Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
ललित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ललित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

शोले पुन्हा पाहिल्यानंतर


  • विषयसंगतीमुळे हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१९

पुलं जन्मशताब्दी


  • ज्यांचे नाव न घेता फक्त ’भाई’ म्हणून कानाच्या पाळीला हात लावणार्‍यांपासून, नाव उच्चारताच पोटशूळापासून मस्तकशूळापर्यंत सारे आजार उसळून येणार्‍यांपर्यंत सर्वांच्या आयुष्याचा भाग झालेला 'हशिवनारा बाबा’ आज शंभरीत पोचला. विदूषक, नाटक्या, लेखक, परफॉर्मर, गायक; भीमण्णा, मन्सूरअण्णा, कुमार, वसंतखाँ पासून आरती प्रभू, बोरकरांपर्यंत अनेक ’उत्तम गुणांची मंडळी’ जमवून जगण्याचा उत्सव करणारा, हसता हसवता जगण्यातील विरुपतेवर बोट ठेवणारा, दांभिकतेची यथेच्छ खेचणारा आणि गाता, हसवता अचानक अंतर्मुखही करणार्‍या आजोबाला सेंचुरीच्या शुभेच्छा. --- भारतीय इतिहासात हे सदैव असेच चालत आले आहे का? आत्मवंचना करत जगत राहण्याखेरीज काही इलाज नाही का? बालवयात, तरुण वयात, मनाच्या तुलनेने अधिक अपरिपक्व अवस्थेत ज्याला आपण सं… पुढे वाचा »

गुरुवार, १ मार्च, २०१८

ठणाठणा वाजे बीन


  • ‘एखाद्या कामाची पद्धतशीरपणे लहान लहान कामांत विभागणी करुन ते पार पाडणे, वा एखाद्या प्रश्नाचे विश्लेषण करुन त्याचे उत्तर शोधणे हे आपले कौशल्य आहे’ हा माज उतरवायचा असेल तर एक करा. घरी एक ‘बीनबॅग’ आणा! नाही, माझे डोके पूर्ण ताळ्यावर ठेवूनच मी लिहिले आहे हे. --- बॅग येते. तुम्ही बीन्स स्वतंत्रपणे मागवता. ‘बीन्स भरताना दारे खिडक्या घट्ट लावून घे’ अशी अनुभवजन्य ताकीद मित्राने तुम्हाला दिलेली असते. तुम्ही तो सल्ला तंतोतंत पाळता. थोड्या चुकार बीन्स वगळता – त्यांच्यावर बारीक नजर ठेवून तुम्ही लगेचच ताब्यात घेता – अगदी व्यवस्थितपणॆ बॅगमध्ये त्या भरता. अजिबात गोंधळ न होता काम पार पाडल्याबद्दल खुश होऊन, स्वत:लाच शाबासकी देता. काही दिवस जातात... सफाईसाठी तुम्ही बॅग उचलता, तर पाठीमागे एक दोन ब… पुढे वाचा »

गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

कोटीच्या कोटी उड्डाणे*...


  • (‘अ.भा. छद्मविज्ञान काँग्रेस’च्या एक हजार आठशे तेराव्या वार्षिक अधिवेशनात सादर केलेला शोधनिबंध) जर्मनीत अठराव्या शतकात जन्मलेला सॅम्युअल हनिमान भारतीय वंशातला होता. हनिमान हे त्याचे कुलनाम ‘हनुमान’ याचे जर्मन रूप. हा रामायणकालीन हनुमानाचा वंशज होता. आफ्रिकेत जसे प्रत्येक वंशाचे जमातीचे एक झाड असते. तो वंश त्या झाडाच्या नावे ओळखला जातो. तसे भारतात मूळ पुरुषाच्या नावाने हे तर जगजाहीर आहेच. (त्यातून पुढे गोत्र संकल्पना आली.) खरा इतिहास हा की हनुमान हा वन्यज होता, पण तो वानर नव्हता. हिंदू नि हिंदुस्तानद्वेष्ट्या पाश्चात्त्य लोकांनी रामायणात प्रक्षेप करुन तसे लिहिले नि त्याचे महत्व कमी केले. पण हे करतानाच त्याचे कार्य, त्याचे ग्रंथ चोरुन नेऊन त्यातील ज्ञान, शोध, माहिती आपल्या नावावर खपवली. दु… पुढे वाचा »

मंगळवार, २५ जुलै, २०१७

एका धबधब्याचे विधिलिखित


  • स्थळः कुण्या एका घाटातील एक अनामिक, पण नयनरम्य धबधबा काळः ऐन पावसाळ्याचा प्रसंग १: दिवसः आठवड्याअखेरचा वेळः ऐन दुपारची ऐन धुवांधार पावसात धबधब्याची मजा लुटण्यासाठी आलेले उत्साही पर्यटक. दोन चार मिनीबसेस, पाच सहा ‘कॉर्पिओ’ आणि आठ दहा मध्यमवर्गीय गाड्या घाटरस्ता अडेल, वाहनांना, वाहतुकीला अडथळा होईल, याची फिकीर न करता उभ्या केलेल्या. एका स्कॉर्पिओवर थोरल्या आबासाहेबांचा फोटो/स्टिकर, मध्यमवर्गीय गाड्यांवर मागच्या काचेतून डोकावणार्‍या मांजरीचे, कुत्र्याचे किंवा वाघाचे चित्र... आणि हो, गाडी पार्क करताना ऐकू येणारी ‘सारे जहाँसे अच्छा’ ही रिवर्स इन्डिकेटर ट्यून. आसपास चहा, वडापाव, मक्याची भाजलेली कणसे यापासून थेट ‘टू मिनिट नूडल्स’ तयार करून देणारी टपरीवजा दुकाने नि हातगाड्या. एक रोमँटिक जोडी ध… पुढे वाचा »

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०१६

‘विकसित’ भारतातील वाघ


  • नव्या बातम्या ‘विकसनशील’ नव्हे विकसित भारतातल्या... हे meme कायप्पामार्फत मिळाले असल्याने याचा चतुर कर्ता मात्र ठाऊक नाही. १. वाघांच्या एकादशीच्या उपासासाठी साबुदाणा आणि शेंगदाणे यांच्यासाठी टेंडर मागवण्यात येत आहे. विहित नमुन्यात अर्ज पाठवावेत. २. ‘करवा चौथ’च्या वेळी चाळण्या उपलब्ध करून न दिल्याबद्दल समस्त वाघिणींनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले, आणि सायंकाळी पंचगव्य सेवनाने सोडले. ३. कालच्या काकडीच्या कोशिंबीरीत खडे होते म्हणून वाघांनी जेवण आणून देणार्‍या मदतनीसाला चारही बाजूंनी घेरुन कोपर्‍यात घेतले आणि..... दहा उठाबशा काढायला लावूनच सोडले. ४. आठवड्याचा मेन्यू ठरवण्याचा लोकशाही हक्क वाघांना मिळाल्यापासून त्यांच्यात रोज भांडणे होताना दिसू लागली आहेत. काल ‘तांदळाची… पुढे वाचा »

मंगळवार, १ डिसेंबर, २०१५

काजळवाट


  • विषयसंगती ध्यानात घेऊन ही पोस्ट ‘ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवली आहे. ती ‘ इथे ’वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »

मंगळवार, ३० जुलै, २०१३

काही नि:शब्दकथा


  • ( कथा, प्रसंग आणि पात्रे काल्पनिक. परंतु तरीही कोण्या जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटनांशी साधर्म्य आढळल्यास लेखकाला ताबडतोब सूचना द्यावी. जेणेकरून त्या कल्पित-वास्तवाच्या तौलनिक अभ्यासासाठी शिष्यवृत्तीची मागणी नोंदवणारा अर्ज करता येईल. ) प्राचीन: https://steemit.com/ येथून साभार. एकदा एक लांडगा नदीवर पाणी पीत होता. पाणी पिता पिता त्याच्या लक्षात आले की प्रवाहाच्या खालच्या बाजूला एक लहानसे कोकरूही पाणी पीत होते. “तू माझ्या पाण्याला तोंड लावून ते उष्टे करत आहेस.” लांडगा कोकरावर खेकसला. “असं कसं होईल वृकराज. मी तर प्रवाहाच्या खालच्या बाजूला पाणी पीत आहे, इकडून पाणी उलट तुमच्या दिशेने कसे जाईल.” “तू तर भलताच उद्धट दिसतोस, वर्षभरापूर्वीही तू माझ्याशी असेच उद्धट वर्तन केले होतेस.” ला… पुढे वाचा »