-
(मागच्या पोस्टमध्ये ‘खाण्यावरती बोलू काही’ म्हणून जे बोलायचे ते बोलून घेतले. पण आता असे लक्षात आले की अजूनही थोडे बोलायचे राहिले आहे. एखादा पदार्थ आवडला की पोट भरल्यावरही भूक असल्याची भावना शिल्लक राहाते ना, तसे काहीसे. म्हणून ही खाद्यावरची दुसरी पोस्ट, वेगळ्या वाटेवरून जाणारी.) मराठी काव्यक्षेत्र हे निरंतर फळते-फुलते– काहींच्या मते फसफसते (म्हणजे द्रव कमी नि फेस जास्त) असे क्षेत्र आहे. माझ्या फेसबुक वास्तव्या-दरम्यान दररोज किमान दहा मराठी कवितांचे आगमन होते असा अनुभव आहे. पण अशा संपृक्त जगात जी विषमता दिसते, त्याने आमचे मन नेहेमी विषण्ण असते (१) . अगदी रांगोळी टिंबांच्या कहाण्या, हिमालयाची उशी करुन झोपण्याच्या वल्गना करणार्या किंवा कवितेची चूळ थुंकून जगाला भस्म करुन टाकू इच्छिणार्या महत्त्वाकांक्षा... वगैरे ‘हायर कविते’चे क्षेत्र त… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
मनोरंजन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मनोरंजन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बुधवार, ११ जून, २०२५
काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता
बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४
I. P. L. (इंडियन पोलिटिकल लीग)
-
काही वर्षांपूर्वी कुणीतरी (बहुधा अण्णा हजारे, खात्री नाही) म्हणाले होते, ‘आपल्या लोकशाहीमध्ये पक्षीय लोकशाहीला स्थान नाही. सर्व उमेदवारांनी स्वबळावर लढावे. नंतर विजयी उमेदवारांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे.’ सध्या ‘जिकडे उमेदवारी तिकडे हरी हरी’ या उक्तीनुसार आपले बहुतेक राजकारणी वागताना दिसत आहेत. हे पाहता अशा पक्षातीत निवडणुकांची वेळ जवळ आलेली आहे असे वाटू लागले आहे. मग ‘उगाच अंदाजपंचे दाहोदरसे होण्यापेक्षा सारं काही नीट वैधानिक पातळीवरच का करु नये?’ असा विचार मी करत होतो. ‘आणि म्हणोन’, ‘या ठिकाणी’, ‘प्रभू श्रीरामांच्या कृपेने’ हा एक प्रस्ताव देतो आहे. पटतो का पाहा. नाही तर दुरुस्त्या सुचवा. सर्वप्रथम निवडणूक आयोग ही वैधानिक संस्थाच विसर्जित करुन टाकावी. तिच्या जागी नवी व्यवस्था असावी. आणि हा बदल नियोजन आयोगाकडून नीती आयोगाकडे— म्ह… पुढे वाचा »
मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४
दोन हजारची नोट आणि चाकावरची अॅन्टेना
-
काही वर्षांपूर्वी एका महान नेत्याच्या सरकारने दोन हजार रुपयाच्या नोटेमध्ये गुपचूप जीपीएस चिप बसवल्याची कुजबूज ऐकायला मिळाली होती. या चिपवरून ती नोट कुठे आहे हे बिनचूकपणे सांगता येते असे एका चॅनेलकाकूंनी आम्हाला डेमोसह समजावून सांगितले होते. बहुतेक काळा पैसा साठवणारे नेहमी मोठ्या दर्शनी किंमतीच्या नोटांमध्ये तो साठवत असल्याचे एका चाणाक्ष (हा शब्द `चाणक्य'वरुन आला असावा का?) नि धूर्त नेत्याने ओळखले होते. म्हणून या सर्वात मोठ्या दर्शनी किंमतीच्या नोटेची लालूच दाखवण्यात आली होती नि त्यात जीपीएस चिप दडवली होती एक दोन मूर्ख चॅनेल पत्रकारांनी हे गुपित फोडल्याने पंचाईत झाली होती. परंतु नंतर शासनाने सफाईने (हिंदीमध्ये ‘आनन फाननमें’ किंवा इंग्रजीत swiftly) सक्रीय होत त्याबद्दल अधिक माहिती जाहीर होऊ नये याची काळजी घेतली. त्यामुळे त्या चि… पुढे वाचा »
रविवार, २८ एप्रिल, २०२४
अ.सं.सं. मध्ये मल्ल्यामहर्षी
-
(२०१६ मध्ये प्रथम विजय मल्ल्या यांच्या नंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी, नीतिन संदेसरा यांनीही आर्थिक गैरव्यवहाराच्या गुंत्यातून सुटण्यासाठी परदेशात पलायन केले. त्याच सुमारास भारतामध्ये झालेल्या नोटाबंदीच्या अनुषंगाने लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा थोडा विस्तार करुन लिहिलेली ही काल्पनिका.) --- नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार महान भारतीय अर्थशास्त्री विजय मल्ल्या ऊर्फ मल्ल्यामहर्षी यांनी युरपमधून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांकडे (अ.सं.सं.) गुपचूप गमन (१) केले. सुरक्षिततेच्या कारणास्तव ही बातमी तर गुप्त ठेवण्यात आलीच होती. अणुबॉम्ब निर्मितीच्या ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’च्या वेळी प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ नील्स बोर याला ज्या सफाईने अमेरिकेमध्ये नेण्यात आले होते, त्याच सफाईने हे ऑपरेशन पार पाडण्यात आले. प्रथम एका कार्गो विमानाने मल्ल्यामहर्षींना डलेस … पुढे वाचा »
Labels:
अर्थव्यवस्था,
जिज्ञासानंद,
मनोरंजन,
वक्रोक्ती
रविवार, २६ मार्च, २०२३
राजसा, किती दिसांत...
