एकदा नोकरीवर रुजू झाल्यावर थेट निवृत्तीपर्यंत रोजगाराची जवळजवळ हमीच, नियमित वेतन, वार्षिक वेतनवाढ आणि दशवार्षिक वेतनश्रेणीवाढ असे चार प्रिव्हिलेजेस मिरवणार्या सरकारी कर्मचार्यांना निवृत्तीनंतरही सरकारने पोसणारी पेन्शन हवी आहे. सातवा वेतन आयोग घेताना मान्य केलेल्या न्यू पेन्शन स्कीमबाबत आता तब्बल १८ वर्षांनंतर आक्षेप नोंदवत ’चित मेरी’ झाल्यावर ’पट भी मेरी’ म्हणणार्या सरकारी कर्मचार्यांबाबत केलेले हे भाष्य.
जॉर्ज ऑरवेलच्या ’अॅनिमल फार्म’मध्ये डुकरांच्या नेतृत्वाखाली प्राण्यांचे राज्य स्थापन होते ’सर्व प्राणी समान आहेत’(All animals are equal) या घोषवाक्याने. हळूहळू सत्ताधारी सारे नियम स्वधार्जिणे करत नेतात. त्यात या पहिल्या कमांडमेंटला ’काही अधिक समान असतात.’(some are more equal.) असे शेपूट हळूच जोडण्यात येते.
कादंबरीच्या अखेरीस हे सत्ताधारी नि त्यांनी ज्यांच्या द्वेषावर हे प्राण्यांचे राज्य निर्माण केले ती माणसे एकाच टेबलवर बसून उंची खाद्यपदार्थांचा यथेच्छ समाचार घेताना दिसतात. त्याचवेळी इतर अर्धपोटी प्राणी ही अजब युती अचंब्याने पाहात राहातात.
जगातील दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झालेल्या गौतम अदानींचा अमेरिकेतील हिंडेनबर्ग या कंपनीने भांडाफोड केला. आपलाच पैसा बाहेरील देशांतून फिरवून आत आणून शेअर्सच्या किंमती कंपनीच्या आर्थिक कुवतीच्या कैकपट वाढवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. यानंतर त्यांच्या शेअर्सना उतरती कळा लागली. त्याच दरम्यान त्यांच्या होल्डिंग कंपनीची शेअरविक्री चालू होती. अपेक्षेप्रमाणे तिला थंडा प्रतिसाद मिळाला. पण अखेरच्या दिवशी अचानक वेगाने विक्री होऊन त्यांना अपेक्षेइतके पैसे गुंतवले गेले. हिंडेनबर्गने केलेले आरोप पुन्हा एकवार होऊ लागले. अखेर अदानी यांनी ही विक्री रद्द करून मागणी नोंदवणार्यांचे पैसे परत करण्याचे जाहीर केले. त्यावरील हे भाष्य.
संकल्पना: वसंत केळकर या फेसबुक-मित्राची
२०१९च्या विधानसभा निवडणुका भाजप-शिवसेना यांनी युती करून लढवल्या. निकालामध्ये भाजपची किंचित पीछेहाट झाली तरीही हा मोठा पक्ष ठरला आणि युतीला बहुमत मिळाले. आता भाजपचे नेते या न्यायाने मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळणे अपेक्षित होते. परंतु शिवसेनेने राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीशी हातमिळवणी केली आणि सेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. अडीच वर्षांनंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह बंड केले नि भाजपशी हातमिळवणी केली. त्यावेळी तयार केलेले हे मीम.
चित्रात उभा असलेला शेल्डन हे ’द बिग बॅंग थिअरी’ या विनोदी मालिकेतील एककल्ली पात्र. आयुष्य काटेकोरपणे जगण्याचा त्याचा आटापिटा असतो. घरातील कोचावर बसण्याची त्याची जागाही ठरलेली आहे. तिथे अन्य कुणी बसले तर तो ’यू आर इन माय स्पॉट’ म्हणून त्याला/तिला तिथून उठण्यास भाग पाडत असतो.
चित्राची पार्श्वभूमी आहे ती डिस्नेच्या सुप्रसिद्ध लायन-किंग या चित्रपटाची. तो सिंह म्हणजे त्या चित्रपटातील जंगलचा राजा सिम्बा आहे. तो ज्या खडकावर बसला आहे त्याला प्राईड-रॉक म्हटले जाते आणि ते एकप्रकारे सिम्बाचे सिंहासनच आहे.
Don't mess with the mathematician.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा