Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
जग जागल्यांचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जग जागल्यांचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

जग जागल्यांचे १२ - कम्युनिस्टांच्या देशात व्लादिमिरचा अनोखा लढा


  • ग्रीनहाऊस माफियांचा कर्दनकाळ: गाय पीअर्स « मागील भाग --- 'Let us defend our laws from being encroached upon by the authorities' - Vladimir Bukovskii. साठच्या दशकाच्या सुरुवातीस मॉस्को विद्यापीठात ’कॉस्मोनॉल’ या कम्युनिस्ट पक्षाच्या युवा शाखेवर टीका करणारे टिपण प्रसिद्ध झाले. त्यात ही नैतिक आणि आध्यात्मिक दिशा हरवलेली, मरु घातलेली संघटना असल्याचे म्हटले होते. या संघटनेमध्ये पुन्हा चैतन्य प्रदान करायचे असेल तर त्यात लोकशाही रुजवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केलेले होते. हे टिपण सोव्हिएत गुप्तहेर संघटना केजीबीच्या दप्तरी दाखल झाले. या टिपणाच्या लेखकाची, एकोणीस वर्षीय ’व्लादिमिर ब्युकोव्स्की’ याची कसून चौकशी करुन त्याला विद्यापीठातून निलंबित करण्यात आले. बाह्यशिक्षण घेत असताना प्… पुढे वाचा »

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

जग जागल्यांचे ११ - ग्रीनहाऊस माफियांचा कर्दनकाळ: गाय पीअर्स


  • पर्यावरणाचा पहारेकरी: विल्यम सँजुअर « मागील भाग --- मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये भडकलेल्या वणव्याने प्रचंड वनसंपत्ती, लक्षावधी वन्यजीवांचा संहार केला. मानवी संपत्तीलाही उध्वस्त करत हा वणवा तब्बल तीन महिने धुमसत होता. त्याहीपूर्वी अमेझॉनच्या जंगलात दहा महिने थैमान घातलेल्या वणव्याने नऊ हजार स्क्वेअर कि.मी. चे क्षेत्र जाळून भस्म केले होते. ब्राझीलच्या अध्यक्षाने हा वणवा आटोक्यात आणण्यात हेळसांड तर केलीच, पण अन्य देशांची मदत नाकारुन एक प्रकारे हा वणवा पसरण्यास मदतही केली. याची झळ बोलिव्हिया, पेरु, पॅराग्वे या देशांतही पसरली. त्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा प्रतिसाद अधिक नेमका होता... याचे कारण त्यांनी अनुभवलेला हा पहिलाच वणवा नव्हता. एकोणीसाव्या शतकापासून अशा व्यापक वणव्यांचा सामना त्यांना करावा लागलेला आहे. विसाव्या शतकाच… पुढे वाचा »

रविवार, ५ जुलै, २०२०

जग जागल्यांचे १० - पर्यावरणाचा पहारेकरी: विल्यम सँजुअर


  • मोर्देशाय वानुनू: एक चिरंतन संघर्ष « मागील भाग --- १९७४ सालच्या मे महिन्यात इलिनॉय राज्यात तीन गायी अचानक मृतावस्थेत आढळून आल्या. पोस्टमॉर्टेममध्ये त्यांचा मृत्यू सायनाइडच्या विषबाधेने झाल्याचे स्पष्ट झाले. सायनाइड हे नैसर्गिक वातावरणात आढळून येणारे रसायन नव्हे. तपासाअंती असे दिसून आले की तेथील जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर सायनाइड, कॅडमिअम, शिसे, निकेल, जस्त वगैरे घातक द्र्व्ये मुरलेली आहेत. यांचा उगम होता जवळच असलेल्या ’बायरन सॅल्वेज यार्ड’मध्ये. ’बायरन सॅल्वेज यार्ड’ ही कचरा-डेपो (landfill) म्हणजे जमिनीवर कचरा जिरवण्याची जागा होती. बहुतेक उत्पादनप्रक्रियांदरम्यान निसर्गाला नि मानवालाही घातक अशी टाकाऊ द्रव्ये वा कचरा तयार होतो. अशा अनेक उद्योगांची उत्सर्जिते जिरवण्याची सेवा ही कंपनी पुरवीत होती. त्यांच्या ग्राहकांमध्ये तेलशुद्धिकरण कं… पुढे वाचा »

