-
छायाचित्र: Laurent Hamels https://www.dreamstime.com/ येथून साभार. समोर एक दगड आहे आणि तुमच्याकडे पाण्याचा लोटा आहे. दगडावर नेमाने पाण्याची धार धरुन त्याला पाघळवण्याचा, मऊ करण्याचा प्रयत्न तुम्ही करता. परिणामी... ...आसपासची बहुसंख्या तुमच्या कृतीला भक्ती समजून त्या दगडाला देवत्व देऊन त्याची पूजा करु लागते. पाण्याने दगडाला मऊपणा येत नाही, फारतर छिद्र पडू शकते. आणि ते छिद्र पाडायचे तर त्या कृतीलाही अनेक वर्षांचे सातत्य हवे हे तुम्हाला समजत नाही, आणि दगडाला देवत्व देण्यास उतावीळ असलेली आलस्यबुद्धी बहुसंख्या तुमच्या आसपास आहे हे तुम्ही समजून घेतलेले नसते. विज्ञान आणि समाजशास्त्र या दोनही विषयांत तुम्ही एकाच वेळी नापास झालेले असता! -oOo- पुढे वाचा »
Vechit Marquee
‘वेचित चाललो...’ वर :   
उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी      
सोमवार, ३० डिसेंबर, २०१९
केला तुका झाला माका
शनिवार, २८ डिसेंबर, २०१९
Being Anti-social
-
A: While we are talking for last half an hour, you peeked in to your mobile at least six to seven times, even though there was no call, no notification sound... Why? B: Someone may have posted something new. on FB, Insta or some WA group that I have muted for notification. I want to be up-to-date with the latest information. A: Why? B: If not, I will feel left out when in a group people start talking about that particular point. A: Why? B: Why...? I may not be able to participate in the discusssion. A: So? B: It will project me as an outdated moron. A: Outdated or out of place... moron or otherwise. B: umm... Out of place maybe. A: And why is that bad, considering the comp… पुढे वाचा »
रविवार, २२ डिसेंबर, २०१९
देशासमोरील समस्या सोडवण्यासाठी मॉडेल्स
-
’देशासमोरील समस्या, अडचणी सोडवण्यासाठी अल्गोरिदम अथवा मॉडेल सुचवा’ असा दहा मार्काचा प्रश्न ’बी.ए. इन लोकप्रतिनिधीशाही’ या भावी लोकप्रतिनिधींसाठी सुरु केलेल्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विचारला होता. त्यात मिळालेली उत्तरे: topuniversities.com येथून साभार. १. ’ठंडा करके खाओ’ अर्थात काँग्रेस मॉडेल: एक आयोग अथवा कमिटी नेमा, त्याचा अहवाल कधीकाळी आलाच तर एक सर्वपक्षीय समिती नेमून तिच्याकडे सोपवून द्या. काही वर्षे डोक्याला ताप नाही. तोवर समस्या नाहीशी होऊन जाईल. २. ’लोहा लोहेको काटता है’ अर्थात भाजप मॉडेल ताबडतोब त्याहून मोठी अडचण निर्माण करा. लोक जुनी विसरुन नवीशी संघर्ष करु लागतील. ३. ’ब्लेम इट ऑन रिओ’ अर्थात पुरोगामी मॉडेल हे सारं ईवीएममुळे आणि धनदांडग्यांच्या स्वार्थामुळे… पुढे वाचा »
शनिवार, २१ डिसेंबर, २०१९
NRC आणि CAAचे आर्थिक गणित
-
