Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
पुस्तक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुस्तक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २४ मे, २०२०

राष्ट्रवादाचा ‘तंत्र’मार्ग


  • यापूर्वीच्या निवडणुका आणि २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुका यांत एक महत्त्वाचा फरक आहे; तो म्हणजे यांत झालेला इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये एका बाजूने वृत्तवाहिन्या येतात, तसेच इंटरनेटच्या माध्यमांतील संकेतस्थळे, फेसबुक आणि ट्विटरसारखी समाजमाध्यमे, मोबाइल व त्यावरील व्हॉट्सअ‍ॅपसारखी संवादी माध्यमे या साऱ्यांचा समावेश होतो. या सर्व माध्यमांतून मोदींच्या खऱ्या-खोटय़ा यशोगाथांचा, काँग्रेसच्या खऱ्या-खोटय़ा पापांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी एक सूत्रबद्ध यंत्रणा उभी करण्यात आली होती. जी कमालीची यशस्वी ठरली. यात अधिकृत माध्यमांमधील प्रतिनिधी होते, तसेच समाजमाध्यमांमध्ये मोदींचा किल्ला लढवणारे स्वयंसेवकही. ही यंत्रणा उभी करण्यामागचे मेंदू व हात आणि त्या यंत्राचे इतर भाग यांचा आढावा रोहित चोप्रा यांनी ‘द व्हर्च्युअल हिंदू र… पुढे वाचा »

शनिवार, ४ जानेवारी, २०२०

‘आठवडी बाजारा’ची मुशाफिरी


  • ( राज कुलकर्णी यांच्या ’आठवडी बाजार आणि समाजजीवन’ या पुस्तकासाठी लिहिलेली प्रस्तावना ) आपल्या देशातील शिक्षणक्रमातील इतिहासाच्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने राजकीय आणि प्राचीन इतिहासावर भर असतो. जगण्याशी निगडित असणाऱ्या जड वस्तूच्या, आयुधांच्या आणि माणसाच्या जीवनशैलीचा जो अतूट संबंध असतो, त्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसते. याचे कारण ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये त्या त्या काळचे शासनकर्ते, राज्ये, साम्राज्ये आदींचा सनावळीसह काटेकोर उल्लेख असला, आणि त्याच्या अनुषंगाने सांस्कृतिक इतिहासाची काही पानेही जोडलेली असली, तरी त्या काळी प्रचलित असणाऱ्या वस्तू आणि मनोरंजनादि पैलूंचा वेध घेणाऱ्या जड वस्तूच्या इतिहासाची, विकासाची प्रामुख्याने उपेक्षाच दिसते. क्वचित कुठे असली, तरी विद्यार्थीच काय अभ्यासकांपैकी बहुसंख्य व्यक्तीदेखील त्यांना फार महत्त्व देताना… पुढे वाचा »

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१९

पुलं जन्मशताब्दी


  • ज्यांचे नाव न घेता फक्त ’भाई’ म्हणून कानाच्या पाळीला हात लावणार्‍यांपासून, नाव उच्चारताच पोटशूळापासून मस्तकशूळापर्यंत सारे आजार उसळून येणार्‍यांपर्यंत सर्वांच्या आयुष्याचा भाग झालेला 'हशिवनारा बाबा’ आज शंभरीत पोचला. विदूषक, नाटक्या, लेखक, परफॉर्मर, गायक; भीमण्णा, मन्सूरअण्णा, कुमार, वसंतखाँ पासून आरती प्रभू, बोरकरांपर्यंत अनेक ’उत्तम गुणांची मंडळी’ जमवून जगण्याचा उत्सव करणारा, हसता हसवता जगण्यातील विरुपतेवर बोट ठेवणारा, दांभिकतेची यथेच्छ खेचणारा आणि गाता, हसवता अचानक अंतर्मुखही करणार्‍या आजोबाला सेंचुरीच्या शुभेच्छा. --- भारतीय इतिहासात हे सदैव असेच चालत आले आहे का? आत्मवंचना करत जगत राहण्याखेरीज काही इलाज नाही का? बालवयात, तरुण वयात, मनाच्या तुलनेने अधिक अपरिपक्व अवस्थेत ज्याला आपण सं… पुढे वाचा »

