Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
हिंसा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हिंसा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २६ एप्रिल, २०२५

To Dumbo, with Love


  • फेसबुक नि त्यासारखी समाजमाध्यमे ही बव्हंशी पेंढा भरलेल्या बुजगावण्यांना आधार देऊन उभी करणारी काठी असते. नसलेल्या गुणांची जाहिरात करुन आपल्याला अपेक्षित अशी आपली ओळख वा व्यक्तिमत्त्व कृत्रिमरित्या उभे करण्यास साहाय्यभूत होणारे हे मंच. पण क्वचित हरवलेल्या संवाद नि संवेदनांच्या अभिव्यक्तीसाठी काही सुज्ञ मंडळी याचा वापर करतात तेव्हा सुखद धक्का बसतो. खाली दिलेली पोस्ट हा असाच एक सुखद धक्का होता. When Do We Lose Our Compassion? I was thinking about Dumbo the other day—the scene where they lock up Dumbo’s mom, calling her a “mad” animal just because she wanted to protect her baby. They tore them apart, and little Dumbo just wanted his mother. I remember how much t… पुढे वाचा »

मंगळवार, १८ मार्च, २०२५

वांझ राहा रे


  • (कालच्या नागपूर दंगलीच्या निमित्ताने...) हे जे काही भयंकर घडते आहे ते ‘त्यांच्यामुळे’ यावर समस्तांचे एकमत झाले... . . ... प्रत्येकाच्या मनात ‘ते’ कोण याची व्याख्या वेगळी होती इतकंच. कुणी म्हणाले हे मुस्लिमांचे पाप (आणि रमताराम अर्बन नक्षल आहेत) कुणी म्हणाले हे हिंदुत्ववाद्यांचे पाप (आणि रमताराम छुपे संघी आहेत) कुणी म्हणाले हे बामणांचे पाप (आणि रमताराम मनुवादी आहेत) कुणी म्हणाले हे फ्रस्ट्रेटेड बहुजनांचे पाप (आणि रमताराम ब्रिगेडी आहेत) कुणी म्हणाले हे पुरोगाम्यांचे पाप (आणि रमताराम अंधभक्त आहेत) कुणी म्हणाले, हे मध्यमवर्गीयांचे पाप (आणि रमताराम वर्गद्रोही आहेत) --- रमताराम म्हणाले: Photo by Maan Limburg on Unsplash तुमच्या बीजातच विष आहे! वांझ राहा रे, वांझ रा… पुढे वाचा »

सोमवार, १४ मार्च, २०२२

आनंदे न्हाती त्यात तृणांची पाती


  • चांगल्या/श्रेष्ठ कवितेचा एक गुण असा की निव्वळ शब्दांपलीकडे जाऊन न लिहिलेल्या, कदाचित अजून न घडलेल्या घटनेवरही ती समर्पक भाष्य करते. कालाच्या, भूगोलाच्या, सामाजिक पार्श्वभूमीच्या सीमा ओलांडून ती व्यापक होते... त्याच वेळी विशिष्ट व्यक्ती, घटना, गट, स्थितीशी सुसंगतही होते तेव्हा ती श्रेष्ठ कविता ठरते. कुसुमाग्रजांची अहि-नकुल या शीर्षकाची कविता आहे. अहि म्हणजे सर्प आणि नकुल म्हणजे मुंगूस या दोन हाडवैर्‍यांच्या संग्रामाचे चित्रमय शैलीत केलेले वर्णन आहे. शालेय अभ्यासक्रमातही ही कविता शिकविली जात असे, कदाचित अजूनही असेल. त्याच्या अखेरीस सर्पाचे निर्दालन करुन नकुल चालता होतो तेव्हा आम्हा शालेय विद्यार्थ्यांना आनंद होत असे. सर्प म्हणजे वाईट, दुष्ट प्रवृत्तींचे प्रतीक. त्यातच ‘शत्रू मानलेल्या देशातील, धर्मातील अर्भकालाही ठार मारावे, अन्यथा ते मोठे… पुढे वाचा »

बुधवार, २ मार्च, २०२२

... माणसाची गरज असते


  • ब्रिगेडियर तुमचा रणगाडा, एक ताकदवान वाहन आहे. लाखोंचा जीवनस्रोत असणारे जंगल आणि सहस्र माणसांना तो सहज चिरडून टाकतो. पण त्यांत एक दोष राहून गेला आहे... तो चालवण्यासाठी एका माणसाची गरज असते ! कमांडर तुमचे विमान, आकाशातून आग ओकू शकणारे, एक शक्तिशाली साधन आहे. ते एखाद्या तुफानालाही सहज मागे टाकते, नि एखाद्या हत्तीहूनही अधिक वजन सहज वाहून नेऊ शकते. पण त्यात एक दोष राहून गेला आहे... त्याला जमिनीवरून भरारी घेण्यासाठी एका माणसाची गरज असते. अ‍ॅडमिरल तुमची युद्धनौका, पाण्यावरचे मूर्तिमंत सामर्थ्य आहे. कित्येक टन विध्वंसक शस्त्रांसहितही ती पाण्यावर सहज संचार करते. पण त्यात एक दोष राहून गेला आहे... तिचे सुकाणू हाती धरण्यासाठी एका माणसाची गरज असत… पुढे वाचा »

रविवार, १४ जून, २०२०

अण्वस्त्रस्पर्धा आणि नग्न महासत्ता


  • इस्रायलच्या एका व्हिसलब्लोअरवर लेख लिहित होतो. जगाच्या डोळ्यात धूळ फेकून राबवलेल्या अणुकार्यक्रमांमधून इस्रायलने म्हणे १५० न्यूट्रॉन बॉम्ब बनवण्याइतके इंधन जमा केले आहे ! प्रश्न पडला... ... काय करायचे हो या १५० बॉम्ब्सचे? सांगा ना. नाही म्हणजे आमच्या डिस्नेच्या ’डकटेल्स’मधला अंकल स्क्रूज जसा आपले पैसे रोज मोजून खुश होतो तसे आहे का हे? की खरंच काही कामाचे आहेत इतके बॉम्ब? नाही, मी शांततावादी भूमिकेतूनही नाही, सध्या निव्वळ गणिती मूल्यमापनाच्या आधारे हा प्रश्न विचारतो आहे. इस्रायलची सारी शत्रू-शेजारी राष्ट्रे- अगदी सगळी इस्लामिक राष्ट्रे धरली तरी, उध्वस्त करायला असले ते पन्नास बॉम्ब्स सहज पुरतील. मग उरलेल्या शंभरेक बॉम्ब्सचे काय लोणचे घालायचे का हो ? कशासाठी निर्माण केले ते? का जमवले? उ… पुढे वाचा »

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

पिसाळलेला कुत्रा


  • https://www.entertales.com/ येथून साभार. त्याने रस्त्यावरच्या कुत्र्याला गोळी घातली तुमच्या भिवया उंचावल्या, "पिसाळला होता" तो म्हणाला तुम्ही त्याला धन्यवाद दिलेत. त्याने शेजार्‍याच्या कुत्र्याला ठार मारले, तुम्ही आश्चर्यचकित झालात "हा ही पिसाळला होता" तो म्हणाला "हो. असेलच." तुम्ही मनात म्हणालात. आता त्याने तुमच्या कुत्र्याची हत्या केली तुम्ही स्तंभित आणि हतबुद्ध झालात. पण काही बोलू शकला नाहीत... ... त्याच्या हाती बंदूक होती! मग कसनुसे हसत त्याला म्हणालात, ’पिसाळलाच होता तो" - रमताराम - oOo - पुढे वाचा »

A Rabid Dog


  • Source: https://www.entertales.com/ . He killed a stray dog, you raised an eyebrow 'It was rabid.' he told you You thanked him. He killed neighbor's dog, you looked surprised 'It was rabid too.' he said 'It must be', you thought Then he killed your dog, You were stunned, but remained silent... ... he was holding the gun! 'It must be rabid' you said... sheepishly! - Ramataram - oOo - पुढे वाचा »

हैद्राबाद येथील व्यवस्थापुरस्कृत हत्या आणि माथेफिरु समाज


  • हैदराबाद एन्काउंटर खरे की फेक, एकुणातच एन्काउंटर हा प्रकार योग्य की अयोग्य, हे दोनही मुद्दे मी जरा बाजूला ठेवतो. माझा मुद्दा जे घडले त्याबद्दल आनंद व्यक्त करणार्‍यांबद्दल, त्याचे ’सेलेब्रेशन’ करणार्‍यांबद्दलचा आहे. गुन्हा घडलाय हे निर्विवाद. एका स्त्रीवर अत्याचार झाला आहे आणि तिचा अत्यंत नृशंस पद्धतीने खून झाला आहे हे ही उघड आहे. याचा अर्थ कुणीतरी हा गुन्हा केला आहे हे ही नक्की. प्रश्न असा की हे गुन्हेगार कोण? १. जे मारले गेले त्यांनीच तो गुन्हा केला होता याची तथाकथित एन्काउंटरचे फेसबुकवर समर्थन करणार्‍यांनी नक्की कशी खात्री करुन घेतली होती? म्हणजे 'हे गुन्हेगार नव्हते' असा दावा मी करतो आहे, असा अपलाप करुन कांगावा करत येणार्‍यांना सीनियर के.जी.त जाण्यासाठी शुभेच्छा. याची दोन का… पुढे वाचा »

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

ओझार्क: पांढरपेशांच्या Quicksand Pit ची गोष्ट - २


  • विषयसंगतीमुळे हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

ओझार्क: पांढरपेशांच्या Quicksand Pit ची गोष्ट - १


  • विषयसंगतीमुळे हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »

रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८

भेकड नेते आणि शेंदाड शिपाई


  • ज्या लोकांना वाटतं किंवा वाटत होतं की महात्मा गांधीजींना मारलंच पाहिजे होतं, त्यांना ‘जिना आणि माऊंटबॅटन (किंवा त्यांचे पूर्वसुरी) यांना का मारलं नाही?’ असा प्रश्न पडत नाही. याचं एक कारण म्हणजे विचार करणे त्यांच्या रक्तात नसते, हे तर आहेच पण त्या पलीकडे मुळात गांधींबद्दल द्वेष असणार्‍यांच्या प्रचाराला बळी पडलेले असतात. या प्रचारकांच्या द्वेषामध्ये एका बनियाने आपल्या सारख्या जन्मजात श्रेष्ठींऐवजी देशातील जनतेचे नेतृत्व करावे, ही अहंकाराला बसलेली मोठी ठेच मुख्यत: कारणीभूत असते . आता ज्यांना जिना किंवा एखादा ब्रिटिश अधिकारी ठार मारण्याऐवजी गांधींवर हत्यार चालवणे, त्यांची हत्या करणे अधिक महत्वाचे का वाटत असावे? याचे एक कारण म्हणजे त्यांना परिणामापेक्षा श्रेयाची अधिक आस होती हे नंतर दिसून आले आहे . ज्यांना असं वाटत होतं किंवा वाटतं, ते प्रा… पुढे वाचा »

मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

समाजमाध्यमातले गुंड


  • सामाजिक बहिष्कार किंवा प्राकृतात ‘वाळीत टाकणे’ ही एक सामाजिक विकृती मानली जाते. केवळ या ब्रह्मास्त्रामुळे अनेक निरपराधांना जातपंचायतीच्या अन्यायकारक निर्णयांपुढे मान तुकवावी लागत असे/लागते. यातून जातपंचायत ही एक शोषक व्यवस्था म्हणून उदयाला आली. त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या विकेंद्रीकरणाचे प्रारूप असलेली जातपंचायत, आज विसर्जित करण्यासाठी चळवळ करण्याची वेळ आली आहे. या जुनाट परंपरेचा आविष्कार नव्या स्वरूपात होतो आहे. जे फेसबुकवरून अमुक कंपनीची उत्पादने घेऊ नका. तमुक अभिनेता वा अभिनेत्रीचे चित्रपट पाहू नका. अमके अ‍ॅप ताबडतोब अन-इन्स्टॉल करा... असे वाळीत टाकण्याचे आदेश आपल्या ‘जाती’च्या माणसांना देत असतात. उपभोगाची, प्रचार-प्रसाराची आणि उपभोगाची साधने बदलली तरी मानसिकता तशीच मध्ययुगीन, संख्याबळावर ए… पुढे वाचा »

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

शेणकिड्यांचा समाज माझा


  • अनेक दिवसांनी फेसबुकवर काल थोडा वेळ घालवला नि पश्चात्ताप झाला. आपण किती क्षुद्र, नृशंस, किळसवाणे लोक आहोत याचे पुरेपूर दर्शन घडले. आपले संस्कार किडके आहेत, माणसे किडकी आहेत. आपण माणसाकडे माणूस म्हणून पाहायला शिकवत नाही. त्याच्याकडे हिंदू किंवा मुस्लिम, ब्राह्मण किंवा दलित, आमच्या ग्रेट ओसाडवाडी पेक्षा दुय्यम असलेल्या उकिरडावाडीचा माणूस, स्त्री नव्हे मादी– मग ती आठ वर्षांची असो वा सत्तर वर्षांची, असे पाहायला शिकवतो. आपल्या बिनअकली सुमारपणाचे खापर आपण अन्य गटांवर फोडून कांगावा करतो. आठ वर्षांच्या पोरीवर झालेल्या बलात्काराची बातमी ऐकूनही, आमची पहिली चिंता असते ती आमचा नेता, आमचा धर्म, आमचा दगडी देवबाप्पा वाचवण्याची. असल्या किळसवाण्या मानसिकतेला धारण करणार्‍या कुडीला माणूस तर सोडा, जनावर म्हणणे हा जनावराचा घोर अपमान आहे. आमची संस्कृती म… पुढे वाचा »

मंगळवार, ६ मार्च, २०१८

नक्षलवादी उजवे आणि सनातनी डावे


  • लेनिनच्या रशियाने भारताला केलेली मदत उल्लेखून ‘लेनिनचा’ पुतळा पाडला म्हणून निषेध करणारे, आणि लेनिनने कित्ती लोक मारले, त्याचा पुतळा फोडला म्हणून काय झालं? हा प्रश्न विचारणारे दोघेही चकले आहेत. कदाचित हेतुत: तसे करत असतील तर संकुचित आहेत, स्वार्थी आहेत असे म्हणावे लागेल. पुतळा फोडणे ही कृती फोडणार्‍याच्या मनातील हिंसेची अभिव्यक्ती आहे. ‘आम्हाला न पटणारे सगळे आम्ही हिंसेने उखडून टाकू, हा आमचा अधिकार आहे', असे ते मानतात, असा याचा अर्थ असतो. इथे नक्षलवाद्यांची आठवण होते. आम्हाला मान्य नसलेली व्यवस्था आम्ही हिंसक मार्गानेही उलथून टाकू, त्यात त्या व्यवस्थेशी निगडित असलेल्या कुणाचीही हत्या करणे समर्थनीय आहे, तो आमच्या दृष्टिने स्वीकारार्ह मार्ग आहे असे ते मानतात. लेनिनचा पुतळा उखडणारे वैचारिकतेच्या दुसर्‍या टोकाला असूनही तोच डीएनए शेअर करता… पुढे वाचा »

गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

आभासी विश्व आणि हिंसा


  • ज्याने कुणी इंटरनेटला Virtual World (याचा ‘आभासी विश्व’ असा अतिशय वाईट अनुवाद केला जातो) असा शब्द प्रथम वापरला त्याच्या कल्पनाशक्तीला दाद द्यायला हवी. ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस उगवलेल्या ‘वर्ल्ड वाईड वेब’ या संकल्पनेतून केवळ एकाच भूभागावरचे नव्हे तर जगभरात पसरलेले संगणक परस्परांना जोडण्याची सोय झाली. त्यातून कल्पनांचा विस्फोट झाला आणि माणसाचे जग त्याने उलटे पालटे करून टाकले. या इंटरनेटने एका बाजूने माणसाला आजवर कधीही सापडले नव्हते असे प्रचंड व्याप्ती असलेले ‘माध्यम’ दिले तर दुसरीकडे थेट एक मानवनिर्मित, कृत्रिम असे ‘विश्व’च निर्माण केले. आज माणसाच्या जगातील माहितीशी निगडित बहुसंख्य जबाबदार्‍या हे माध्यम जग लीलया पेलून धरते आहे, तर हे नवे विश्व माणसाच्या अद्याप विकसितही न झालेल्या पैलूंना नवी क्षितीजे प्रदान करते आहे. या नव्या माध्यमाने… पुढे वाचा »

रविवार, ८ मार्च, २०१५

नागालँडमधील घटनेची परिमाणे आणि अन्वयार्थ


  • या आठवड्यातील गुरुवारी नागालँडमधे एका तथाकथित बलात्कार्‍याला संतप्त जमावाने तुरुंगातून खेचून बाहेर काढले, आणि मरेस्तोवर मारले. त्या मारहाणीने मृत्यू झाल्यावर त्याच्या मृतदेहाला भर चौकात फाशी दिल्याप्रमाणे टांगून ठेवले. जमावातील लोकांची संख्या आणि त्यांचा आवेश पाहता तुरुंगावर नेमलेले अधिकारी नि पोलिस यांना जमावाला विरोध करण्याची हिंमत झालीच नाही. या घटनेवरून सुमारे दहा वर्षांपूर्वी नागपुरात दोनेकशे स्त्रियांच्या जमावाने अक्कू यादव नावाच्या बलात्कार्‍याला, सराईत गुंडाला, भर रस्त्यावर दगडांनी ठेचून मारल्याची आठवण होणे अपरिहार्य होते. प्रथम संघटना उभी करून, तिच्या सहाय्याने स्वार्थी हेतू मनात ठेवून, हिंसक घटना घडवून आणल्याची उदाहरणे आपल्या देशात पैशाला पासरी मिळतात. पण मुळातच समाजातील एक असंघटित भाग एखाद्या आरोपीविरुद्ध वा गुन्हेगाराविरुद्ध… पुढे वाचा »

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०१४

आरसा दाखवणारा ‘रेगे’


  • पौगंडावस्था आणि तारुण्य या सीमारेषेवर उभा असलेला कुणी एक रेगे. त्या वयात संभ्रम कमी होत त्याची जागा प्रचंड ऊर्जा आणि ऊर्मीने घेतलेली असते. याच वयात माणसे अधिक प्रयोगशील असतात, धाडसी असतात. बेदरकारपणा, धोका पत्करण्याची तयारी याच काळात सर्वात अधिक असते. अगदी रेगेसारखा पापभीरू मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगाही त्याला अपवाद नसतो. दहीहंडी पाहायला गेलेला रेगे. योगायोगानेच तिथल्या हाणामारीत सहभागी असल्याच्या संशयाने त्याची वरात पोलिस स्टेशनात आणली जाते. त्याच्यासारख्या पार्श्वभूमीच्या तरुणाला पोलिस स्टेशनचे आतून दर्शन घडावे अशी वेळ आलेली नसतेच. त्यामुळे एकीकडे भलत्याच लफडयात अडकल्याची, परीक्षा बुडण्याची आणि मुख्य म्हणजे आई-वडील काय म्हणतील ही अगदी खास मध्यमवर्गीय भीती आहेच. पण त्याच वेळी ‘आयला, आपण पहिल… पुढे वाचा »