NRC: National Register of Citizens. CAA or CAB: Citizens Amendment Act/Bill. NPR: National Peoples Register. --- धार्मिक असोत, राष्ट्रवादी असोत, समाजवादी असोत, कम्युनिस्ट असोत की 'आप’सारखे नवे लोक असोत. यातील सार्यांशी बोलताना माझा भर अंमलबजावणीबाबतच्या प्रश्नांवर असतो . त्यामुळे तात्त्विक पातळीवर त्यांचे तत्त्वज्ञान ’जग्गात भारी आहे’ हे गृहित धरुन चालायची माझी तयारी असते. प्रश्न असतात या तत्त्वांना अनुसरणारी तुमची व्यवस्था माझ्यासारख्या त्यातला नागरिकाला काय देते, काय बंधने घालते आणि काय हिरावून घेते याबाबत. जुन्या व्यवस्थेच्या तुलनेत नव्या व्यवस्थेमध्ये मला - म्हणजे एखाद्या नागरिकाला व्यक्तिश: कोणती अधिकची बंधने स्वीकारावी लागणार आहेत? त्या बदल्यात ही नवी व्यवस्था मला व्यक्तिश: आणि एकुणात समाजाला काय अधिकचे देऊ करणार आहे?त… पुढे वाचा »
बुधवार, १८ डिसेंबर, २०१९
कुण्या देशीचा लेखक
-
clipart.world येथून साभार. जुलमी राजाने पाचपंचवीस नागरिकांना बडवून काढले तेव्हा कुण्या देशीच्या लेखकाने त्रिखंडी ऐतिहासिक कादंबरीचा श्रीगणेशा केला ... कुण्या देशीच्या लेखकाचा पहिला खंड लिहून संपला तेव्हा राजाने हजारो नागरिकांची तुरुंगामध्ये रवानगी केली होती. कुण्या देशीच्या लेखकाने दुसर्या खंडानंतर हुश्श केले तेव्हा देशांतील बुद्धिमंतांचे शिरकाण पुरे झाले होते कुण्या देशीच्या लेखकाने तिसरा खंड पुरा केला तेव्हा राजाने शिक्षणसंस्था मोडून लष्करी संस्था उभ्या केल्या होत्या इतके झाल्यावर राजाने त्या कुण्या लेखकाचा गौरव केला लेखकाने राजाला ’त्रिखंडभूषण’ पदवीने गौरवत त्याचा परतावा दिला काही संघर्षरतांचे बळी पडले बरेच काही उध्वस्त झाले त्यातून राजाची सत्ता हट… पुढे वाचा »
गुड बाय डॉक्टर
-
नेहरु म्हणजे केवळ ’एडविना’ नव्हे सावरकर म्हणजे केवळ ’माफी’ नव्हे पाडगांवकर म्हणजे केवळ ’सलाम’ नव्हे लागू म्हणजे केवळ ’देवाला रिटायर करा’ नव्हे खरंतर या चौघांच्या आयुष्यातील या चार गोष्टी हे खरेतर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे व्यवच्छेदक लक्षण नाहीत, उलट अपवाद अथवा प्रासंगिक मुद्दे आहेत. देशाच्या इतिहासातील नेहरुंच्या अजोड स्थानाऐवजी ज्यांना एडविना आठवते ते बिचारे नेहरुंच्या शिरापर्यंत पाहू शकत नाहीत इतके खुजे असतात. सावरकर म्हणजे माफी अथवा हिंदुत्ववादीच म्हणणारे त्यांचा द्वेष करायचा हे आधी ठरवून त्यानुसार पाहात असतात. पाडगांवकरांसारख्या अस्सल सौंदर्यवादी कवीची ओळख ’सलाम’ या कृत्रिमपणे रचलेल्या, तद्दन प्रचारकी कवितेने होते हे त्यांचे दुर्दैव. समांतर चित्रपटांपासून मेनस्ट्रीम चित्रपट, नाटक असा व्यापक पैस असणार्या लागूंवर स्तुतीवर… पुढे वाचा »
मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९
’यशस्वी माघार’ की ’पलायन’
-
( ’माफीवीर सावरकर’ या उल्लेखाला प्रतिवाद म्हणून ’माफी नव्हे , राजनीती : शिवछत्रपती आणि सावरकर’ या प्रसिद्ध इतिहाससंशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचा लेख फेसबुकवर शेअर करण्यात आला. त्याला दिलेले हे उत्तर. ) ’यशस्वी माघार’ म्हणायचे की ’पलायन’ हे भविष्यातील यशावर अवलंबून असते. तात्पुरती माघार घेऊन नंतर यशाची जुळणी करणॆ शक्य झाले तर त्या पलायनालाही यशस्वी माघार म्हणता येते. नाहीतर प्रत्येक पळपुटा आपल्या पलायनाला ’स्ट्रॅटेजिक रिट्रीट’ म्हणूच शकतो. ते आपण मान्य करत जाणार आहोत का? की आपल्या बाब्याचा दावा खरा नि विरोधकाचा खोटा इतके सरधोपट निकष लावणार आहोत? इतरांसाठी अतर्क्य भविष्यवाणी करणारा द्रष्टा तेव्हाच म्हणवला जातो जेव्हा त्याची भविष्यवाणी खरी होते. (खरंतर त्या भविष्यवाणीलाही तर्काचा, संगतीचा, वारंवारतेचा आधार हवा. पण तो मुद्द्या सध्या सो… पुढे वाचा »
सोमवार, १६ डिसेंबर, २०१९
कथा विकासाच्या कांद्याची
-
परवा सकाळी एका मित्राबरोबर चुलत-मित्राकडे (त्याचा मित्र) जाण्याचा योग आला. घरी पोचलो तेव्हा त्याच्या पत्नीने सांगितले की साहेब पूजाघरात आहेत. इतक्यात आतून ’आतच या’ असा निरोप आला. आत पोचलो तेव्हा साहेब हात जोडोनि देव्हार्यासमोर बसले होते. ’घ्या दर्शन घ्या’ अशी ऑफर आली. मित्राने हात जोडून नमस्कार केला. मी आपला आपद्धर्म म्हणून हात जोडण्यापूर्वी देव्हार्यात डोकावले नि दचकलोच. तिथे चक्क एक अंडे ठेवले होते. मी बुचकळ्यात पडलो. माझी अवस्था पाहून "मला वाटलेच होते, तुम्हाला आश्चर्य वाटणार म्हणून." चुलत-मित्र विजयी मुद्रेने म्हणाला. "अंड्याची पूजा? कशासाठी?" मी शंकेखोरपणे विचारले. "मी ज्युरासिक पार्क उभे करणार आहे." चुलत-मित्र सिक्रेट सांगताना वापरतात तशा मंद्रसप्तकातील षड्जाला आधारस्वर करुन बोलिला. माझी अवस्था तेल… पुढे वाचा »
सोमवार, ९ डिसेंबर, २०१९
बूट आणि झेंडे
-
कोणे एके काळी, सगळी माणसे खुजी होती. कुण्या एका माणसाने, देवळाचा झेंडा खांद्यावर घेतला, स्वत:ची उंची टाचेपासून झेंड्याच्या टोकापर्यंत मोजून, आपण उंच झाल्याची द्वाही त्याने सर्वत्र फिरवली. कुण्या एका माणसाने, उंच टाचेचे बूट चढवले, स्वत:ची उंची डोक्यापासून बुटाच्या तळापर्यंत मोजून, आपण उंच झाल्याची द्वाही त्यानेही सर्वत्र फिरवली. कुण्या 'अनवाणी' माणसाने त्या दाव्याला आक्षेप घेतला. ’त्याला सांग की’ असे म्हणत, दोघांनीही मोडीत काढला. कुण्या एका बुटाची उंच टाच, कुण्या एका खांद्यावरचा उंच झेंडा, झाला अंगापेक्षा मोठा बोंगा, माणसांचा सुरु धांगडधिंगा उकिरड्यावरचा कुणी एक गाढव, कुण्या एका डुकराला म्हणाला, माणसापेक्षा आपण बरे, उसनवारीचे नाही खरे. पोट आहे, भूक लागते, अन्न-श… पुढे वाचा »
शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९
पिसाळलेला कुत्रा
-
https://www.entertales.com/ येथून साभार. त्याने रस्त्यावरच्या कुत्र्याला गोळी घातली तुमच्या भिवया उंचावल्या, "पिसाळला होता" तो म्हणाला तुम्ही त्याला धन्यवाद दिलेत. त्याने शेजार्याच्या कुत्र्याला ठार मारले, तुम्ही आश्चर्यचकित झालात "हा ही पिसाळला होता" तो म्हणाला "हो. असेलच." तुम्ही मनात म्हणालात. आता त्याने तुमच्या कुत्र्याची हत्या केली तुम्ही स्तंभित आणि हतबुद्ध झालात. पण काही बोलू शकला नाहीत... ... त्याच्या हाती बंदूक होती! मग कसनुसे हसत त्याला म्हणालात, ’पिसाळलाच होता तो" - रमताराम - oOo - पुढे वाचा »
A Rabid Dog
-
Source: https://www.entertales.com/ . He killed a stray dog, you raised an eyebrow 'It was rabid.' he told you You thanked him. He killed neighbor's dog, you looked surprised 'It was rabid too.' he said 'It must be', you thought Then he killed your dog, You were stunned, but remained silent... ... he was holding the gun! 'It must be rabid' you said... sheepishly! - Ramataram - oOo - पुढे वाचा »
हैद्राबाद येथील व्यवस्थापुरस्कृत हत्या आणि माथेफिरु समाज
-
हैदराबाद एन्काउंटर खरे की फेक, एकुणातच एन्काउंटर हा प्रकार योग्य की अयोग्य, हे दोनही मुद्दे मी जरा बाजूला ठेवतो. माझा मुद्दा जे घडले त्याबद्दल आनंद व्यक्त करणार्यांबद्दल, त्याचे ’सेलेब्रेशन’ करणार्यांबद्दलचा आहे. गुन्हा घडलाय हे निर्विवाद. एका स्त्रीवर अत्याचार झाला आहे आणि तिचा अत्यंत नृशंस पद्धतीने खून झाला आहे हे ही उघड आहे. याचा अर्थ कुणीतरी हा गुन्हा केला आहे हे ही नक्की. प्रश्न असा की हे गुन्हेगार कोण? १. जे मारले गेले त्यांनीच तो गुन्हा केला होता याची तथाकथित एन्काउंटरचे फेसबुकवर समर्थन करणार्यांनी नक्की कशी खात्री करुन घेतली होती? म्हणजे 'हे गुन्हेगार नव्हते' असा दावा मी करतो आहे, असा अपलाप करुन कांगावा करत येणार्यांना सीनियर के.जी.त जाण्यासाठी शुभेच्छा. याची दोन का… पुढे वाचा »
बुधवार, ४ डिसेंबर, २०१९
काळे, तुम्ही स्वत:ला काय समजता?
-
" माझ्याकडे फक्त प्रश्नच आहेत आणि आसपास सोयीच्या उत्तराभोवती प्रश्न गुंडाळणारी बहुसंख्या" अशी एक ओळीची पोस्ट फेसबुकवर लिहिली. आणि झटक्यात "’काळे, तुम्ही स्वत:ला काय समजता?’ अशी पृच्छा झाली. तशी ती होणार हे माहित होतेच, फक्त ती इतक्या झटपट येईल असे वाटले नव्हते. पण फेसबुक आणि एकुणच देश नि जगातही (बहुधा) स्वत:ची मांडणी करण्यापेक्षा दुसर्याला चॅलेंज करणे, मोडीत काढणे याला प्राधान्य असते हे विसरलोच. त्यातून आपण बरोबर असल्याचे समाधान करुन घेता येते. ज्यांना ही एकोळी पोस्ट आक्षेपार्ह वा अहंपणाची वाटली त्यांनी हे करुन पाहा. आपल्याला असे प्रश्न कधी पडले होते, किंवा आपण असे निकष कधी लावले होते ज्यातून आपला गट, जात, धर्म, नेता, गाव, गल्ली योग्य ठरली नव्हती, अन्य पर्याय अधिक योग्य असे उत्तर मिळाले होते? जेव्हा असे प्रश्न, असे निकष आ… पुढे वाचा »
Labels:
इझम,
कम्युनिस्ट,
पुरोगामी,
प्रश्न विचारा,
भाष्य,
विवेकवाद,
समाज
राजकारणातील सोबतीचे करार : वर्तमान
-
राजकारणातील सोबतीचे करार : इतिहास << मागील भाग --- महाराष्ट्रात सेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी या दोन जोड्या गेली काही दशके बस्तान बसवून आहेत. राष्ट्रवादी हा तर काँग्रेसमधून फुटून निघालेला पक्ष असल्याने त्याची नाळ काँग्रेसशी जोडलेली आहेच. तर सेना आणि भाजप हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर परस्परांचे सोबती आहेत. असे असूनही काहीवेळा युती अथवा आघाडी मोडून निवडणुका लढल्या गेल्या आहेत. त्यात जागावाटपाचे घोडे चार-दोन जागांवर अडले हे केवळ वरवरचे कारण असते. सोबत निवडणुका लढवण्याबरोबरच विरोधात निवडणुका लढवणेही आपापली ताकद अजमावण्यासाठी, वाटपाचे दान नव्याने पाडण्यासाठी हे केले जात असते. सोबत राहूनही जोवर त्या जोडीला सत्ता बरीच दूर राहते, तोवर शक्य त्या सार्या तडजोडी करत सोबत कायम राहते. कारण यात सत्तेच्या वर्तुळात मिळवण्याजोगे … पुढे वाचा »
मंगळवार, ३ डिसेंबर, २०१९
फडणवीसांची बखर - ३ : मी पुन्हा जाईन
-
नवा साहेब << मागील भाग मागील लेखांकात मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करता फडणवीस २०१९च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना, त्यांच्यासोबत पक्षातील मागची पिढी नव्हती, सेना नव्हती आणि केंद्रातील नेतृत्वही नसावे असे म्हणावे लागेल. जर फडणवीस पुरेसे चाणाक्ष असतील, आणि त्यांना हे सर्व जाणवले असूनही त्यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला ते पाहता त्यांचा स्वबळाबद्दलचा अहंकार चरमसीमेला पोहोचला होता असे म्हणायला हवे. कारण एकीकडे दोनशेवीस जागा जागा मिळवून ’मी पुन्हा येईन’ चा गजर करत होते. तर दुसरीकडे ते आणि मोदींसह अन्य भाजपेयी विरोधकांना दहा वीस जागांतच समाधान मानावे लागेल म्हणून लागले होते. १६४ पैकी १४४ जागा मिळवून कदाचित स्वबळावरच भाजपचे सरकार स्थापन होईल असे स्वप्नही ’युतीचे २५० आमदार निवडून आणू’ म्हणणार्या चंद्रकांत पाटील यांना पडू ला… पुढे वाचा »
सोमवार, २ डिसेंबर, २०१९
राजकारणातील सोबतीचे करार : इतिहास
-
भारतीय राजकारणात आघाडीचे, युतीचे राजकारण नवीन नाही. स्वबळावर सत्ताधारी झालेल्या सरकारांची संख्या दोन वा त्याहून अधिक पक्षांच्या आघाडी/युती/फ्रंट सरकारांच्या संख्येहून फारच कमी दिसते. केंद्रात तर १९८४ नंतर थेट तीस वर्षांनी २०१४ साली- जेमतेम का होईना, पण पूर्ण बहुमत असलेल्या पक्षाचे सरकार प्रथमच स्थापन झाले. उरलेला बहुतेक सर्व काळ देशात विविध पक्षांच्या आघाडीचे सरकारच सत्ताधारी होते. १९७१ सालापर्यंत स्वबळावर सरकार स्थापन करणार्या काँग्रेसला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी अॅंटी-काँग्रेसिझमचा विचार मांडायला सुरुवात केली. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली १९७७ मध्ये स्थापन झालेले जनता पक्षाचे सरकार हा या राजकारणाचा पहिला विजय होता. हे सरकार तांत्रिकदृष्ट्या जरी… पुढे वाचा »
फडणवीसांची बखर - २ : नवा साहेब
-
भाजप नेतृत्वाचा प्रवास << मागील भाग मोदींच्या कृपेने मागच्या पिढीतील नेत्यांना मागे सारून फडणवीस मुख्यमंत्री झाले खरे, पण या नव्या साहेबाला अजूनही काही जुन्यांशी संघर्ष करावा लागणार होता. खडसे यांच्या बोलभांडपणामुळे त्यांचा काटा फडणवीस यांनी सहजपणे दूर केला. पण विनोद तावडेंसारखा मुंबईस्थित नेता महाजन-मुंडेंच्या काळापासून महाराष्ट्रात सक्रीय होता, फडणवीस यांना सीनियर होता. महाजनांची पुढची पिढी राजकारणात फारशी सक्रीय नसल्याने त्यांचा धोका नसला, तरी मुंडेंची पुढची पिढी मात्र चांगलीच आक्रमक होती. महाजन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समर्थकांची फळीही - साहजिकच - महाराष्ट्र भाजपचा चेहरा म्हणून उभ्या असलेल्या मुंडेंच्या पाठीशी एकवटली होती. त्याशिवाय मातोश्रीबरोबर संपर्क संबंध राखण्याचा महाजन यांचा वारसा मुंडे यांनीही सांभाळला होता. … पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)