रविवार, २१ जून, २०१५

एका शापित नगरीची कहाणी


  • ‘ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. तरीही माणसं आपला इतिहास धुंडाळतात, हजारो वर्षांपूर्वीच्या कुण्या श्रेष्ठ व्यक्तीशी आपले नाते जोडून त्याला आपल्या वर्तमानातल्या अस्तित्वाचा आधार बनवू पाहतात. अनेक वर्षांच्या परंपरा असलेला समाज यात आपल्या अस्मितांची स्थानेही शोधत असतो. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तीन ‘बिब्लिकल’ धर्मांचे आणि त्यांच्या असंख्य पंथोपपंथांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘जेरुसलेम’ नगरीला या सार्‍या परंपरांमधे अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकाच नगरीचे अस्तित्व आणि महत्त्व इतका दीर्घकाळ टिकून राहिल्याचे दुसरे उदाहरण इतिहासात नाही. त्यामुळे जेरुसलेमचा इतिहास हा श्रद्धाळूंच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा, तितकाच अभ्यासकांच्या दृष्टीनेही. पण जिथे श्रद्धांचा प्रश्न असतो, तिथे त्या अभ्यासात वस्तुनिष्ठता येणे बव… पुढे वाचा »

गुरुवार, ९ एप्रिल, २०१५

‘सायलेंट मोडमधल्या कविता’: नव्या जाणिवांची विचक्षण कविता


  • गेल्या पंचवीस-एक वर्षांचा काळ हा आपल्या जीवनात अनेक आमूलाग्र बदल घडवणारा ठरला. नव्वदीच्या दशकात बंदिस्त व्यवस्थेच्या काही खिडक्या उघडल्या जाऊन ‘जागतिकीकरण’ या नव्याच व्यवस्थेने या देशात हातपाय पसरायला सुरुवात केली. या बदलाचा एक मोठा भाग व्यापला तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीने. गेल्या शतकाच्या अखेरच्या दशकात आपल्या दारी आलेल्या संगणकाने, आणि या शतकाच्या सुरुवातीपासून आपल्या हाताला जणू सहावे बोट असावे असा चिकटून राहू लागलेला ‘मोबाईल’ या दोन महत्त्वाच्या आयुधांनी आपल्या जगण्याचे आयाम बदलले, व्याप्ती बदलली. जुन्या व्यवस्थेच्या पाईक असलेल्यांना हे बदल कुठे रुचेनासे झाले, ‘माणसे -मोबाईल नि संगणकावर - खूप बोलू लागली आणि संवाद कमी झाला’ असा आक्षेप या नव्या जीवनपद्धतीवर घेतला जाऊ लागला. पण या पलिकडे जाऊन तंत्रज्ञानाने माणसाच्या … पुढे वाचा »

रविवार, ७ जुलै, २०१३

आडाडता आयुष्य - गिरीश कार्नाड


  • आयुष्यात असा एखादा कालखंड येतो की अचानक बर्‍याचशा अनपेक्षित पण स्वागतार्ह (खरंतर इथे मला इंग्रजीतल्या most welcome – आनंदाने स्वीकाराव्यात अशा – ची छटा अपेक्षित आहे, पण काहीवेळा परभाषेपेक्षाही मातृभाषेत नेमकेपणा आणणे अवघड जाते ते हे असे) अशा बर्‍याचशा गोष्टी एकापाठोपाठ एक आपल्याकडे चालत येतात. आपल्या जगण्यातला तो एक तुकडा पूर्णपणे एखाद्या आवडत्या गोष्टीच्या नावेच होऊन जातो. गेल्या महिन्याभरात असाच काहीसा अनुभव आला तो नाटकांबाबत. अचानक दोन चार सुरेख नाटके पहायला मिळाली. त्याच वेळी रंगभूमीशी, रंगकर्मींशी संबंधित चार पाच पुस्तके एकदम हाती लागली. हाती घबाड गवसल्याचा किंवा भर उन्हाळ्यात कुणीतरी कलिंगडाच्या गराड्यात नेऊन बसवल्याचीच भावना झाली. सुदैवाने रमतगमत का होईना त्यातल्या दोन पुस्तकांची ‘नैया पार’ झाली. योगायोग असा की ही दोन्ही आत्मचरित… पुढे वाचा »