Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
पुरोगामित्व लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुरोगामित्व लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ४ जुलै, २०२०

मी एक मध्यमवर्गीय पुरोगामी(?)


  • संघ-भाजपने मुस्लिम/काँग्रेसने (सामाजिक/राजकीय) देशाचं/धर्माचं वाटोळं केलं म्हणायचं, ब्राह्मणांनी दलितांच्या आरक्षणाच्या नावे बेंबीच्या देठापासून बोंब मारायची, दलित विचारवंत म्हणवणार्‍यांनी सगळ्या सामाजिक समस्या ब्राह्मण्यवादी व्यवस्थेमुळे आहेत म्हणायचे, पुस्तकी-फेमिनिस्टांना सगळे काही पुरुषप्रधान संस्कृतीचे पाप दिसते, संघाची वाढ हा समाजवाद्यांचा गुन्हा म्हणून कम्युनिस्ट पाच मैलाचा लेख लिहितात... आणि ’स्त्री जात तेवढी निमकहराम’ म्हणणार्‍या 'पुण्यप्रभाव’मधल्या सुदामसारखे यच्चयावत पुरोगामी ’मध्यमवर्ग तेवढा निमकहराम’चा जप करत असतात. डावी असोत वा उजवी, माणसं शत्रूलक्ष्यी मांडणीच्या मानसिकतेतून बाहेरच यायला तयार नाहीत . मूळ व्याधीचा शोध घेऊन त्यावर उपाय शोधण्याऐवजी हा जो खापरफोडेपणा सर्वव्यापी झाला आहे, तीच आपल्या समाजाच्या प्रगतीमधील प्रच… पुढे वाचा »

बुधवार, ४ डिसेंबर, २०१९

काळे, तुम्ही स्वत:ला काय समजता?


  • " माझ्याकडे फक्त प्रश्नच आहेत आणि आसपास सोयीच्या उत्तराभोवती प्रश्न गुंडाळणारी बहुसंख्या" अशी एक ओळीची पोस्ट फेसबुकवर लिहिली. आणि झटक्यात "’काळे, तुम्ही स्वत:ला काय समजता?’ अशी पृच्छा झाली. तशी ती होणार हे माहित होतेच, फक्त ती इतक्या झटपट येईल असे वाटले नव्हते. पण फेसबुक आणि एकुणच देश नि जगातही (बहुधा) स्वत:ची मांडणी करण्यापेक्षा दुसर्‍याला चॅलेंज करणे, मोडीत काढणे याला प्राधान्य असते हे विसरलोच. त्यातून आपण बरोबर असल्याचे समाधान करुन घेता येते. ज्यांना ही एकोळी पोस्ट आक्षेपार्ह वा अहंपणाची वाटली त्यांनी हे करुन पाहा. आपल्याला असे प्रश्न कधी पडले होते, किंवा आपण असे निकष कधी लावले होते ज्यातून आपला गट, जात, धर्म, नेता, गाव, गल्ली योग्य ठरली नव्हती, अन्य पर्याय अधिक योग्य असे उत्तर मिळाले होते? जेव्हा असे प्रश्न, असे निकष आ… पुढे वाचा »

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१९

विचार आणि सत्ता


  • विचार नि विश्लेषण कितीही दर्जेदार, व्यापक हितकारी वगैरे असले, तरी जोवर त्यांची अंमलबजावणी होत नाही, तोवर त्यांना सुविचाराच्या वहीत लिहून ठेवलेल्या संदर्भहीन सुविचाराइतकेच महत्व असते ... किंवा ज्यावर कधीही प्रश्न न विचारता त्यातील मजकूर शिरोधार्य मानायचा असतो अशा धर्मग्रंथांसारखे! अंमलबजावणी करायची तर सत्ता हवी, आणि सत्ता हवी असेल तर आपले सोवळे उतरवून थोड्या तडजोडीला तयार असावे लागते. हे शहाणपण ’काँग्रेस, भाजप दोघेही वैट्टं वैट्टं’ हा जप करत बसलेल्या आणि राजकीय ताकद शून्य झालेल्या समाजवाद्यांना किंवा बुद्ध्यामैथुन करत बसलेल्या समाजवादी आणि कम्युनिस्टांना यायला हवे. जिवंत राहिला तर माणूस बळ वाढवून नंतर शत्रूशी लढू शकेल. त्यासाठी प्रतिस्पर्ध्यांपैकी एकच प्रचंड ताकदवान होऊ नये यासाठी प्रसंगी … पुढे वाचा »

