Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
धर्मव्यवस्था लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धर्मव्यवस्था लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ११ मे, २०२५

Will He...?


  • रोममधील कॅथलिक चर्चचे सर्वोच्च धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर नवे पोप म्हणून चर्चच्या सर्वोच्चपदी आरूढ झालेले Robert Fancis Prevost हे गणित विषयातील पदवीधर आहेत. या संयोगवश सुचलेली ही कविता. Will He...? Pope Leo XIV Is it a new hope, if a Mathematician becomes a Pope? Will he count fractions, and not just whole numbers? Will he be rational, filter out infinite irrational? Will he prefer integration over the age-old differentiation? Will he draw a line with a color other than white? Will he connect to the point outside his circle? Will he...? पुढे वाचा »

गुरुवार, २ जून, २०२२

हनुमान जन्मला गं सखे


  • अमेरिकेमध्ये जसे ’खटला जॉनी डेप जिंकेल, की त्याची भूतपूर्व पत्नी एम्बर हर्ड?’ हा सध्या राष्ट्रीय प्रश्न होऊन बसला आहे, तद्वत ’हनुमानाचे जन्मस्थान कोणते?’ हा विषय भरतभूमीमध्ये सांप्रतकाळी महत्वाचा होऊन बसला आहे. किष्किंधा, अंजनेरी यांच्या वादात आता सोलापुरातील कुगावनेही उडी घेतली आहे. तीनही ठिकाणी ’हनुमानाचा जन्म आमच्या गावी झाला’ अशी श्रद्धा असणारे अनेक लोक आहेत. ते तसे मान्य झाल्याने वाढलेल्या भक्ति-पर्यटनामध्ये त्यातील काहींचे आर्थिक हितसंबंधही गुंतलेले असतील, हे ही त्यांच्या ’श्रद्धे’चे कारण असू शकेल. पण अशा माणसांना वगळून आपण ज्यांची खरोखर तशी श्रद्धा आहे अशांचीच बाजू ध्यानात घेऊ. श्री भक्त-हनुमान मंदिर रम्बोदा, श्रीलंका. विषय एका धर्मांतर्गत असल्याने सध्या शास्त्रार्थावर न… पुढे वाचा »

बुधवार, २० एप्रिल, २०२२

कुराणाच्या संस्कृत अनुवादाच्या निमित्ताने


  • बातमी: कुराणाचा प्रथमच संस्कृतमध्ये भावानुवाद ; दिवंगत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या ग्रंथाचे शुक्रवारी प्रकाशन --- काही काळापूर्वी जावेद अख्तर यांचे रेख़्ता या वार्षिक उर्दू संमेलनातील भाषण ऐकले होते, त्यावर ’वेचित चाललो...’ वर (’ भाषा: राष्ट्र, धर्म... आणि हत्यार ’) लिहिलेही होते. त्या भाषणादरम्यान त्यांनी केलेला एक उल्लेख मला रोचक वाटला होता. ते असं सांगतात की, १७९८ मध्ये कुराण प्रथम उर्दूमध्ये अनुवादित केले गेले. त्यावेळी ’असल्या अमंगळ भाषेत आमचे पवित्र पुस्तक लिहिले’ म्हणून तो अनुवाद करणार्‍याविरोधात मौलवींनी फतवा काढला होता. त्याचवेळी ’असल्या अमंगळ भाषेला ’देव’नागरी नावाने ओळखळी जाणारी आमची पवित्र लिपी वापरल्याने ती विटाळेल’ असा विरोध हिंदू समाजातील संभावितांनी केला होता. ’अमंगळतेच्या कल्पना अमंगळ मनातूनच येतात’ हे माझे … पुढे वाचा »

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

हिजाब, मेंदी आणि व्यवस्थांची वेटोळी


  • सुमारे पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका कॉन्व्हेंट संचालित शाळेत मुलींनी मेंदी लावली म्हणून त्यांना शाळेतून घरी पाठवण्यात आले होते. (त्याहीपूर्वी अशा घटना घडत होत्याच. स्मरणात असलेली ही शेवटची. ) शाळेच्या नियमांत कोणतीही सौंदर्यप्रसाधने (लिपस्टिक, नेलपॉलिश वगैरेंसह) लावण्यास मनाई असल्याने हा शिस्तभंग आहे असे शाळेचे म्हणणे होते. शाळा कॉन्व्हेन्ट संचालित असल्याने लगेचच त्याला धार्मिक वळण मिळाले. मेंदी लावणे ही आमची हिंदू रीत आहे असे म्हणत काही संघटनांनी वादात उडी घेतली. थोडा वाद होताच शाळॆने मुलींवरची निलंबनाची कारवाई रद्द केली... गंमत अशी की तेव्हा आमच्या धार्मिक रीतींना शाळेच्या नियमाहून वरचढ मानावे म्हणणारे आज नेमकी उलट भूमिका घेत आहेत. कारण आता मुद्दा आमच्या नव्हे ’त्यांच्या… पुढे वाचा »

रविवार, ७ जून, २०२०

रंगार्‍याचा ब्रश


  • रंग लावण्याचा ब्रश हा परावलंबी असतो. भिंती(!)वर रंग लावण्याचे काम त्याचे असते खरे, पण रंग कोणता लावायचा ते डब्यात कोणता रंग आहे यावरुन ठरते. ’जा मी हा केशरी रंग लावणार नाही. लाल किंवा हिरवा आणलास तरच लावेन’ असे ब्रश कधी रंगार्‍याला सांगू शकत नाही. रंगार्‍याने निवडलेला रंग भिंतभर पसरवण्याचे काम तो इमानेइतबारे करत असतो. रंगार्‍याने आज लाल रंगाशी सलगी केली की ब्रश त्याचे फटकारे भिंतीवर मारतो. तो ओतून देऊन रंगार्‍याने ’केसरिया बालम’ निवडला की ब्रश त्या रंगाने भिंत रंगवून काढतो. थोडक्यात रंगार्‍याचा रंग बदलला की ब्रशचा रंग बदलतो, आणि त्याच्या "भिंती"चाही! ब्रशचा मालक असलेल्या रंगार्‍याच्या निष्ठा मात्र ब्रशइतक्या घनतेच्या नसतात, त्या तरल असतात. रोख पैसे मोजणार्‍या कुणाही घरमालकाच्या भिं… पुढे वाचा »

रविवार, २४ मे, २०२०

राष्ट्रवादाचा ‘तंत्र’मार्ग


  • यापूर्वीच्या निवडणुका आणि २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुका यांत एक महत्त्वाचा फरक आहे; तो म्हणजे यांत झालेला इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये एका बाजूने वृत्तवाहिन्या येतात, तसेच इंटरनेटच्या माध्यमांतील संकेतस्थळे, फेसबुक आणि ट्विटरसारखी समाजमाध्यमे, मोबाइल व त्यावरील व्हॉट्सअ‍ॅपसारखी संवादी माध्यमे या साऱ्यांचा समावेश होतो. या सर्व माध्यमांतून मोदींच्या खऱ्या-खोटय़ा यशोगाथांचा, काँग्रेसच्या खऱ्या-खोटय़ा पापांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी एक सूत्रबद्ध यंत्रणा उभी करण्यात आली होती. जी कमालीची यशस्वी ठरली. यात अधिकृत माध्यमांमधील प्रतिनिधी होते, तसेच समाजमाध्यमांमध्ये मोदींचा किल्ला लढवणारे स्वयंसेवकही. ही यंत्रणा उभी करण्यामागचे मेंदू व हात आणि त्या यंत्राचे इतर भाग यांचा आढावा रोहित चोप्रा यांनी ‘द व्हर्च्युअल हिंदू र… पुढे वाचा »

