Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
माध्यमे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माध्यमे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १५ मे, २०२४

शब्दांनी हरवुनि जावे


  • आठ-दहा दिवसांपूर्वी गलगोटिया विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांचा राजकीय कारणासाठी उपयोग करून घेण्याचा प्रकार उघडकीस आला. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता - बहुधा- मतदार असलेल्या हे विद्यार्थी आपण इथे काय करत आहोत, हाती धरलेल्या घोषणापत्रांवर काय लिहिले आहे वगैरे बाबत अनभिज्ञ दिसत होते. सद्य राजकीय सामाजिक स्थितीचे प्रतिबिंबच त्यांच्या वर्तनात दिसत होते असे म्हणता येईल. या प्रकारात सर्वात धक्कादायक बाब ही की या प्रतिनिधीने काही जणांना त्यांच्या स्वत:च्या हातात असलेल्या घोषणापत्रावर काय लिहिले आहे हे वाचण्यास सांगितले असता इंग्रजीमध्ये लिहिलेले तर सोडाच काहींना मातृभाषा हिंदीमध्ये लिहिलेली ती घोषणाही वाचता येत नव्हती. यावरून त्यांच्या शिक्षणाबद्दल, यांना मतदार म्हणून मान्यता देण्यात घाई होते आहे का इत्यादि प्र… पुढे वाचा »

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

‘व्हायरल’च्या नावचा मलिदा ऊर्फ प्रस्थापितांची फुकटेगिरी


  • फेसबुकवर मी काही दिवसांपूर्वी अरुणा ढेरे यांनी दिलेल्या लोककथेच्या आधारे एक पोस्ट लिहिली होती. त्या कथेमध्ये युद्धोत्तर अयोध्येमध्ये सीतेची नणंद तिला फसवून रावणाच्या अंगठ्याचे चित्र काढून घेते. मग त्याला जोडून पुरा रावण आरेखून त्याच्या आधारे रामाच्या मनात सीतेविषयी किल्मिष निर्माण करुन तिचा त्याग करण्यास उद्युक्त करते. या कथेच्या आधारे मी सर्वसामान्यांच्या ‘पराचा कावळा’ करण्याच्या वृत्तीबाबत नि एकुणात इतिहास हे स्वार्थ-साधक हत्यार म्हणून वापरण्याबाबत टिपण्णी करताना अखेरीस देवत्व संकल्पनेच्या उत्क्रांतीबाबत भाष्य केले होते. आज कोकणातील एका स्नेह्यांकडून कौतुकाने माझा लेख वाचल्याचा मेसेज मिळाला. मी बुचकळ्यात पडलो. मी कुठलाच लेख कुणाला पाठवला नव्हता. मग त्यांनी दिलेल्या तपशीलावरून मी त्या वृत्तपत्राचा ई-अंक डाउनलोड केला नि अवाक्‌ झालो. त्या… पुढे वाचा »

गुरुवार, २६ जानेवारी, २०२३

राष्ट्रभावनेचा प्रवास - एक आकलन (पूर्वार्ध) : माध्यमांतील प्रतिबिंब


  • --- प्रास्ताविक: अलीकडील काही वर्षांत राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती हे शब्द चलनी नाण्यासारखे नि हत्यारासारखेही वापरले जाऊ लागले आहेत. या दोहोंच्या पूर्वसुरी म्हणता येतील अशा राष्ट्रभावना नि राष्ट्रीय एकात्मता या दोन संज्ञा आता बव्हंशी लुप्त झालेल्या आहेत. या बदलाला देशातील सामाजिक, धार्मिक, साहित्यिक, तांत्रिक आणि अर्थातच आर्थिक संक्रमणाला जोडून पाहता येते. त्यातून एक संगती हाती लागते. प्रामुख्याने करमणूकप्रधान माध्यमांतून दिसलेली ही संगती आणि त्यांतील आकलन वास्तवाला जोडून पाहण्याचा हा प्रयत्न. --- १. अनेकता में एकता भारत माझा देश आहे। सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे... अशी एक प्रतिज्ञा आमच्या शालेय क्रमिक पुस्तकांत पहिल्या पानांवर छापलेली अ… पुढे वाचा »

बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२

डकवर्थ-लुईस नियमावली आणि वृत्त-माध्यमे


  • १९९२ मध्ये झालेल्या विश्वचषक मालिकेमध्ये उपान्त्य सामन्यामध्ये द. आफ्रिका इंग्लंडशी खेळत होती. वंशभेदी धोरणांमुळे सुमारे बावीस वर्षे क्रिकेट जगतातून बाहेर ठेवल्यानंतर १९९१ मध्ये त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात सामावून घेतले गेले होते. उपान्त्य सामन्यामध्ये पोचण्यापूर्वी त्यांनी पाच सामने जिंकून– त्यातही माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन– आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. ही विश्वचषक स्पर्धा– त्याकाळात ज्याला एकदिवसीय सामना म्हटले जाई तशा सामन्यांची असे. यात दोन्ही संघांना प्रत्येकी ५० षटकांचा एक डाव खेळायला मिळे आणि जो संघ अधिक धावा करेल, तो विजयी होत असे. परंतु या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे मध्यांतराच्या वेळेपर्यंत इंग्लंडला ४५ षटकेच खेळायला मिळाली. त्यांत त्यांनी २५२ धावा केल्या. उत्तरादाखल दुसरा डाव खेळताना द… पुढे वाचा »

रविवार, १५ मे, २०२२

लेखक याचक आणि राजा वाचक ?


  • ( बरेच दिवस लिहून ठेवलेले काही मुद्दे आज मित्रवर्य प्रकाश घाटपांडे यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे एकदाचे पार लागले. ) आकलनाची, उकल करण्याची खाज हा माझा जुना आजार. त्यातच गणित नि शक्यताविज्ञान (Statistics) या विषयांत झालेले शिक्षण यांमुळे जगण्यातले प्रत्येक गणित सोडवण्याचा आटापिटा वाढीसच लागला. मग कालानुरूप आपल्या विचारांत, आकलनात, विश्लेषण पद्धतीमध्ये बदल होतो का, कसा होतो नि का होतो... हे जास्तीचे प्रश्न वाढत्या वयाबरोबर सोबत आले. अनुभवसिद्धता हा शक्यताविज्ञानाचा गाभा, त्यातून निर्माण होणारी माहिती व डेटा, त्याचे मूल्यमापन आणि निष्कर्ष ही आकलनपद्धती मी स्वीकारलेली. काही काळानंतर त्याच समस्येला, गणिताला सामोरे जातात उत्तर वेगळे येते का, का वेगळे येते याचा वेध घेणे भलतेच रोमांचक असते, असे लक्षात आल्यावर त्या त्या वेळचे आकलन, विचारव्यूह न… पुढे वाचा »

रविवार, २४ एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - ८ : केल्याने प्रसिद्धी


  • मोबाईल-विशेष « मागील भाग --- इतरांकडून शिकावे आपल्या लेखनाची, ब्लॉगची, वेबसाईटची जाहिरात कशा तर्‍हेने करावी, वाचकांना कसे खेचून आणावे, त्यांना पकडून कसे ठेवावे, याची उदाहरणे विविध वेबसाईट्सवर दिसत असतात. बारकाईने लक्ष दिले तर, आपणही ती वापरु शकतो का, आपल्या ब्लॉगसाठी ती उपयुक्त ठरु शकतात का, याची चाचपणी करुन पाहता येते. एक 'केस-स्टडी' म्हणून maharashtratimes.com वेबसाईट पाहता येईल. वेबसाईट ओपन केल्यावर सर्वात वरच्या बाजूला महाराष्ट्र टाईम्सच्या लोगोच्या बरोबर खाली ’ट्रेडिंग’ची पट्टी दिसते. पॉप्युलर- म्हणजे सर्वाधिक वाचल्या जाणार्‍या लेखांकडे जाण्यासाठी वाचकाला दिलेला शॉर्टकट आहे. त्याच्या विरुद्ध दिशेला उजवीकडे वर ’रीड अ‍ॅंड अर्न’ची (Read and Earn) लिंक दिसते. इथे वाचकांना लॉगिन कर… पुढे वाचा »

माझी ब्लॉगयात्रा - ७ : मोबाईल-विशेष


  • अनुक्रमणिका आणि सूची « मागील भाग --- ( मागील भागाच्या शेवटी या भागाचे जे नाव दिले होते ते ’काही अनुभव’ असे होते. माझ्या वैय्यक्तिक, व्यावसायिक आयुष्यात उत्पादक/सेवादाते-ग्राहक संबंधांबाबत मला जे अनुभव आले, त्यातून जे आकलन झाले त्यांच्या आधारे तो भाग लिहिण्याचे नियोजन होते. त्या आकलनाच्या आधारेच ब्लॉगलेखनाच्या शिफारस व प्रसिद्धीसाठी काही तंत्र वापरले आहे. परंतु तो भाग अपेक्षेहून खूप मोठा झाल्याने आणि एक स्वतंत्र लेख म्हणून विकसित झाल्याने या मालिकेतून गाळून टाकला आहे. तो जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा त्याची लिंक इथे समाविष्ट करेन. ) मोबाईलवर लेखनसूची? मागील भागाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे ’सूची देण्याचा जो श्रम केला, तो मोबाईल थीमवर वृथा गेला’ असल्याने आता मोबाईल थीमची ही मर्यादा कशी दूर करता येईल याचा विचार करु लागलो. मोबाईल थीम्स या … पुढे वाचा »

बुधवार, १३ एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - ६ : अनुक्रमणिका आणि सूची


  • मजकूर सुरक्षितता « मागील भाग --- ब्लॉगच्या मजकुराची शक्य तेवढ्या सुरक्षिततेची सोय केल्यावर आता पुढच्या टप्प्यात विचार करायचा, तो ब्लॉगच्या सुशोभीकरणाचा. त्यासाठी कोण-कोणत्या गोष्टी, बाबी वा पर्याय वाचकाला उपयुक्त ठरु शकतात याचा विचार करायला हवा. हा विचार तुमच्या ब्लॉगमधील विषयांच्या अनुषंगाने व्हावा. एका प्रकारच्या ब्लॉगसाठी जे तंत्र कामात येईल, तेच सर्व प्रकारच्या ब्लॉग्सना लागू असेल असे नव्हे. व्यावसायिक ब्लॉग्समध्ये उपयुक्त ठरणारे पर्याय साहित्यिक लेखनाच्या ब्लॉगमध्ये तितकेच उपयुक्त असतील असे नाही. आणि तिथे उपयुक्त असणारे पर्याय हे प्रासंगिक लेखनाच्या, 'सुचले तसे' अथवा run of the mill प्रकारच्या लेखनाच्या ब्लॉगवर कामात येतील असे नाही. बहुतेक ब्लॉगमंचांवर तुमच्या पोस्ट्सची अनुक… पुढे वाचा »