रविवार, १४ जून, २०२०

जग जागल्यांचे ०९ - मोर्देशाय वानुनू: एक चिरंतन संघर्ष


  • वर्णभेदभेदी कॅथी हॅरिस « मागील भाग --- ७ जून १९८१, इराक अण्वस्त्रांसाठी उपयुक्त इंधन तयार करत असल्याचा आरोप करत त्या देशातील ओसिरॅक अणुभट्टीवर इस्रायलने बॉम्बवर्षाव केला. आजवर इस्रायलने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आपल्या अणुकार्यक्रमाबाबत कायम ’नरो वा कुंजरो वा’ भूमिका ठेवली होती. उघड झालाच, तर तो स्वसंरक्षणार्थ आहे अशी मखलाशी यातून करणे शक्य होते. त्यांच्याच एका तंत्रज्ञाने लवकरच तो उघड केलाही. त्याचे नाव मोर्देशाय वानुनू. एका कर्मठ ज्यू घरात जन्मलेला मोर्देशाय दहा वर्षांचा असताना आपल्या भलामोठ्या कुटुंबासह इस्रायलमध्ये स्थलांतरित झाला. लष्करी अभियांत्रिकी सेवेत तीन वर्षांच्या सक्तीच्या लष्करी सेवेनंतर सैन्यात भरती होण्याचा प्रस्ताव नाकारुन त्याने पुढील शिक्षणासाठी तेल अविव विद्यापीठात प्रव… पुढे वाचा »

सोमवार, २५ मे, २०२०

जग जागल्यांचे ०८ - वर्णभेदभेदी कॅथी हॅरिस


  • ‘रुझवेल्ट’चा राखणदार: कॅ. ब्रेट क्रोझर « मागील भाग --- बराच काळ मानेवर खडा ठेवून रोजगाराचे काम केल्यानंतर तुम्ही छानशा सुटीचा बेत आखता. परदेशातील एखाद्या छानशा ठिकाणी जाऊन सुटीचा निवांत आस्वाद घेऊन ताजेतवाने होत परतीच्या वाटेवर विमानतळावरुन बाहेर पडण्यासाठी रांगेत उभे राहता. केव्हा एकदा बाहेर पडतो नि घर गाठतो असे तुम्हाला झालेले असते. पण... तुम्हाला तपासणीसाठी दीर्घकाळ अडकवून ठेवले जाते. कधी शरीराची बाह्य चाचपणी, कधी संपूर्ण विवस्त्र करुन तपासणी, कधी इंद्रियतपासणीदेखील! कधी तशा विवस्त्र स्थितीत तपासणी-खोलीत बसवून ठेवले जाते. काही वेळा शरीराअंतर्गत तपासणीसाठी एक्स-रे किंवा एन्डोस्कोपीतून जावे लागते. क्वचित सुलभ शौचाचे औषध देऊन कस्टम कर्मचार्‍यांच्या देखरेखीखाली उत्सर्जितांची पाहणी केली जाते. कधी हातकड्या घालून अन्य तपासण्यांसाठी हॉस्… पुढे वाचा »

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

जग जागल्यांचे ०७ - ’रुझवेल्ट’चा राखणदार: कॅ. ब्रेट क्रोझर


  • कोरोनाचा क्रूसेडर : ली वेनलियांग « मागील भाग --- नव्वदीच्या दशकात तैवानशी झालेल्या संघर्षात अमेरिकन युद्धनौकांनी पाऊल ठेवल्यामुळे मोठा संघर्ष टाळण्यासाठी चीनला माघार घ्यावी लागली होती. अमेरिकेच्या या युद्धनौका त्या भागातील सहकारी वा मित्र देशांच्या भेटींतून आपले तिथले स्थान अधोरेखित करत असतात. USS Theodore Roosevelt या युद्धनौकेची व्हिएतनाम भेट याच हेतूचा भाग होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात, उत्तरेला चीनमध्ये कोरोना व्हायरसचा कहर चालू असताना, व्हिएतनाममधील डा नांग या बंदरात ती दाखल झाली. पाच दिवसांची व्हिएतनाम-भेट उरकून परतीच्या वाटेवर असताना, तीन-चार दिवसांनी तिच्या तीन खलाशांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली. दोनच दिवसांत बाधितांची पंचवीस झाली. तोवर अमेरिकेच्या संरक्षण दलातील सुमारे सहाशे जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील सुमारे सव… पुढे वाचा »

रविवार, ५ एप्रिल, २०२०

जग जागल्यांचे ०६ - कोरोनाचा क्रूसेडर: ली वेनलियांग


  • नैतिक तंत्रभेदी : सॅमी कामकार « मागील भाग --- मागील वर्षाच्या अखेरीस चीनमधील वुहान शहरातील एका रुग्णालयात फ्लू अथवा सामान्य तापावर उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या प्रकृतीला बराच काळ उतार पडताना दिसत नव्हता. एरवी एक-दोन आठवड्यात बरा होणारा आजार दीर्घकाळ हटेना, तेव्हा त्याच्या घशातील स्रावाचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले. त्याचा रिपोर्ट आरोग्य सेवेच्या संचालिका असलेल्या डॉ. अई फेन यांच्या नजरेस पडला. या रिपोर्टमध्ये ’सार्स कोरोनाव्हायरस’ ची शक्यता अधोरेखित करण्यात आली होती. २००२ ते २००४ या दोन वर्षांत जगात धुमाकूळ घालून घेलेल्या आणि सुमारे आठशे बळी घेतलेल्या आजाराचे नाव पाहून अई यांनी सार्स (Severe Acute Respratory Syndrome) या शब्दाला अधोरेखित करुन वुहानमधील एका अन्य रुग्णालयातील व… पुढे वाचा »

रविवार, २२ मार्च, २०२०

जग जागल्यांचे ०५ - नैतिक तंत्रभेदी: सॅमी कामकार


  • कॅथरीन बोल्कोव्हॅक « मागील भाग --- दहा वर्षांचा असताना त्याला पहिला संगणक मिळाला. इंटरनेटवर भ्रमंती चालू असताना कुणीतरी धमकी देऊन त्याचा संगणक बंद पाडला. तो हादरला. पण ’जर समोरचा हे करु शकत असेल, तर मी ही करु शकतो’ या जिद्दीने कामाला लागला. इतर कुणाचा अधिकार असलेले, मालकीचे असलेले संगणक अथवा संगणक-प्रणाली यांच्यात परस्पर बदल करणे याला संगणकाच्या भाषेत ’हॅक’ करणे म्हटले जाते. टीन-एजर असतानाच तो वेगवेगळी सॉफ्टवेअर, गेम्स ’हॅक’ करुन आपल्याला हवे तसे बदल करु लागला. असे असले तरी सुरुवातीला त्याने इतर कुणाच्या संगणकाला धक्का लावलेला नव्हता. वयाच्या विशीत पोचल्यावर त्याने गंमत म्हणून हा प्रयोग करायचे ठरवले. तरुणाई आणि सोशल मीडिया हे नाते तेव्हा मूळ धरु लागले होते. आजच्या फेसबुक’सारख्या ’मा… पुढे वाचा »

रविवार, ८ मार्च, २०२०

जग जागल्यांचे ०४ - कॅथरीन बोल्कोव्हॅक


  • जिन्हे नाज़ था हिंद पर... : सत्येंद्र दुबे « मागील भाग --- सोविएत युनियनप्रमाणेच कम्युनिस्ट राजवटीखाली असलेल्या युगोस्लाव्हिया या देशाच्या वांशिक, धार्मिक, भाषिक आधारावर विघटनास सुरुवात झाली. सात देश वेगळे झाले. यातील बोस्निया या राष्ट्रात झालेली यादवी सर्वात भयानक होती. तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि लोकशाही रुजवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे (UN) मिशन हाती घेण्यात आले. याचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय पोलिस दलाची (IPTF) स्थापना करण्यात आली. यात विविध देशांचे नागरिकांची निवड करण्यात आली. ही निवड करण्याची जबाबदारी असलेल्या ’डाईनकॉर्प’ या कंपनीतर्फे नेब्रास्का पोलिस दलाच्या नोटीस बोर्डवर लावलेली भरतीची नोटीस कॅथरीन बोल्कोव्हॅक या अधिकार्‍याच्या नजरेस पडली. भरपूर पगार, राष्ट्रसंघाच्या मिशनमध्ये काम करण्याची आणि आपल्या आजोबांच्य… पुढे वाचा »

