Vechit Marquee

सूची: अनुक्रमे ▶ वर्गीकरण ▶ लेखमाला ▶ लक्षवेधी ◼

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

जग जागल्यांचे ०७ - ’रुझवेल्ट’चा राखणदार: कॅ. ब्रेट क्रोझर


  • कोरोनाचा क्रूसेडर : ली वेनलियांग « मागील भाग --- नव्वदीच्या दशकात तैवानशी झालेल्या संघर्षात अमेरिकन युद्धनौकांनी पाऊल ठेवल्यामुळे मोठा संघर्ष टाळण्यासाठी चीनला माघार घ्यावी लागली होती. अमेरिकेच्या या युद्धनौका त्या भागातील सहकारी वा मित्र देशांच्या भेटींतून आपले तिथले स्थान अधोरेखित करत असतात. USS Theodore Roosevelt या युद्धनौकेची व्हिएतनाम भेट याच हेतूचा भाग होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात, उत्तरेला चीनमध्ये कोरोना व्हायरसचा कहर चालू असताना, व्हिएतनाममधील डा नांग या बंदरात ती दाखल झाली. पाच दिवसांची व्हिएतनाम-भेट उरकून परतीच्या वाटेवर असताना, तीन-चार दिवसांनी तिच्या तीन खलाशांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली. दोनच दिवसांत बाधितांची पंचवीस झाली. तोवर अमेरिकेच्या संरक्षण दलातील सुमारे सहाशे जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील सुमारे सव्वाशे नौदलातील होते. २५ मार्च रोजी पेंटगॉनने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ’रुझवेल्ट’वरील बाधित खलाशांना लवकरच उपचारासाठी आणले जाईल असे जाहीर केले ३० मार्चपर्यंत नौकेवरील बाधितांची संख्या दीडशेहून ...

    पुढे वाचा »

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

भारत हा कर्मकांड-प्रधान देश आहे


  • भारत हा कर्मकांड-प्रधान देश आहे असे मी म्हणतो. ते तंतोतंत खरे करण्याचा माझ्या देशबांधवांचा प्रयत्न पाहून माझे ऊर भरून येतो. आपल्या सीएम आणि पीएम ने सांगितले की एसी वापरु नका... आता ते ही अंमळ कर्मकांडवालेच, घरच्या पर्सनल एसीला धोका नाही हे सांगितलेच नाही. मग त्यांचे थाळीबंद शागीर्द त्यांची आज्ञा पाळण्यास सरसावले. मॉल, चित्रपटगृह, मोठी औद्योगिक कार्यालये यांत ’सेंट्रलाईज्ड एअर कंडिशनिंग सिस्टम’ असते, जिथे हवा रि-सर्क्युलेट होते. जिथे एअर-व्हेंट असतात तिथे हवा आत खेचली जाऊन सेंट्रल कूलिंग युनिटकडे नेली जाते. तिथे ती थंड करुन पुन्हा परत सोडली जाते. या प्रक्रियेत कामाच्या ठिकाणी जर कोरोनाचे पुंज (ड्रॉप्लेट्स) असतील, तर ते हवेबरोबर खेचले जाऊन व्हेंटमध्ये दीर्घकाळ टिकून राहू शकतात. धोका इथे आहे! घरच्या - स्प्लिट वा विंडो - एसीमध्ये बाहेरच्या बाजूला जे पॅनेल असते त्यात अतिशय पातळ पत्रे असतात. त्यांचा एकुण सरफेस एरिआ भरपूर पण जाडी नगण्य असल्याने, त्यांच्याभोवती फिरणारा पंखा त्यांना लवकर थंड करतो. आणि हे खोलीतील हवेला थंड करतात. स्प्लिट...

    पुढे वाचा »

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

‘कोर्ट’ आणि एका ‘असंवेदनशील’ प्रेक्षकाच्या नजरेतून चित्रपट


  • १७ तारखेला (२०१५) 'कोर्ट' रिलीज झाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो दाखवला गेला तेव्हा प्रचंड गर्दीने प्रवेश मिळाला नव्हता. त्यानंतर अनेक पुरस्कार मिळाल्यानंतर त्याबद्दल अधिकाधिक चर्चा होऊ लागली. लोक उत्सुकतेने तो रिलीज होण्याची वाट पाहू लागले होते. चित्रपट मराठी असल्याने किती काळ टिकेल हे ठाऊक नसल्याने रिलीज झाल्या-झाल्या बघून टाकण्याचे बहुतेकांनी ठरवले होते. चित्रपट रिलीज झाला. अनेकांनी फर्स्ट-डे-फर्स्ट शो पाहून घेतला. वृत्तपत्रांतून आलेल्या समीक्षेतून बहुतेकांनी त्याला उत्तम रेटिंग दिले गेले. पहिल्या एक-दोन शोमधेच असा अनुभव येऊ लागला, की सर्वसामान्य प्रेक्षकाची प्रतिक्रिया निराशेची होती. स्वयंघोषित चित्रपट रसिक/समीक्षकहा धक्का होता. त्यातून काही जणांनी प्रेक्षक 'असे कसे दगड हो?' अशी प्रतिक्रिया देऊ केली. थोडे सभ्य होते त्यांनी 'काही संवेदनशीलता वगैरे आहे की नाही' असा थोडा सुसंस्कृत सूर लावला. एकामागून एक लेख नि फेसबुक पोस्ट्समधून अशा 'दगड' वा 'असंवेदनशील' प्रेक्षकांवर लेखकुंनी कोरडे ओढायला सुरुवात केली. माझा बुवा, माझा नेता, माझी ...

