-
फेसबुक नि त्यासारखी समाजमाध्यमे ही बव्हंशी पेंढा भरलेल्या बुजगावण्यांना आधार देऊन उभी करणारी काठी असते. नसलेल्या गुणांची जाहिरात करुन आपल्याला अपेक्षित अशी आपली ओळख वा व्यक्तिमत्त्व कृत्रिमरित्या उभे करण्यास साहाय्यभूत होणारे हे मंच. पण क्वचित हरवलेल्या संवाद नि संवेदनांच्या अभिव्यक्तीसाठी काही सुज्ञ मंडळी याचा वापर करतात तेव्हा सुखद धक्का बसतो. खाली दिलेली पोस्ट हा असाच एक सुखद धक्का होता. When Do We Lose Our Compassion? I was thinking about Dumbo the other day—the scene where they lock up Dumbo’s mom, calling her a “mad” animal just because she wanted to protect her baby. They tore them apart, and little Dumbo just wanted his mother. I remember how much that scene hurt as a child. I felt it. I knew it was wrong. But then I started wondering… at what point do we stop feeling so deeply? As kids, we see suffering, and we care. We don’t ask whether it’s “just the way things are” or whether someone des...
पुढे वाचा »
शनिवार, २६ एप्रिल, २०२५
To Dumbo, with Love
बुधवार, २३ एप्रिल, २०२५
पहलगाम आणि आपण
-
काल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जीव गमावलेल्या देशवासियांच्या कुटुंबियांसोबत सहवेदना, संवेदना व्यक्त करण्याऐवजी, समाजमाध्यमांवर मोदी-धार्जिण्या नि मोदी-विरोधक गटांतील अनेक नीच मंडळींनी एकमेकांबद्दलच्या फसफसणार्या द्वेषाचे दर्शन घडवले. मोदी-धार्जिण्या मंडळींनी ‘मणिपूरवाले’ आता बोलत नाहीत असे एकतर्फी जाहीर करत त्या दंगलींच्या वेळी जो तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला होता त्याचे उट्टे काढले. तर यांच्या विरोधी गटातील अनेकांनी या निमित्ताने मोदींवर शरसंधान करण्याची संधी साधली; ‘मग मोदी नाही का अशा गोष्टींचं राजकारण करत?’ असा प्रश्न विचारुन एकप्रकारे मोदी-धार्जिण्यांचाच तर्क वापरला. जेणेकरुन आपल्या विरोधी गटाची नि आपली मानसिकता वेगळी नाही, केवळ बाजू वेगळी आहे हेच सिद्ध केले. अशा घटनांबाबत झालेल्या चुका, त्रुटी यांबाबत सरकारची जबाबदारी असतेच. परंतु त्यासाठी जाब विचारताना थोड्या संवेदनशीलतेची, तारतम्याची गरज असते. थोडा काळ जाऊ द्यावा लागतो दोन्ही जमाती संवेदनाशून्यतेचे प्रदर्शन घडवत आहेत असे माझे मत झाले. झाल्या घटनेनंतर धक्का बसलेली व्यक्ती त्या गेल्या जिवां...
पुढे वाचा »
शनिवार, १९ एप्रिल, २०२५
हट्टमालाच्या पल्याड... ज्याचा त्याचा युटोपिया!
-
कित्येक वर्षांपूर्वी अमोल पालेकरांनी साजर्या केलेल्या ‘बादल सरकार महोत्सवा’च्या सीडीज मिळाल्या होत्या. त्यात ‘हट्टमालार आपोरे’ या शीर्षकाचे नाटक पाहण्यात आले होते. त्याचा तपशील इतक्या वर्षांनी विस्मरणात गेला असला तरी, ‘चलन/पैसा या संकल्पनेवर हलकेफुलके भाष्य करणारे नाटक’ आहे इतपतच ध्यानात होते. काल पुन्हा एकवार त्याचा प्रयोग पाहिला नि डोक्यात उजेड पडला. काही काळापूर्वी कॉ. दत्ता देसाईंशी तीन दिवस गप्पांचा कार्यक्रम आम्ही केला होता. त्यात मार्क्सला अपेक्षित समाजव्यवस्थेवर बोलणे झाले होते. त्याच्या मते खासगी मालमत्ता ही संकल्पना रद्दबातल केली की, माणसाला आज करावे लागते तसे ऊर फुटेतो काम करावे लागणार नाही. अन्न, वस्त्र, निवास यांची हमी व्यवस्थेनेचे घेतली, तर त्याला त्या व्यवस्थेप्रती आपले देणे म्हणून जे काम करावे लागेल, ते आज करावे लागते त्याहून कैकपट कमी असेल. त्यातून जो वेळ शिल्लक राहील, त्यात त्याला आवडेल ते काम करण्याची मोकळीक असेल. ‘हट्टमालार आपोरे’ मध्ये हट्टमाल या गावाच्या– म्हणजे आपल्या आजच्या जगाच्या, शेजारी एक नदी आहे नि ...
