Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
आरोग्यव्यवस्था लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आरोग्यव्यवस्था लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

अजा पुत्रो बलिं दद्यात्


  • २०१४ मध्ये अजस्र पुतळे उभारण्याची अहमहमिका चालू झाली. पुढे एकदोन वर्षांनी एका चर्चेदरम्यान एका पुतळ्यावर केलेल्या खर्चात जनहिताची काय काय कामे करता येतील याबाबत विश्लेषण करत असताना एका पुतळासमर्थकाने ’आम्ही हे ही करु नि ते ही करु.’ असा दावा केला होता. पण सरकारी मालकीच्या कंपन्या विकून सरकारला पैसा उभा करावा लागत असताना हे जास्तीचे पैसे आणणार कुठून या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हते. काही महिन्यांपूर्वी एका कॉम्रेडशी झालेल्या चर्चेदरम्यान कम्युनिस्ट व्यवस्थेमध्ये ’सर्वांना हवे ते करता येईल, हवे ते मिळेल’ या दाव्यावर ’पुरवठा पुरेसा असेल तर हे शक्य आहे. तो अपुरा असला की प्राधान्यक्रम लावून काहींना नाराज करावेच लागेल.’असा आक्षेप नोंदवला होता. त्यावरचे अप्रत्यक्ष उत्तर ’माणसे फार गरजा वाढवून ठेवतात, त्या मर्यादित ठेवल्या की पुरवठा नेहमीच प… पुढे वाचा »

रविवार, ५ एप्रिल, २०२०

जग जागल्यांचे ०६ - कोरोनाचा क्रूसेडर: ली वेनलियांग


  • नैतिक तंत्रभेदी : सॅमी कामकार « मागील भाग --- मागील वर्षाच्या अखेरीस चीनमधील वुहान शहरातील एका रुग्णालयात फ्लू अथवा सामान्य तापावर उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या प्रकृतीला बराच काळ उतार पडताना दिसत नव्हता. एरवी एक-दोन आठवड्यात बरा होणारा आजार दीर्घकाळ हटेना, तेव्हा त्याच्या घशातील स्रावाचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले. त्याचा रिपोर्ट आरोग्य सेवेच्या संचालिका असलेल्या डॉ. अई फेन यांच्या नजरेस पडला. या रिपोर्टमध्ये ’सार्स कोरोनाव्हायरस’ ची शक्यता अधोरेखित करण्यात आली होती. २००२ ते २००४ या दोन वर्षांत जगात धुमाकूळ घालून घेलेल्या आणि सुमारे आठशे बळी घेतलेल्या आजाराचे नाव पाहून अई यांनी सार्स (Severe Acute Respratory Syndrome) या शब्दाला अधोरेखित करुन वुहानमधील एका अन्य रुग्णालयातील व… पुढे वाचा »

‘प्रिन्सेस डायमंड’च्या डायरीतून ‘कोविड-१९’


  • ‘जॉन्स हॉपकिन्स युनिवर्सिटी’चा कोविड-१९ संबंधी माहिती देणारा डॅशबोर्ड पाहात होतो. कोणत्या देशांत किती रुग्ण आहेत हे पाहताना त्या यादीत अचानक ’डायमंड प्रिन्सेस’ हे नाव पाहिले की बुचकळ्यात पडलो. या देशाचे नावही कधी ऐकले नव्हते. अधिक शोध घेता हा देश नव्हे तर खासगी क्रूझ आहे असे समजले. जेमतेम एक हजारच्या आसपास कर्मचारी आणि सुमारे २७०० उतारू असलेल्या या क्रूझवर तब्बल ७१२ लोकांना लागण झालेली होती. त्यातले ५१२ विषाणूमुक्त झाले तर १० जण दगावले असे हॉपकिन्सचा डॅशबोर्ड सांगतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर लागण झाल्यानेच त्या क्रूझचे नाव देशांच्या यादीत समाविष्ट करावे लागले. हा एक अनोखा अपवाद आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली लागण हे एकच कारण आहे असे मात्र नाही. असा अपवाद समोर असलेल्या समस्येबद्दल काही इनसाईट देऊन जातो आहे. एखाद्या मोठ्या भूभागावर … पुढे वाचा »

