-
(कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या चरणी हे विडंबन सादर...) भातुकलीच्या खेळामधलीं तात्या आणिक कोणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥ तात्या वदला, “मला न कळली, शब्दांविण तव-भाषा घरी पोचतां, पुसिन तेथील, धुरकटलेल्या कोषा (१) ” का कमळीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी ? ॥१॥ कमळी वदली बघत एकटक लाल-लाल तो तारा “उद्या पहाटे दुसर्या वाटा, तिज्या गावचा वारा” पण तात्याला उशिरा कळली, गूढ अटळ ही वाणी ॥२॥ तिला विचारी तात्या, “का हे हात असे सोडावे ? त्या दैत्याने माझ्याआधी, तूंस असे कवळावे ?” या प्रश्नाला उत्तर नव्हते, कमळी लाजिरवाणी ॥३॥ का कमळीचे तुटले दावे (२) , आज दूर जाताना ? का तात्याचा डाव गंडला, ‘कर’पाशी (२) चुरताना? भ्रमरासम ती उडून गेली, भुलुनी लाल-फुलांनी ॥४॥ - रमताराम --- (१). शब्दकोष (२). या दोनही ठिकाणी श्लेषावर ध्यान असू द्या. ...
पुढे वाचा »
गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५
अर्ध्यावरती डाव मोडला...
बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?
-
वृद्धत्वाची जेथ प्रचिती... « मागील भाग --- मागील भागाच्या अखेरीस नेहरुंचा उल्लेख आला आहे, तोच धागा पकडून पुढे जाऊ. जिज्ञासा https://www.istockphoto.com/ येथून साभार. फेसबुकवर एके ठिकाणी कुरुंदकरांनी नेहरुंबाबत लिहिलेला एक उतारा पोस्ट केलेला होता. त्याखाली एका तरुणाने “लेखकाला टॅग करता येईल का? त्याच्या प्रोफाईलवर जाता येईल.” अशी कमेंट केलेली होती. समाजमाध्यमांवर बस्तान बसवून असलेल्या ट्रोलिंग मानसिकतेच्या कुणी एकाने त्याचा स्क्रीनशॉट पोस्ट म्हणून टाकला असता, त्यावर सुमारे शंभरेक जणांनी 'हा: हा:’ अशी प्रतिक्रिया दिलेली पाहिली. ( ‘नेहरु’ असा शब्द वाचूनच हा: हा: करणारे काही त्यात असतील. त्यांना वगळून ) इतक्या सार्यांना कुरुंदकर ठाऊक आहेत ही आनंदाचीच बाब आहे. कुरुंदकरांचे, त्यांच्या दृष्टिकोनाचे स्थान माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण असेच आहे. परंतु तरीही कुणाला तरी कुरुंदकर ठाऊक नाहीत याने माझी अस्मिता दुखावत नाही. विचारांना अस्मितेचे देव्हारे नसावेत अशा मताचा मी आहे. या प्रतिसादात हास्यास्पद काही आहे असे मला वाटत नाही. पोस...
पुढे वाचा »
Labels:
आकलन,
इतिहास,
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
भाष्य,
समाज
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

