-
साडेतीन-चार वर्षांपासून महाराष्ट्राने पक्षांतराच्या राजकारणात तळ गाठून आजवर हिणवलेल्या उत्तर भारतासमोर आपली लाज घालवली आहे.
सध्या जवळजवळ नऊ वर्षांनी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरु आहे. इतकी वर्षे तुंबलेली अनेकांची राजकीय लालसा फसफसून वाहू लागलेली आहे. निलाजर्या राजकारणाचा हा चिखल शरम येईल इतका चिवडला जातो आहे. याची ना राजकारण्यांना लाज आहे ना ‘आपला पक्ष जिंकला ना, मग बास’ या मानसिकतेच्या मतदारांनाही.
या सार्या विषण्ण करणार्या परिस्थितीवर कडवट हसून पुढे सरकण्याखेरीज सुज्ञांच्या हाती काही उरलेले नाही.
काही दिवसांपूर्वी संगणकावरील इमेजेस पाहाताना एक-दोन चित्रांत निवडणूक-भाष्य चमकून गेले. पाहाता पाहात चोवीस तासांत तीस-एक मीम्स तयार झाली. त्यांची संगतवार मांडणी करताना दिसलेली छिद्रे भरून काढणार्या काही मीम्सची भर घालून त्यांना इथे एकत्रितरित्या मांडले आहे.
- oOo-
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
सोमवार, १२ जानेवारी, २०२६
me me me me meme, इलेक्शन वाले meme
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा