-
रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी << मागील भाग दरवर्षी ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा झाली की वार्षिक वादंगांचे फड रंगतात. कुणाला शासनाची हांजी हांजी करण्याबद्दल पुरस्कार मिळाला, कुणाची लायकीच नव्हती, दुसरेच कुणी लायक कसे होते, याची हिरिरीने चर्चा सुरू होते. माध्यमांतून दिसणार्या लोकांभोवती ही चर्चा बहुधा फिरत राहते. पण या यादीत दरवर्षी काही अपरिचित नावेही दिसतात. ते कोण याचा शोध घेण्याची तसदी आपण बहुधा घेत नाही. विशेष म्हणजे ही नावे बहुधा पर्यावरण, जलसंधारण, मूलभूत वा शाश्वत विकास या सर्वसामान्य माणसाच्या जगण्याला पायाभूत असूनही, तुम्हा आम्हाला काडीचा रस नसलेल्या क्षेत्रातील असतात असा अनुभव आहे. यांच्याकडे फारसे लक्ष द्यावे असे माध्यमांना वाटत नाही याचे कारण म्हणजे यात ‘ब्रेकिंग न्यूज’ नसते; सर्वसामान्यांना वाटत नाही कारण आ… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
ऐलपैल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
ऐलपैल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, ८ एप्रिल, २०१६
ऐलपैल - ४ : जमिनीलगतची उंच माणसे
Labels:
‘पुरोगामी जनगर्जना’,
ऐलपैल,
प्रासंगिक,
व्यक्तिमत्व,
समाज
शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६
ऐलपैल - २ : क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल
-
आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा << मागील भाग ‘आईकडून गर्भाकडे होणारे एचआयव्ही आणि सिफिलिस संक्रमण यशस्वीपणे रोखणारा क्यूबा हा जगातील पहिला देश’ ठरल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मागच्या वर्षी (२०१५) जाहीर केले, आणि कॅरेबियन समुद्रातील हे लहानसे बेट अचानक प्रकाशझोतात आले. इतर काही देश जरी हे उद्दिष्ट गाठलेले– वा गाठण्याचा स्थितीत असले, तरी अमेरिकेच्या परसात असलेला आणि सातत्याने अमेरिकेची वक्रदृष्टी सहन करत आलेला, कम्युनिस्ट एकाधिकारशाही असलेला देश हे साधतो, हा अनेकांच्या दृष्टिने मोठा धक्का होता. सनसनाटी बातम्यांच्या शोधात असणार्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांची दृष्टी, जरी या निमित्ताने प्रथमच या देशाकडे वळली असली, तरी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात क्यूबाचे नाव त्यापूर्वी एक दोन दशकांपासूनच ऐकू येऊ लागले होते. कॅरॅबियन समुद्रात बहा… पुढे वाचा »
Labels:
‘पुरोगामी जनगर्जना’,
आंतरराष्ट्रीय,
आरोग्यव्यवस्था,
ऐलपैल,
जिज्ञासानंद
गुरुवार, १४ जानेवारी, २०१६
ऐलपैल - १ : आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा
-
इंग्लंड आणि ग्रीनलंडच्या यांच्या मधोमध उत्तर अटलांटिक आणि आर्क्टिक समुद्राच्या सीमेवर वसलेले आईसलँड हे एक बेट. महाराष्ट्राच्या सुमारे एक-तृतीयांश इतके क्षेत्रफळ, आणि जेमतेम तीन लाख लोकसंख्येचा देश. युनोच्या ‘ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स’नुसार १३ वा, तर दरडोई उत्पन्नाच्या दृष्टीने जगात १६व्या क्रमांकाचा देश! या देशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हटले तर तो आपली ऊर्जेची जवळजवळ संपूर्ण गरज ही केवळ जलविद्युत आणि भू-ऊर्जा या दोन पर्यावरणपूरक ऊर्जांच्या माध्यमातून भागवतो . आर्थिकदृष्ट्या सुस्थिर असलेल्या या देशाने नव्वदीच्या दशकात खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. याचाच एक भाग म्हणून बँकांवरील सरकारी नियंत्रण पूर्णपणे उठवण्यात आले. आईसलँडचा आर्थिक व्यवहार बव्हंशी ज्यांमध्ये एकवटला होता, त्या ग्लिटनर, लँड्सबँ… पुढे वाचा »
Labels:
‘पुरोगामी जनगर्जना’,
अर्थकारण,
आंतरराष्ट्रीय,
ऐलपैल,
जिज्ञासानंद,
राजकारण,
समाज
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)


