-
गेल्या पंचवीस-एक वर्षांचा काळ हा आपल्या जीवनात अनेक आमूलाग्र बदल घडवणारा ठरला. नव्वदीच्या दशकात बंदिस्त व्यवस्थेच्या काही खिडक्या उघडल्या जाऊन ‘जागतिकीकरण’ या नव्याच व्यवस्थेने या देशात हातपाय पसरायला सुरुवात केली. या बदलाचा एक मोठा भाग व्यापला तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीने. गेल्या शतकाच्या अखेरच्या दशकात आपल्या दारी आलेल्या संगणकाने, आणि या शतकाच्या सुरुवातीपासून आपल्या हाताला जणू सहावे बोट असावे असा चिकटून राहू लागलेला ‘मोबाईल’ या दोन महत्त्वाच्या आयुधांनी आपल्या जगण्याचे आयाम बदलले, व्याप्ती बदलली. जुन्या व्यवस्थेच्या पाईक असलेल्यांना हे बदल कुठे रुचेनासे झाले, ‘माणसे -मोबाईल नि संगणकावर - खूप बोलू लागली आणि संवाद कमी झाला’ असा आक्षेप या नव्या जीवनपद्धतीवर घेतला जाऊ लागला. पण या पलिकडे जाऊन तंत्रज्ञानाने माणसाच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदलही घडवले. माहिती क्रांतीने अभ्यासाचा, संशोधनाचा वेग कमालीचा वाढला. इतर सुखसोयी नि आर्थिकदृष्ट्या अनेक बदल घडले. कुणी याला समृद्धी म्हटले, तर कुणी या समृद्धीच्या विषम वितरणावर बोट ठेवले. अशा या साधकबाधक चर्चेमधून सर्वसामान्य...
पुढे वाचा »
गुरुवार, ९ एप्रिल, २०१५
‘सायलेंट मोडमधल्या कविता’: नव्या जाणिवांची विचक्षण कविता
Labels:
‘परिवर्तनाचा वाटसरु’,
आस्वाद,
पुस्तक,
साहित्य-कला
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
