Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

रविवार, १९ जुलै, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ३ : समूहाची ओळख


  • समूहजीवी « मागील भाग समूहजीवी समाज, मूर्त ओळख केवळ सहजीवन आणि सहभोजन यांखेरीज आचार-विचारांत सामूहिकता आली ती सामायिक कर्मकांडातून. मानवी (किंबहुना सर्वच प्राणी, पक्षी व कीटकांच्या) आयुष्यातील जन्म नि मृत्यू या दोन घटना निश्चित आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम कर्मकांडे त्यांच्याभोवती उदयाला आली. जगभरातील सर्वच मानवटोळ्या नि समाज यांच्यामध्ये या दोन घटनांभोवती गुंफलेली कर्मकांडे आहेत. चित्रपटप्रेमींना डिस्नेच्या सुप्रसिद्ध ‘ द लायन किंग ’मधील सिंहराज सिम्बाच्या जन्माचा प्रसंग आठवत असेल. रफीकी हे माकड वनराज मुफासाच्या टोळीचा भगत वा पुरोहित आहे. मुफासा आणि सराबी यांच्या या पुत्राच्या– म्हणजे सिंबाच्या जन्मानंतर तो त्या ‘युवराजा’ला उचलतो नि गुहेतून बाहेर येतो. मुफासाचे जणू सिंहासनच असलेल्… पुढे वाचा »

सोमवार, १३ जुलै, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - २ : समूहजीवी


  • प्रस्तावना « मागील भाग सजीवांतील सहजीवन निसर्गामध्ये प्रगतीच्या वाटेवर सजीवांची वाटचाल संघर्ष नि सहकार या दोन साधनांच्या आधारे होत असते. या दोन्हींचा वापर करुन संरक्षण नि आक्रमकता या दोहोंसाठी आवश्यक विविध गुणकौशल्यांचा विकास होत असतो किंवा ज्यांच्याकडे ते अधिक विकसित असतात ते जगण्याच्या वाटेवर वेगाने पुढे जाऊ शकतात. संघर्षामध्ये सजातीय प्राण्यांशी होणारे संघर्ष आणि अन्य प्रजातींशी होणारे संघर्ष असे दोन प्रकार दिसतात. पैकी अन्न (आणि त्यासाठी हद्दीचा) संघर्ष हा सजातीय नि अन्य जातीय अशा दोनही प्रकारच्या जीवांशी होतो. पण त्याखेरीज नरांचा सजातीय प्राण्यांशी जुगण्याच्या हक्कासाठीही संघर्ष होत असतो. हा प्रत्यक्ष संघर्ष प्राणिकुलांत आणि कीटकांच्या काही प्रजातींमध्ये दिसतो. पक्ष्यांमध्ये स… पुढे वाचा »

सोमवार, ६ जुलै, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १ : प्रास्ताविक


  • भारतीय भाषांतील धंदेवाईक मनोरंजन माध्यमांना वावडे असणार्‍या ‘विज्ञान-काल्पनिका’ (science-fiction) अनुभवायच्या तर तुम्हाला इंग्रजीकडे वळावे लागते. त्यातही हॉलिवुडकरांच्या अंगणात गेलात, तर भूतकाळातील काही राजे-राज्यांच्या संघर्षाला भविष्यात नि अंतराळात नेऊन ठेवलेले तुम्हाला पाहावे लागते. किंवा वर्तमानातील कथा/चित्रपटांतील महानायकांचे (super-hero) अवतार तिकडे नेऊन त्याला कुण्या एलियन शत्रूशी दोन हात करायला लावलेले दिसतात. कुठलेसे ‘एम्पायर’ नि कुठलासा ‘रेझिस्टन्स’ यांच्या संघर्षाच्या कथा संगणकाच्या साहाय्याने चित्तथरारक चित्रचौकटींमधून सादर करुन ते तुमची मती गुंग करुन टाकतात. प्रत्येक वेळी आपण जणू नवेच काही कथानक पाहात आहोत अशा भ्रमात तुम्हाला ठेवून ही मंडळी आपले खिसे भरताना दिसतात. एखाद्या कथानकास विज्ञान-काल्पनिका म्हणवून घेण्यास त्यात वै… पुढे वाचा »

शुक्रवार, ३ जुलै, २०२६

आकलनाच्या कलाने...


  • मी नुकत्याच संपवलेल्या मालिकेचे उपशीर्षक होते ‘एक आकलन’. त्या आधीही मी एकदोनदा हा शब्द आवर्जून वापरलेला होता. ‘जे लिहिले जाते ते लेखकाचे आकलनच तर असते, मग ही पुस्ती जोडण्याचे कारण काय?’ असा प्रश्न पडू शकतो. त्याबद्दल विवेचन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्याअर्थी हे ही आकलनाचे एक आकलन म्हणता येईल. या लेखानंतर इथे सुरू होणार्‍या दीर्घ मालिकेसाठी भूमिका स्पष्ट करणारे लेखन म्हणून याच्याकडे पाहाता येईल. अभ्यासक, अकादमिक, समीक्षणात्मक, लेखनामध्ये एक लेखनाची चौकट, व्याप्ती निश्चित करुन त्याच्या अंतर्गत लेखनाचा विस्तार करावा लागतो. ती शिस्त पाळावी लागते. विधानांचे आधार वा मुद्द्यांची मांडणी प्रस्थापित लेखनाच्या संदर्भात नि तर्कसंगत पद्धतीने करावी लागते. ललित लेखन हे पूर्णपणे लेखकाच्या अभिव्यक्तीचा आविष्कार असतो, त्याला निवडलेल्या घाट अथवा रचनाब… पुढे वाचा »