मंगळवार, ३ मार्च, २०२०

महाराष्ट्र काँग्रेसला अटक करा…


  • राज्य सरकार मुस्लिमांसाठी ५% आरक्षण देणार अशी बातमी वाचली. तीन पायांच्या सरकारचा हा निर्णय अनेक अर्थांनी ‘बुडत्याचा पाय खोलात’ नेणारा आहे. पहिला मुद्दा आहे तो राजकीय आरोपाचा, मुस्लिम लांगुलचालनाचा. भाजपचे माथेफिरू हिंदुत्व याचा फायदा उठवणार हे तर उघड आहे. तीन पायांच्या सरकारमधली सेना आपले हिंदुत्व पुरेसे सिद्ध करून बसलेली असल्याने भाजपच्या हातात कोलित मिळाले तरी त्याची झळ सोसण्यास दोन काँग्रेस सोबत असल्याने, आणि शिक्षणखाते सेनेच्या वाट्याला आलेले नसल्याने, सहजपणे हात वर करू शकेल. राष्ट्रवादीचे धोरण ‘गंगा गए गंगादास, जमना गए जमनादास’ असे असल्याने भाजप त्यांनाही फार टोचणार नाही. पण काँग्रेस मात्र यात साऱ्याला अंगावर घेऊन आणखी खोल गर्तेत जाणार आहे. याला एकाहून अधिक कारणे आहेत. पहिले म्हणजे सध्या चालू असलेल्या सीएएविरोधी आंदोलनाच्या बाजूल… पुढे वाचा »

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

शेणकिड्यांचा समाज माझा


  • अनेक दिवसांनी फेसबुकवर काल थोडा वेळ घालवला नि पश्चात्ताप झाला. आपण किती क्षुद्र, नृशंस, किळसवाणे लोक आहोत याचे पुरेपूर दर्शन घडले. आपले संस्कार किडके आहेत, माणसे किडकी आहेत. आपण माणसाकडे माणूस म्हणून पाहायला शिकवत नाही. त्याच्याकडे हिंदू किंवा मुस्लिम, ब्राह्मण किंवा दलित, आमच्या ग्रेट ओसाडवाडी पेक्षा दुय्यम असलेल्या उकिरडावाडीचा माणूस, स्त्री नव्हे मादी– मग ती आठ वर्षांची असो वा सत्तर वर्षांची, असे पाहायला शिकवतो. आपल्या बिनअकली सुमारपणाचे खापर आपण अन्य गटांवर फोडून कांगावा करतो. आठ वर्षांच्या पोरीवर झालेल्या बलात्काराची बातमी ऐकूनही, आमची पहिली चिंता असते ती आमचा नेता, आमचा धर्म, आमचा दगडी देवबाप्पा वाचवण्याची. असल्या किळसवाण्या मानसिकतेला धारण करणार्‍या कुडीला माणूस तर सोडा, जनावर म्हणणे हा जनावराचा घोर अपमान आहे. आमची संस्कृती म… पुढे वाचा »

शुक्रवार, ३० मार्च, २०१८

‘माझा’ धर्म आणि मी


  • धर्म ही स्वीकारण्याची, अनुसरण्याची गोष्ट आहे, लादण्याची नव्हे. माझा धर्म कोणता हे मीच ठरवणार, अन्य कुणी ठरवून कसे चालेल? जर मी ‘पास्ताफारियन’ आहे आणि मी ‘फ्लाईंग स्पागेती मॉन्स्टर’ या देवाची पूजा करणार आहे, तर इतर कुणी त्यावर कसे काय आक्षेप घेऊ शकतील? जन्मजात मिळालेला धर्म हाच तुमचा धर्म असला पाहिजे, असे बंधन जगाच्या पाठीवर कुठेही नाही . पण बहुतेक माणसे आळशी असतात. वारशाने, अनायासे जे मिळाले तेच श्रेष्ठ मानून चालतात. इथवर ठीक असते. पण इथेच न थांबता, पुढे इतरांनीही ते मानावे म्हणून आग्रह धरतात, इतरांचा धर्म मोडून काढायचा प्रयत्न करतात. हा मूर्खपणा तर आहेच, पण इतरांच्या अधिकारांचे उल्लंघनही आहे. आम्ही बहुसंख्य आहोत म्हणजे आम्ही म्हणू तसे नियम, हे बहुमताच्या राजकीय व्यवस्थेबाबत खरे आहे. पण… पुढे वाचा »