-
मी नुकत्याच संपवलेल्या मालिकेचे उपशीर्षक होते ‘एक आकलन’. त्या आधीही मी एकदोनदा हा शब्द आवर्जून वापरलेला होता. ‘जे लिहिले जाते ते लेखकाचे आकलनच तर असते, मग ही पुस्ती जोडण्याचे कारण काय?’ असा प्रश्न पडू शकतो. त्याबद्दल विवेचन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्याअर्थी हे ही आकलनाचे एक आकलन म्हणता येईल. या लेखानंतर इथे सुरू होणार्या दीर्घ मालिकेसाठी भूमिका स्पष्ट करणारे लेखन म्हणून याच्याकडे पाहाता येईल. अभ्यासक, अकादमिक, समीक्षणात्मक, लेखनामध्ये एक लेखनाची चौकट, व्याप्ती निश्चित करुन त्याच्या अंतर्गत लेखनाचा विस्तार करावा लागतो. ती शिस्त पाळावी लागते. विधानांचे आधार वा मुद्द्यांची मांडणी प्रस्थापित लेखनाच्या संदर्भात नि तर्कसंगत पद्धतीने करावी लागते. ललित लेखन हे पूर्णपणे लेखकाच्या अभिव्यक्तीचा आविष्कार असतो, त्याला निवडलेल्या घाट अथवा रचनाब… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
लेखन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
लेखन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, ३ जुलै, २०२६
आकलनाच्या कलाने...
मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५
आळशांच्या बहुमता...
-
प्राचीन काळी मी संगणक-क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही स्वयंसिद्ध (stand-alone) (१) स्वरूपाची प्रणाली (software) सॉफ्टवेअर तयार करत असू. तिचा आराखडा आमचाच नि तयार करणारे आम्हीच. त्यात काय काय असावे, कसे असावे हे निश्चित करणारा पहिला planning टप्पा असे. त्यानंतर त्याचा डोलारा (skeleton) तयार केले जाई. मग प्रत्यक्ष कार्य करणारे विभाग एक-एक करुन भरले जात. आता याचा पुढचा महत्त्वाचा टप्पा सुरु होई. यात त्याची प्राथमिक वैधता-चाचणी (testing) आणि/किंवा QA अर्थात गुणवत्ता-तपासणी केली जाई. त्यानंतर यात सापडलेल्या ढोबळ चुका दुरुस्त करुन ही प्रणाली अधिक भक्कम केली जाई. यात अपेक्षित निकाल मिळतो आहे ना हे तपासण्याबरोबरच अनपेक्षित निकाल येत नाही ना या दिशेनेही चाचणीचे टप्पे पार पडत. ते पार पडल्यानंतर हे कंपनीच्या बाहेरील काही तज्ज्ञांना Beta-tester … पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