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

पुलं, पुरस्कार आणि पोंक्षे


  • ( ’अक्षरनामा’ या पोर्टलवर जयवंत डोळे यांनी लिहिलेल्या ’गांधीवादी पुलंच्या नावचा पुरस्कार ’नथुराम’ पोंक्षे यांना?’ या लेखावरील प्रतिक्रिया. ) --- पहिला महत्वाचा हरकतीचा मुद्दा हा की पुलंना ’गांधीवादी’ हे लेबल लावणे चुकीचे आहे. माझ्या मते पोंक्षे नामक महाभागाची विचारधारा आणि पुलंची विचारधारा यात टोकाचा फरक आहे इतके नोंदवून थांबता आले असते. एक पुलंप्रेमी म्हणून आणि पुलंनी विविध व्यासपीठांवरुन, लेखनातून मांडलेल्या विचारांशी बव्हंशी सहमत असलेली एक व्यक्ती म्हणून मला डोळे यांचा आक्षेप पटला आहे हे नमूद करतो. पण... पुलंच्या नावाचा पुरस्कार पुलं परिवार, आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन या तिघांतर्फे देण्यात येतो आहे हे मी विसरत नाही. पुरस्कार देणारे जेव्हा एखाद्या दिवंगत व्यक्तीच्या नावे पुरस्कार देऊ करतात तेव्हा त्यात त्यांचा स्वार्थ, द… पुढे वाचा »

सोमवार, ८ एप्रिल, २०१९

पुरोगामित्वाचा राजकीय प्रवास


  • ( "पुरोगामीत्व हे जातीसारखं "बंदिस्त" होत आहे . पुरोगामित्वाचा प्रवास भाजपा ते काँग्रेस एवढ्याच परिघात फिरतो .!!" या दाव्याला दिलेला प्रतिसाद .) थोडी दुरुस्ती: ’राजकीय पुरोगामित्वाचा’ प्रवास भाजप ते काँग्रेस एवढ्याच परिघात फिरतो . हा मुद्दा मान्य. पण राजकारणात व्यवहार्यता नावाचा एक भाग असतो. लोकशाही मध्ये बहुसंख्य मतदार हे अ-पुरोगामी (प्रतिगामी म्हणत नाही मी) असतात. त्यांची मते हवी असतील तर व्यवहार्य, मर्यादित, आणि उलट आपल्याच डोक्यावर बसणार नाही इतपत तडजोड अपरिहार्य ठरते. अति-ताठर पुरोगामित्वाचे राजकारण अ-पुरोगामी बहुसंख्य समाजात अयशस्वीच होत असते. मार्क्सने समाजवाद (socialism) हा कम्युमिझमचा पहिला टप्पा (अंतिम साध्य नव्हे!) मानला होता. त्याला अनुसरून सोविएत ’सोशलिस्ट’… पुढे वाचा »

शनिवार, १६ मार्च, २०१९

अकर्मक पुरोगामी आणि राजकीय पर्याय


  • स्वत:ला पुरोगामी विचारवंत म्हणवणारे ’हे ही वैट्टं, ते ही वैट्टं, ते तर वैट्टंच वैट्टं’ करत बसले आहेत. राजकारणात - रोजच्या जगण्यातसुद्धा - सर्वगुणसंपन्न पर्याय मिळत नसतो. ६०-७०-८० टक्के गुणवान मिळाला तरी हत्तीवरुन साखर वाटावी अशी स्थिती असते. (रोज आरशात पाहतो ना आपण!) तुम्ही राजकारणात उतरुन तुमच्या पवित्र मार्गाने यशस्वी होऊन दाखवू शकत नसाल, तर तो मार्ग कितीही पवित्र असला तरी वाहतुकीस बिनकामाचा म्हटला पाहिजे. पुस्तकातले तत्त्वज्ञान माणसांपर्यंत पोचत नसेल तर त्या बुद्ध्यामैथुनापलिकडे महत्त्व देता येणार नाही . संकल्पचित्र https://www.deccanherald.com/ येथून साभार या अकर्मक पुरोगाम्यांचे बहुधा असे असावे की ’शहरातले सगळे ट्रॅफिक सिग्नल हिरवे झाल्याखेरीज मी गाडी गॅरेजबाहेर काढणार नाही.’ परिण… पुढे वाचा »

गुरुवार, २६ मे, २०१६

वादे वादे जायते वादंग:


  • ( एका – बहुधा तथाकथित सवर्ण वर्गात मोडणार्‍या – फेसबुक-मित्राने एका पोस्टमध्ये असा मुद्दा मांडला होता, की ‘सवर्ण असलेल्या माणसांना आपण आंबेडकरांचे विचार मानतो किंवा घटनेला प्रमाण मानतो किंवा आंबेडकरवादी आहोत हे पटवून द्याव लागतं, तेही वारंवार.’ एरवी जात या विषयावर न लिहिण्याचा माझा दंडक मोडून त्यावर दिलेली ही प्रतिक्रिया आहे. ) --- अगदी नेमका मुद्दा मांडला आहेस. पण अलिकडे याबाबत मी काहीसा हताश आहे. याबाबत सांगून काही होत नसतं. ‘इतकी वर्ष आम्ही सहन कसं केलं असेल’ हे उत्तर देऊन तोंड बंद केलं जात आहे. एक महत्त्वाचं ध्यानात घेतलं पाहिजे की प्रत्येक समाजात, जातीत, भाषिक गटात, धर्मात असेही लोक आहेत, तसेही लोक आहेत. त्यातल्या टीकेच्या सोयीचे प्रकारचे लोक हे ‘प्रातिनिधिक’ समजून वागत गेलो तर धागे जुळणारच नाही. एक नक्की की, द्वेषाचे पेरणी अ… पुढे वाचा »

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०१५

‘शेष’प्रश्न


  • ( हे एकटाकी लिहिलेले आहे आणि मोरेंचे लेखन वाचून बराच काळ लोटला आहे. तेव्हा तपशीलात चुका असणे अगदीच शक्य आहे. तेव्हा ते आधीच मान्य करून टाकतो. पण त्याने मूळ मुद्द्याला बाध येईल असे मात्र नाही .) सध्या शेषराव मोरे यांनी अंदमान येथे केलेल्या विधानांवरून गदारोळ उसळला आहे. त्यात ‘पुरोगामी दहशतवाद’ असा शब्द वापरून त्यांनी एक प्रकारे शासन-पुरस्कृत पुंडांच्या हाती कोलित दिले आहे. यामुळे पुरोगामी आणि ‘स्वतःला पुरोगामी म्हणवणारी’ मंडळी मोरेंवर चांगलीच नाराज झालेली आहेत. मी स्वतःदेखील या कारणासाठी मोरेंच्या भूमिकेवर तिरकसपणे टीका केलेली आहे. परंतु असे असले तरी मोरेंबद्दल माझा आक्षेप आहे, तो केवळ त्यांचा सरसकटीकरण करणार्‍या विधानाबद्दल आहे, आणि गुंडांच्या हिंसाचाराला अप्रत्यक्ष अधिष्ठान देण्याबाबत आहे.… पुढे वाचा »