    पुढे वाचा »

अजा पुत्रो बलिं दद्यात्


  • २०१४ मध्ये अजस्र पुतळे उभारण्याची अहमहमिका चालू झाली. पुढे एकदोन वर्षांनी एका चर्चेदरम्यान एका पुतळ्यावर केलेल्या खर्चात जनहिताची काय काय कामे करता येतील याबाबत विश्लेषण करत असताना एका पुतळासमर्थकाने ’आम्ही हे ही करु नि ते ही करु.’ असा दावा केला होता. पण सरकारी मालकीच्या कंपन्या विकून सरकारला पैसा उभा करावा लागत असताना हे जास्तीचे पैसे आणणार कुठून या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हते. काही महिन्यांपूर्वी एका कॉम्रेडशी झालेल्या चर्चेदरम्यान कम्युनिस्ट व्यवस्थेमध्ये ’सर्वांना हवे ते करता येईल, हवे ते मिळेल’ या दाव्यावर ’पुरवठा पुरेसा असेल तर हे शक्य आहे. तो अपुरा असला की प्राधान्यक्रम लावून काहींना नाराज करावेच लागेल.’असा आक्षेप नोंदवला होता. त्यावरचे अप्रत्यक्ष उत्तर ’माणसे फार गरजा वाढवून ठेवतात, त्या मर्यादित ठेवल्या की पुरवठा नेहमीच पुरेसा राहील’ असे होते. थोडक्यात पुरवठ्यानुसार गरजाच कमी करुन घेतल्या की पुरवठा पुरेसा होणारच असा उलट उपाय पुढे ठेवला गेला. याच्या नेमके उलट भांडवलशाहीच्या मॉडेलमध्ये समाजाच्या वरच्या स्तरातील काही जणांनी भरपूर उपभोग घेतला, भरपूर खरेदी करत मागणी वाढ...

    पुढे वाचा »

रविवार, ५ एप्रिल, २०२०

जग जागल्यांचे ०६ - कोरोनाचा क्रूसेडर: ली वेनलियांग


  • नैतिक तंत्रभेदी : सॅमी कामकार « मागील भाग --- मागील वर्षाच्या अखेरीस चीनमधील वुहान शहरातील एका रुग्णालयात फ्लू अथवा सामान्य तापावर उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या प्रकृतीला बराच काळ उतार पडताना दिसत नव्हता. एरवी एक-दोन आठवड्यात बरा होणारा आजार दीर्घकाळ हटेना, तेव्हा त्याच्या घशातील स्रावाचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले. त्याचा रिपोर्ट आरोग्य सेवेच्या संचालिका असलेल्या डॉ. अई फेन यांच्या नजरेस पडला. या रिपोर्टमध्ये ’सार्स कोरोनाव्हायरस’ ची शक्यता अधोरेखित करण्यात आली होती. २००२ ते २००४ या दोन वर्षांत जगात धुमाकूळ घालून घेलेल्या आणि सुमारे आठशे बळी घेतलेल्या आजाराचे नाव पाहून अई यांनी सार्स (Severe Acute Respratory Syndrome) या शब्दाला अधोरेखित करुन वुहानमधील एका अन्य रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांकडे पाठवला. त्याच्याकरवी तो वुहानमधील वैद्यकीय वर्तुळात फिरला आणि वुहान मध्यवर्ती रुग्णालयातील नेत्रविशारद असलेल्या ’डॉ. ली वेनलियांग’ यांच्यापर्यंत पोचला. त्यात सार्सचा उल्लेख वाचून त्यांनी त्याकडे बारकाईने लक्ष देण्याचा निर्णय ...

    पुढे वाचा »

‘प्रिन्सेस डायमंड’च्या डायरीतून ‘कोविड-१९’


  • ‘जॉन्स हॉपकिन्स युनिवर्सिटी’चा कोविड-१९ संबंधी माहिती देणारा डॅशबोर्ड पाहात होतो. कोणत्या देशांत किती रुग्ण आहेत हे पाहताना त्या यादीत अचानक ’डायमंड प्रिन्सेस’ हे नाव पाहिले की बुचकळ्यात पडलो. या देशाचे नावही कधी ऐकले नव्हते. अधिक शोध घेता हा देश नव्हे तर खासगी क्रूझ आहे असे समजले. जेमतेम एक हजारच्या आसपास कर्मचारी आणि सुमारे २७०० उतारू असलेल्या या क्रूझवर तब्बल ७१२ लोकांना लागण झालेली होती. त्यातले ५१२ विषाणूमुक्त झाले तर १० जण दगावले असे हॉपकिन्सचा डॅशबोर्ड सांगतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर लागण झाल्यानेच त्या क्रूझचे नाव देशांच्या यादीत समाविष्ट करावे लागले. हा एक अनोखा अपवाद आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली लागण हे एकच कारण आहे असे मात्र नाही. असा अपवाद समोर असलेल्या समस्येबद्दल काही इनसाईट देऊन जातो आहे. एखाद्या मोठ्या भूभागावर अशा विषाणूच्या प्रसाराचा अभ्यास करताना अनेकविध घटकांमुळे कार्यकारणभाव, निष्कर्ष यात अनेक अडचणी येतात. लोकसंख्येच्या विस्तारामुळे प्रत्येक व्यक्तीबाबत निरीक्षणे नोंदवत जाणे जिकीरीचे होते. याशिवाय अभ्यासक्षेत्र जरी आखून घेतले तरी त्या सीमेबाहेरील अनेक घ...

    पुढे वाचा »