पुढे वाचा »
बुधवार, १६ एप्रिल, २०२५
स्वप्नात पाहिले जे...
-
‘स्वप्नं सत्यात उतरतात; पण ती उतरवावीही लागतात.’ राहीनं हे कुठं तरी वाचलं. कुठल्याशा प्रसिद्ध पुस्तकातलं वाक्य. ती विचारात पडली. त्यातून बुद्धिमत्ता असली की माणसाला प्रश्न पडतात; नसली की मग बरं असतं. ताप नाही- नि:स्वप्न निद्रा येते. इथं तसं नाही. आपण विचार करतो. प्रश्न विचारतो, स्वत:ला. आपल्याला स्वप्नं पडतात. मेंदूतल्या पेशी कशा ताणल्या जातात, एखाद्या तंबोर्याच्या तारेसारख्या- त्यावेळेस, स्वप्न पडत असताना. (म्हणजे हेही जाणवतं.) अंतस्थ रंग निळा-जांभळा असतो, मेंदूच्या आतल्या आत. मग ताणलेल्या पेशीपेशींमधून ते स्फुरतं- स्वप्न. एखादं गाणं स्फुरावं तसं. सहज आणि दु:खमय, अस्वस्थ. मग पडतं ते स्वप्नं वारंवार. एकच एक: आपण अथांग पोकळीत हरवून गेलो आहोत. पोकळीला अंत नाही, आरंभही नाही. म्हणजे पोकळीच कॅव्हिटी. आणि शोधतो आहोत काही तरी चाचपडत- तणावग्रस्त होऊन. काय शोधतो आहोत ते माहीत असेलच, म्हणजे स्वप्नात. म्हणून काय शोधायचं आहे हा प्रश्न काही आपण विचारत नाही स्वत:ला- स्वप्नात. म्हणजे दॅट इज नोन! नोन ऑलरेडी! मग जागं झाल्यावर स्वत:ला कसं विसरायचं, की काय माहीत आहे म्हणून? कारण त्यावेळेस स्वप्न स...
पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
जिज्ञासानंद,
भाष्य,
विश्लेषण,
साहित्य-कला
सोमवार, ७ एप्रिल, २०२५
दिशाभुलीचे गणित
-
अध्यक्षीय निवडणुकीतील प्रचारा-दरम्यान आणि निवडून आल्यानंतरही बर्याच देशांना ‘धडा शिकवण्या’चा मनसुभा ट्रम्प यांनी वारंवार बोलून दाखवला होता. ‘हे देश अमेरिकेकडून आयात होणार्या मालावर अवाच्या सवा कर आकारतात; त्या तुलनेत अमेरिकेत त्यांच्याकडून आयात मालावर बराच कमी कर आकारला जातो. यातून त्या देशांतील निर्यातदारांना अधिक फायदा होतो आहे आणि पर्यायाने अमेरिका नि त्या देशांत होणार्या व्यापारामध्ये अमेरिकेचे नुकसान होते आहे’ अशी त्यांची तक्रार होती. ‘मी यावर तोडगा काढेन, अमेरिकेवर अन्याय करणार्या या देशांना धडा शिकवेन’ असे आश्वासन ते देत होतो. सामान्य नागरिकांना ‘तुमच्यावर अन्याय होतो आहे’, ‘तुमचे हित धोक्यात आहे’, ‘याला बाहेरचे लोक जबाबदार आहेत’, ’मी हा अन्याय झटक्यात दूर करेन’ अशा घोषणा आवडतात. आपल्या दुरवस्थेला इतर कुणीतरी– विशेषत: आपल्या टोळीबाहेरचे लोक जबाबदार आहेत ही अतिशय सोयीची भूमिका त्यांना आवडत असते. समाजात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली, की अशा वल्गना करणार्यांकडे सामान्य लोक आशेने पाहू लागतात. माणसाला बाहुबलाचे आकर्षण अजूनही आहे, कारण त्याच्यामध्ये टोळीभावना अजून जिवंत आह...
पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)




