Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
भूमिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भूमिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ८ जानेवारी, २०२३

भावनांचा प्रवाहो चालला


  • २०११ सालच्या एप्रिल महिन्यांतील घटना. मी तेव्हा हिंजवडीमधील एका कंपनीसोबत काम करत होतो. आमचा एक परदेशी अन्नदाता (client) आला होता. जेवणासाठी त्याला घेऊन आम्ही त्याच परिसरातील एका होटेलकडे चाललो होतो. एका वळणावर ‘मी-अण्णा’ असे लिहिलेल्या गांधी-टोप्या घातलेला आयटी-कामगारांचा एक मोर्चा आम्हाला आडवा गेला. लोकपाल या नव्या व्यवस्थेच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा होता. शाळेच्या भाषेत सांगायचे तर ‘मधल्या सुटी’मध्ये काढलेला. https://news.biharprabha.com/ येथून साभार. मुळात त्या मागणीच्या परिणामकारकतेबाबत मी फारसा आशावादी नव्हतो. त्यात ही मंडळी जे कर्मकांड करत आहेत ते पाहून मला हसू आले. आमचा ‘मुख्य तंत्रज्ञान अधिकारी’ (CTO) … पुढे वाचा »

रविवार, १४ ऑगस्ट, २०२२

तीन भूमिका (उत्तरार्ध) : वस्तुनिष्ठता - तीन उदाहरणे


  • बाजूबद्धता, तटस्थता आणि वस्तुनिष्ठता « मागील भाग --- एखादा प्रश्न किती लोकांच्या मनात निर्माण झाला याला तसे फारसे महत्त्व नाही. उलट एकाच वेळी अनेकांच्या मनात जर एखादा प्रश्न निर्माण झाला, तर तो तितकासा महत्त्वाचा नसण्याची शक्यता अधिक. कारण मोलाचा प्रश्न एखाद्याच्याच मनात निर्माण होऊ शकतो. आता तू म्हणतोस त्याप्रमाणे हा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण होऊनही त्यांनी त्याचा उच्चार केला नाही, याचा अर्थ असा की त्या प्रश्नाचं उत्तर जन्माला घालण्याचं स्वातंत्र्यही त्यांनी स्वतःजवळ सुरक्षित ठेवलं आहे. (गौतमीपुत्र कांबळे यांच्या 'परिव्राजक' या कथेमधून) तटस्थता म्हणजे काय हे बहुसंख्येला समजते. बाजूबद्धता वा गट-बांधिलकी तर इतकी महामूर आहे की त्याबाबत अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. परंतु 'वस्तुनिष्ठता म्हणजे काय?' याबाबत अन… पुढे वाचा »

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

तीन भूमिका (पूर्वार्ध) : बाजूबद्धता, तटस्थता आणि वस्तुनिष्ठता


  • ( वस्तुनिष्ठता हा खरंतर objective इंग्रजी शब्दाचा अपुरा अनुवाद आहे. पण आता प्रचलित झाला आहे, मराठी नि हिंदीतही. त्यामुळे इथे मी तोच वापरला आहे. ) आदिम काळात माणूस टोळ्यांच्या वा कळपांच्या स्वरूपात राहात होता. त्या काळातील मानसिकतेचा पगडा माणसाच्या मनावर अजून शिल्लक राहिलेला आहे. त्या काळी ’टोळी नसलेला माणूस’ ही संकल्पनाच माणसाला मानवत नव्हती . तसेच आजही बाजू नसलेली, तटस्थ वा वस्तुनिष्ठ विचाराची, स्वतंत्र भूमिकेची व्यक्ती अस्तित्वात असते यावर बहुसंख्येचा विश्वास नसतो. ’ती कोण आहे?’ यापेक्षा ’ती कोणत्या गटाची आहे?’ या प्रश्नाच्या उत्तराचा मागोवा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ’त्या व्यक्तीची वैय्यक्तिक ओळख काय?’ हा प्रश्नच त्यांच्यासमोर नसतो. ती कोणत्या गावाची, घराण्याची, जातीची, धर्माची आहे या प्रश्नांच्या उत्तरांतूनच समोरच्या व्यक्त… पुढे वाचा »

रविवार, २४ जुलै, २०२२

साहित्याचे वांझ(?) अंडे


  • क्रिकेटमध्ये फलंदाजाचा दर्जा ठरवण्यासाठी त्याने आजवर केलेल्या धावांची सरासरी पाहिली जाते, तसे लेखनाच्या दर्जा किती हे ठरवण्यासाठी फेसबुकवर लाईक्सची. त्याबाबतीत माझी कामगिरी म्हणजे कधी ज्याच्या बॅटला बॉल लागला की सत्यनारायण घालावा लागतो अशा महंमद सिराज किंवा जसप्रीत बुमराहच्या दर्जाची. कधीतरी सहज म्हणून खालील परिच्छेदाची फेसबुक पोस्ट केली आणि माझ्या पोस्टना सरासरीने मिळतात त्याच्या दुप्पटीहून अधिक लाईक्स तिने मिळवले. वरील दोघांपैकी एकाने एखाद्या सामन्यात अर्धशतक करुन जावे नि पॅव्हलियनमध्ये जाऊन ’हे कसं काय बुवा झालं’ म्हणून स्वत:च विचारात पडावे तसे माझे झाले. माझी कविता समजण्यासाठी तुम्हाला माझ्या नेणिवेच्या आत डोकावून पहावे लागेल. कविता अशी हमरस्त्याने येऊन भेटत नाही, तिला आडवळणांचे हिरवे स्पर्श लागतात. अर्थांतरन्यासाच्या जाळीतून सरपटणार… पुढे वाचा »

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

‘लंगोटाची उपासना’ ऊर्फ ‘भूतकालभोग्यांची आस, आभास आणि अट्टाहास’


  • तुम्ही जन्माला येता, त्यानंतर सुरुवातीची एक दोन वर्षे तुमचे जन्मदाते/पालक तुम्हाला तुम्हाला लंगोटात लपेटून टाकतात. तुमचे नियंत्रण नसलेल्या उत्सर्जितांनी तो लंगोट खराब झाला, की बदलण्याचे कामही तेच करत असतात. सोबत तुम्हाला आहार देणे, आरोग्याची काळजी घेणे इत्यादि जबाबदार्‍याही त्या पालकांनीच स्वीकारलेल्या असतात. थोडक्यात तुम्ही तुमचे पालक आणि तो लंगोट यांच्यावर संपूर्णपणे अवलंबून असता. त्यावेळी समाजाच्या दृष्टीने तुमची ’त्या आई-बापाचे मूल’ याहून कोणतीही वेगळी ओळख नसते. कारण अजून तुम्ही खूप लहान असता. स्वत:च्या पायावर उभे राहणे, स्वत:ची ओळख निर्माण करणे याला आवश्यक असणारे शारीर बळ, कुवत आणि बौद्धिक क्षमता विकसित होण्यासाठी अजून काही काळ जावा लागतो. तुमच्या आयुष्यातील सर्वस्वी परावलंबी काळाचा आधार म्हणून त्या लंगोटाचे स्थान असते . … पुढे वाचा »

गुरुवार, १६ जुलै, २०२०

इतिहासाचे अवजड ओझे (‘मॅन इन द आयर्न मास्क’च्या निमित्ताने)


  • विषयसंगतीमुळे हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »

शनिवार, ४ जुलै, २०२०

मी एक मध्यमवर्गीय पुरोगामी(?)


  • संघ-भाजपने मुस्लिम/काँग्रेसने (सामाजिक/राजकीय) देशाचं/धर्माचं वाटोळं केलं म्हणायचं, ब्राह्मणांनी दलितांच्या आरक्षणाच्या नावे बेंबीच्या देठापासून बोंब मारायची, दलित विचारवंत म्हणवणार्‍यांनी सगळ्या सामाजिक समस्या ब्राह्मण्यवादी व्यवस्थेमुळे आहेत म्हणायचे, पुस्तकी-फेमिनिस्टांना सगळे काही पुरुषप्रधान संस्कृतीचे पाप दिसते, संघाची वाढ हा समाजवाद्यांचा गुन्हा म्हणून कम्युनिस्ट पाच मैलाचा लेख लिहितात... आणि ’स्त्री जात तेवढी निमकहराम’ म्हणणार्‍या 'पुण्यप्रभाव’मधल्या सुदामसारखे यच्चयावत पुरोगामी ’मध्यमवर्ग तेवढा निमकहराम’चा जप करत असतात. डावी असोत वा उजवी, माणसं शत्रूलक्ष्यी मांडणीच्या मानसिकतेतून बाहेरच यायला तयार नाहीत . मूळ व्याधीचा शोध घेऊन त्यावर उपाय शोधण्याऐवजी हा जो खापरफोडेपणा सर्वव्यापी झाला आहे, तीच आपल्या समाजाच्या प्रगतीमधील प्रच… पुढे वाचा »

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

‘यशस्वी माघार’ की ‘पलायन’


  • ( ’माफीवीर सावरकर’ या उल्लेखाला प्रतिवाद म्हणून ’माफी नव्हे , राजनीती : शिवछत्रपती आणि सावरकर’ या प्रसिद्ध इतिहाससंशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचा लेख फेसबुकवर शेअर करण्यात आला. त्याला दिलेले हे उत्तर. ) ’यशस्वी माघार’ म्हणायचे की ’पलायन’ हे भविष्यातील यशावर अवलंबून असते. तात्पुरती माघार घेऊन नंतर यशाची जुळणी करणॆ शक्य झाले तर त्या पलायनालाही यशस्वी माघार म्हणता येते. नाहीतर प्रत्येक पळपुटा आपल्या पलायनाला ’स्ट्रॅटेजिक रिट्रीट’ म्हणूच शकतो. ते आपण मान्य करत जाणार आहोत का? की आपल्या बाब्याचा दावा खरा नि विरोधकाचा खोटा इतके सरधोपट निकष लावणार आहोत? इतरांसाठी अतर्क्य भविष्यवाणी करणारा द्रष्टा तेव्हाच म्हणवला जातो जेव्हा त्याची भविष्यवाणी खरी होते. (खरंतर त्या भविष्यवाणीलाही तर्काचा, संगतीचा, वारंवारतेचा आधार हवा. पण तो मुद्द्या सध्या सो… पुढे वाचा »

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

हैद्राबाद येथील व्यवस्थापुरस्कृत हत्या आणि माथेफिरु समाज


  • हैदराबाद एन्काउंटर खरे की फेक, एकुणातच एन्काउंटर हा प्रकार योग्य की अयोग्य, हे दोनही मुद्दे मी जरा बाजूला ठेवतो. माझा मुद्दा जे घडले त्याबद्दल आनंद व्यक्त करणार्‍यांबद्दल, त्याचे ’सेलेब्रेशन’ करणार्‍यांबद्दलचा आहे. गुन्हा घडलाय हे निर्विवाद. एका स्त्रीवर अत्याचार झाला आहे आणि तिचा अत्यंत नृशंस पद्धतीने खून झाला आहे हे ही उघड आहे. याचा अर्थ कुणीतरी हा गुन्हा केला आहे हे ही नक्की. प्रश्न असा की हे गुन्हेगार कोण? १. जे मारले गेले त्यांनीच तो गुन्हा केला होता याची तथाकथित एन्काउंटरचे फेसबुकवर समर्थन करणार्‍यांनी नक्की कशी खात्री करुन घेतली होती? म्हणजे 'हे गुन्हेगार नव्हते' असा दावा मी करतो आहे, असा अपलाप करुन कांगावा करत येणार्‍यांना सीनियर के.जी.त जाण्यासाठी शुभेच्छा. याची दोन का… पुढे वाचा »

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

राज्यांतील निवडणुका आणि मोदीलाट


  • देशाच्या विधानसभांमधून भाजप कसा आता हद्दपार झाला आहे म्हणून ’मोदी लाट हटली’ किंवा ’मोदींची कामगिरी पाहा’ म्हणणार्‍यांनो जरा थांबा. मोदींचे मूल्यमापन मोदी ज्या भूमीवर लढतात तिथेच व्हायला हवे. पोटनिवडणुकांमध्ये अगदी उ.प्र.च्या मुख्यमंत्री नि उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप पराभूत झाला होता, पण २०१९ च्या मध्यावधी निवडणुकांत उ.प्र. मध्ये पुन्हा भाजपने ९०% जागा जिंकल्या. राजस्थान, म.प्र., छत्तीसगड मध्येही विधानसभा गमावूनही मोदींच्या भूमीवर म्हणजे लोकसभा निवडणुकीत जवळजवळ १००% यश मिळवले आहे. गंमत म्हणजे महाराष्ट्राचे हे नाट्य रंगलेले असताना राजस्थानातील स्थानिक स्वराज्य संस्थातून काँग्रेसने प्रचंड मुसंडी मारत २३ ठिकाणी आपले वर्चस्व स्थापन केले, तर भाजप फक्त सहा ठिकाणी सत्ताधारी झाला.… पुढे वाचा »

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१९

विचार आणि सत्ता


  • विचार नि विश्लेषण कितीही दर्जेदार, व्यापक हितकारी वगैरे असले, तरी जोवर त्यांची अंमलबजावणी होत नाही, तोवर त्यांना सुविचाराच्या वहीत लिहून ठेवलेल्या संदर्भहीन सुविचाराइतकेच महत्व असते ... किंवा ज्यावर कधीही प्रश्न न विचारता त्यातील मजकूर शिरोधार्य मानायचा असतो अशा धर्मग्रंथांसारखे! अंमलबजावणी करायची तर सत्ता हवी, आणि सत्ता हवी असेल तर आपले सोवळे उतरवून थोड्या तडजोडीला तयार असावे लागते. हे शहाणपण ’काँग्रेस, भाजप दोघेही वैट्टं वैट्टं’ हा जप करत बसलेल्या आणि राजकीय ताकद शून्य झालेल्या समाजवाद्यांना किंवा बुद्ध्यामैथुन करत बसलेल्या समाजवादी आणि कम्युनिस्टांना यायला हवे. जिवंत राहिला तर माणूस बळ वाढवून नंतर शत्रूशी लढू शकेल. त्यासाठी प्रतिस्पर्ध्यांपैकी एकच प्रचंड ताकदवान होऊ नये यासाठी प्रसंगी … पुढे वाचा »