम्सच्या लक्षात आले. ...
पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