रविवार, २६ जानेवारी, २०२०

जग जागल्यांचे ०२ - रोशचा रोष : स्टॅन्ले अ‍ॅडम्स


  • व्यवस्था आणि माणूस « मागील भाग --- २००९ मध्ये भारतात ’स्वाईन फ्लू’चा उद्रेक झाला. या आजाराने झालेल्या मृत्यूंची संख्या हजारांत पोचली. यावर परिणामकारक ठरणारे एकच औषध होते, त्याचे नाव ’टॅमिफ्लू’. हे औषध १९९९ साली बाजारात आणले गेले, आणि उत्पादकाचा त्यावरील एकाधिकार संपण्याच्या सुमारास या आजाराचा जगभर उद्रेक झाला. या योगायोगाबद्दल अनेकांनी संशय व्यक्त केला होता. या औषधाची निर्माती होती स्वित्झर्लंड-स्थित ’हॉफमान-ला-रोश’, जिच्याबद्दल असा संशय घेण्यास पुरेसा इतिहास होता. संशोधन-खर्च भरून येण्यासाठी औषध निर्मिती कंपन्यांना औषध बाजारात आल्यावर काही काळ एकाधिकार दिलेला असतो. ब्रिटनमध्ये व्हॅलियम आणि लिब्रियम या उपशामक (tranquilizers ) औषधांचे रोशकडे असलेले एकाधिकार संपल्यावरही रोशने अन्य उत्पादकांना त्याचे उत्पादन-अधिकार देण्याच्या ब्रिटिश … पुढे वाचा »

गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

कोटीच्या कोटी उड्डाणे*...


  • (‘अ.भा. छद्मविज्ञान काँग्रेस’च्या एक हजार आठशे तेराव्या वार्षिक अधिवेशनात सादर केलेला शोधनिबंध) जर्मनीत अठराव्या शतकात जन्मलेला सॅम्युअल हनिमान भारतीय वंशातला होता. हनिमान हे त्याचे कुलनाम ‘हनुमान’ याचे जर्मन रूप. हा रामायणकालीन हनुमानाचा वंशज होता. आफ्रिकेत जसे प्रत्येक वंशाचे जमातीचे एक झाड असते. तो वंश त्या झाडाच्या नावे ओळखला जातो. तसे भारतात मूळ पुरुषाच्या नावाने हे तर जगजाहीर आहेच. (त्यातून पुढे गोत्र संकल्पना आली.) खरा इतिहास हा की हनुमान हा वन्यज होता, पण तो वानर नव्हता. हिंदू नि हिंदुस्तानद्वेष्ट्या पाश्चात्त्य लोकांनी रामायणात प्रक्षेप करुन तसे लिहिले नि त्याचे महत्व कमी केले. पण हे करतानाच त्याचे कार्य, त्याचे ग्रंथ चोरुन नेऊन त्यातील ज्ञान, शोध, माहिती आपल्या नावावर खपवली. दु… पुढे वाचा »

रविवार, १४ जानेवारी, २०१८

आयुर्वेदाच्या नावे गोरखधंदा


  • ‘आयुर्वेद ही स्वदेशी चिकित्सापद्धती आहे’ या एकाच मुद्द्याला धरून, तिला राष्ट्रप्रेमाशी जोडून घेऊन आणि ‘त्यातील औषधांचे साईड इफेक्ट्स नसतात’ या भंपक दाव्याची पुंगी सदोदित वाजवत अनेक तथाकथित औषधे ‘आयुर्वेदिक आहेत’ – खरंतर आयुर्वेदिय म्हणायला हवे– असा दावा करत खपवली जातात. ज्यांची ना कुठली क्लिनिकल ट्रायल होते ना कुठला अभ्यास. पुन्हा काही साईड इफेक्ट्स दिसून आलेच तर ‘हे आयुर्वेदिक आहे, साईड इफेक्ट्स नसतात. तुमचे ते त्रास दुसर्‍याच कशामुळे झाले असणार’ असे म्हणत हात वर करता येतात. अलीकडे राष्ट्रभक्तीच्या पेहरावात नटून थटून वावरणारी आयुर्वेदाची ही नवी ब्रँच आरोग्याशी – अर्थात अडाणी रुग्णांच्या – खेळत असते. एका क्लिनिकल ट्रायलला किती काळ लागतो, किती पैसा लागतो, किती अद्ययावत यंत्रणा लागते याची क… पुढे वाचा »

शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६

ऐलपैल - २ : क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल


  • आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा   << मागील भाग ‘आईकडून गर्भाकडे होणारे एचआयव्ही आणि सिफिलिस संक्रमण यशस्वीपणे रोखणारा क्यूबा हा जगातील पहिला देश’ ठरल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मागच्या वर्षी (२०१५) जाहीर केले, आणि कॅरेबियन समुद्रातील हे लहानसे बेट अचानक प्रकाशझोतात आले. इतर काही देश जरी हे उद्दिष्ट गाठलेले– वा गाठण्याचा स्थितीत असले, तरी अमेरिकेच्या परसात असलेला आणि सातत्याने अमेरिकेची वक्रदृष्टी सहन करत आलेला, कम्युनिस्ट एकाधिकारशाही असलेला देश हे साधतो, हा अनेकांच्या दृष्टिने मोठा धक्का होता. सनसनाटी बातम्यांच्या शोधात असणार्‍या इलेक्ट्रॉनिक माध्यमांची दृष्टी, जरी या निमित्ताने प्रथमच या देशाकडे वळली असली, तरी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात क्यूबाचे नाव त्यापूर्वी एक दोन दशकांपासूनच ऐकू येऊ लागले होते. कॅरॅबियन समुद्रात बहा… पुढे वाचा »