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०

जग जागल्यांचे ०३ - जिन्हे नाज़ था हिंद पर... : सत्येंद्र दुबे


  • रोशचा रोष: स्टॅन्ले अ‍ॅडम्स « मागील भाग --- देशातील चार महानगरांसह अनेक प्रमुख शहरांना जोडणार्‍या ’स्वर्णिम चतुर्भुज (Golder Quadrilateral) या भारतातील महत्वाकांक्षी प्रोजेक्टची पायाभरणी १९९९ मध्ये करण्यात आली. प्रकल्पाची व्याप्ती आणि महत्व लक्षात घेता अशा प्रकारच्या कामांचा दीर्घ पूर्वानुभव, आवश्यक तंत्रज्ञान, अत्याधुनिक साधनसामुग्री आवश्यक होते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा मागवण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग क्र. २ (’ग्रॅंड ट्रंक रोड’ ) हा या जाळ्याचा भाग होणार होता. जुलै २००२ मध्ये या महामार्गावरील औरंगाबाद-बाराचेट्टी विभागात सत्येंद्र दुबे या अभियंत्याची प्रकल्प संचालक म्हणून नेमणूक झाली. सत्येंद्र हे पहिल्यापासूनच अतिशय आदर्शवादी होते असे त्यांचे बंधू सांगतात. कामावर रुजू झाल… पुढे वाचा »

रविवार, २६ जानेवारी, २०२०

जग जागल्यांचे ०२ - रोशचा रोष : स्टॅन्ले अ‍ॅडम्स


  • व्यवस्था आणि माणूस « मागील भाग --- २००९ मध्ये भारतात ’स्वाईन फ्लू’चा उद्रेक झाला. या आजाराने झालेल्या मृत्यूंची संख्या हजारांत पोचली. यावर परिणामकारक ठरणारे एकच औषध होते, त्याचे नाव ’टॅमिफ्लू’. हे औषध १९९९ साली बाजारात आणले गेले, आणि उत्पादकाचा त्यावरील एकाधिकार संपण्याच्या सुमारास या आजाराचा जगभर उद्रेक झाला. या योगायोगाबद्दल अनेकांनी संशय व्यक्त केला होता. या औषधाची निर्माती होती स्वित्झर्लंड-स्थित ’हॉफमान-ला-रोश’, जिच्याबद्दल असा संशय घेण्यास पुरेसा इतिहास होता. संशोधन-खर्च भरून येण्यासाठी औषध निर्मिती कंपन्यांना औषध बाजारात आल्यावर काही काळ एकाधिकार दिलेला असतो. ब्रिटनमध्ये व्हॅलियम आणि लिब्रियम या उपशामक (tranquilizers ) औषधांचे रोशकडे असलेले एकाधिकार संपल्यावरही रोशने अन्य उत्पादकांना त्याचे उत्पादन-अधिकार देण्याच्या ब्रिटिश … पुढे वाचा »

रविवार, १२ जानेवारी, २०२०

जग जागल्यांचे ०१ - व्यवस्था आणि माणूस


  • मानवी इतिहासाच्या सुरुवातीपासून माणूस कळपांमध्ये अथवा टोळ्यांमध्ये राहात असे. त्याच्या आयुष्यातील आहार आणि निद्रा वगळता इतर सर्व कामे, जसे शिकार, अन्नवाटप, संरक्षण, अपत्य संगोपन ही दोन किंवा अधिक व्यक्तींच्या सामूहिक सहभागानेच होत असत. शिकारीसारखे काम करत असताना हाकारे घालणे, कळप उठवणे, ठार मारणे, शिकार वस्तीच्या स्थानी वाहून नेणे, तिचे वाटप करणे... ही आणि यापुढची कामे विविध व्यक्तींना वाटून दिलेली असत. एका कामाच्या पूर्तीसाठी यात श्रमविभागणीचे तत्त्व अंगिकारले जात असे. पुढे शिकारीचे एक कार्य जर छोटी छोटी उप-कार्ये साध्य केल्याने साध्य होत असेल तर व्यक्तीच्या कार्यकौशल्याच्या एकत्रीकरणाने मोठी कार्ये सिद्ध करता येतील, असा शोध माणसाला लागला. या श्रम-संमीलनाचा तत्वाचा वापर करुन माणसांनी पुढे यापू… पुढे वाचा »