Vechit Marquee

सूची: अनुक्रमे ▶ वर्गीकरण ▶ लेखमाला ▶ लक्षवेधी ◼

शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

छद्म पर्यावरणवाद्यांचा धोका


  • ‘ काही जमाती अधिक भ्रष्ट आहेत का? ’ या मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे, आमच्या कंपनीच्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने एक महत्त्वाचा प्रश्न धसास लावण्यात आल्यामुळे कंपनीला समाजाच्या एका गटात प्रतिष्ठा मिळाली. पण तलवारीला दोन्ही बाजूंनी धार असते हे लवकरच कंपनीला दिसून आले. काही काळानंतर एका (बहुधा ग्रीन-पीस) पर्यावरणवादी संघटनेचे लोक कंपनीसमोरच्या फुटपाथवर जमले, आणि कंपनीच्या नि विशेष करुन आमच्या चेअरमनच्या नावे निषेधाच्या घोषणा देऊ लागले. हे आंदोलन बराच काळ चालले होते. त्यांनी चेअरमनच्या नावे लिहिलेल्या बॅनरवर त्याला चक्क प्राणी-द्वेष्टा ठरवून टाकले होते. मागच्या लेखात उल्लेख केलेले तेच सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअर एकाच स्वरुपाच्या मूल्यमापनासाठी नव्हते. त्यातील संख्याशास्त्रीय तंत्रे ही अनेक क्षेत्रातील संख्याशास्त्रीय अभ्यासांतून निष्कर्षांपर्यंत नेण्यास मदत करणारी होती. औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये हेच सॉफ्टवेअर ‘क्लिनिकल ट्रायल्सच्या’ पहिल्या टप्प्यात, किंवा फेज-१ ट्रायल्स मध्ये वापरले जाई. या फेज-१ मध्ये होणारा अभ्यास हा प्राण्यांवर केलेल्या प्...

    पुढे वाचा »

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

काही जमाती अधिक भ्रष्ट आहेत का?


  • (शेखर गुप्ता यांचा लेख: Are Leaders from 'lower' casts and subaltern groups more corrupt? ) --- काही काळापूर्वी माझ्या पहिल्या आयटी कंपनीत काम करत असताना त्यांच्या एका सॉफ्टवेअरबाबत एक इंटरेस्टिंग टेस्ट केस वाचली होती. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये गोर्‍या व्यक्तींपेक्षा कातडीचा रंग काळा असलेल्या – आफ्रिकन-अमेरिकन – लोकांना शिक्षा होण्याचे प्रमाण आणि तीव्रता अधिक आहे अशी तक्रार मानवाधिकार संघटना बराच काळ करीत होत्या. परंतु नुसता दावा पुरेसा नसतो. कारण परस्परविरोधी दावे, आरोप-प्रत्यारोप हे होतच असतात नि प्रत्येक बाजूला आपले मत हे वास्तवच आहे असा ठाम विश्वास असतोच. अशा वेळी वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारावा लागतो, नि निष्कर्षाला अधिक विश्वासार्ह दावा म्हणून समोर ठेवावे लागते. आणि नुसते इकडे अठ्ठेचाळीस आहेत नि तिकडे एकुणपन्नास आहेत म्हणजे एकुणपन्नासच्या बाजूचा दावा करणारे बरोबर आहेत असे नसते. कारण तुम्ही काळाच्या अशा तुकड्यावर असू शकता, जिथे केवळ योगायोगाने एक बाजू जड दिसते आहे. कदाचित काही दिवसातच पारडे दुसर्‍या बाज...

    पुढे वाचा »