-
उशीरा केलेल्या आंघोळीदरम्यान पकडलेला Eureka moment... ( लग्नापूर्वी प्रियेसाठी चंद्रावर जाण्यास सिद्ध असलेला प्रियकर नवरा नि बाप झाला की स्नानासाठी मोरीपर्यंत जाण्यासही उत्सुक नसतो. अति झालं म्हणजे त्याची पूर्वीची प्रिया नि आताचं खटलं त्याला निर्वाणीचा इशारा देते.) ( कविवर्य सुरेश भट यांची क्षमा मागून.. .) आंघोळून टाक आज, विसळून अंग अंग राजसा किती दिसांत न्हायला नाहीस सांग त्या तिथे जुन्या खणात, पेंगतो तव गंजिफ्रॉक हाय रे नको तयाचे, झोपेतच होणे दुभंग दूर दूर राहतो बघ, रुसला तुझाच लेक साहवेना त्या जराही, प्राचीन तव देहगंध गार गार या हवेत घेऊनी पंचा समेत मोकळे करून टाक एकवार सर्व अंग काय हा तुझा रे श्वास, दर्प हा इथे भकास बोलावण्यास तुला, उठला पाण्यावरी त… पुढे वाचा »
गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२
श्रावण सजणी श्रावण गं
-
( गीतकार पी. सावळाराम यांची क्षमा मागून) श्रावण सजणी श्रावण गं, पाळिन कधीतरी श्रावण गं ॥धृ.॥ रटरटणारी चिकन-सागुती, फसफसणारे रंगीत पाणी नित्य घालते मला मोहिनी... श्रावऽण*! पातेल्यातील गंधित वारे, पिसाट फिरता जठर उफाळे झरझर वाढीत फिरते रमणी... श्रावऽण! रंगीत पाणी, मादक धुंदी, गात्रीं भरुनी मनात शिरली मोहाचा क्षण, झापड नयनी... श्रावऽण! - गीतकार: पी. रमताराम - oOo - (* हा शब्द टाहो फोडल्यासारखा दु:खार्त उच्चारणे आवश्यक) पुढे वाचा »
शुक्रवार, २२ जुलै, २०२२
आता घरीच तयार करा एक किलो सोने
-
भारतीयांच्या मनात सोने या धातूच्या हव्यासाबाबत 'Why Indians are obsessed with the yellow metal' या शीर्षकाचा एक लेख मध्यंतरी पाहण्यात आला होता. (इंग्रजी भाषेत असल्याने नुसताच पाहिला, वाचू शकलो नाही.). नोटाबंदी काळात मायबाप सरकारने सोने खरेदीसाठी जुन्या नोटा वापरण्याची परवानगी दिल्यावर जणू काही सोनेच स्वस्त झाले असे समजून ज्यांच्याकडे बदलून घेण्यासाठी जुन्या नोटा नव्हत्या ते लोकही चेकबुक नि क्रेडिट कार्ड घेऊन सोने घेण्यास धावले होते. अशा माणसांच्या अडाणीपणाचे मला वाईट वाटले होते. थोडेसे पैसे खर्च करुन हवे तितके सोने ते घरच्या घरीच तयार करु शकत असताना बाजारातून विकत आणण्याचा गाढवपणा का करावा हे मला उमगले नव्हते. तेव्हाच मला विचारले असते तर ही रेसिपी त्यांना देऊन टाकली असती. असो. निदान आता ही सर्वांसाठी खुली करुन भरपूर सोने निर्माण … पुढे वाचा »
शनिवार, २१ मे, २०२२
तांत्रिक आप्पा
-
आप्पा भिंगार्डे (१) एक सत्शील, पापभीरू माणूस. त्यांची बाबा आडवळणीनाथांवर नितांत श्रद्धा. देवघरात बाबांची मानसमूर्ती होती. तिची सकाळ-संध्याकाळ षोडशोपचारे पूजा होत असे. वर्षांतून दोनदा घरी बाबांचा सत्संग असे. आप्पा भिंगार्डे पिढीजात कारकून. त्यामुळे ऑफिसमधून आणलेल्या स्टेशनरीवर दररोज शंभर वेळा बाबांचा जप लिहिला जात असे. पुढे ऑफिस स्टेशनरीच्या अपहाराबद्दल मेमो मिळाले, सस्पेंड झाले, पण त्यांनी आपला नेम सोडला नाही. मागच्या चाळीतील बाबूने सायक्लोस्टाईल का काहीतरी मशीन आणले. त्यावर खते, दस्त यांच्या प्रती काढून देण्याचा व्यवसाय सुरू केला. आप्पांनी ही संधी साधली आणि बाबांच्या एकपानी चरित्राच्या प्रती काढून नाक्यावर उभे राहून येणार्या-जाणार्याला वाटून ते आपली सेवा बाबांच्या चरणी रुजू करु लागले. सामान्यांच्या पत्रसंवादाच्या सोयीसाठी सरकारन… पुढे वाचा »
शनिवार, १० जुलै, २०२१
माध्यमे - ३: मनोरंजन - जुने आणि नवे
-
‘प्रॉफिट ही भगवान है’ « मागील भाग --- माध्यमांवरील या लेखमालेच्या पहिल्या भागात लिहिलेले एक वाक्य इथे संदर्भासाठी पुन्हा उद्धृत करतो आहे दूरदर्शनच्या काळात अतिशय व्यापक असलेले मनोरंजनाचे क्षेत्र ’खपेल ते विकेल’ बाण्याच्या खासगी वाहिन्यांनी ऐतिहासिक-पौराणिक, विनोदी, कौटुंबिक आणि पोलिसी-कथा या चार विषयांत बंदिस्त करुन ठेवले. खरंतर जेव्हा हे ध्यानात आले तेव्हापासूनच मी माध्यमांच्या वाटचालीकडे अधिक बारकाईने पाहू लागलो. पण या निरीक्षणाबाबत थोडे विस्ताराने लिहायला हवे. या चार विषयांपलिकडे असतेच काय?’ असा प्रश्न कदाचित या मनोरंजनाच्या आहारी गेलेल्यांना पडू शकेल. त्यासाठी थोडे मागे जाऊन ’दूरदर्शन’ या सरकारी माध्यमाकडे पाहता येईल. खासगी माध्यमे नव्हती तेव्हा टेलिव्हिजन मनोरंजनावर दूरदर्शनची एकहाती सत्ता होती. त्या वेळी त्यावरुन सादर झालेल्… पुढे वाचा »
रविवार, ४ जुलै, २०२१
माध्यमे - १: खपते ते विकते
-
’इंडियन आयडॉल’ या तथाकथित गुणवत्ता-शोध स्पर्धेबाबत सध्या बरीच उलटसुलट चर्चा चालू आहे. मे महिन्यामध्ये त्यात स्व. किशोरकुमार यांना आदरांजली वाहणारा विशेष भाग सादर झाला. त्यात किशोरकुमार यांचे चिरंजीव आणि गायक अमितकुमार यांना खास पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी या कार्यक्रमातील गायकांचे कौतुक केले होते. पण हा कार्यक्रम संपल्यावर अनेक किशोरप्रेमींनी त्या कार्यक्रमावर टीकेची झोड उठवली. या कार्यक्रमात किशोरदांच्या गाण्यांची पार वाट लावली असा सूर अनेक किशोरप्रेमींनी लावला. परीक्षक म्हणून बसलेल्या नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि अनु मलिक यांच्यावर टीकेची झोड उठली. स्वत: अमितकुमार तिथे उपस्थित असून त्यांनी याबाबत स्पष्टपणे न बोलता, उलट सुमार गायन नि गायकांची प्रशंसा केल्याबद्दल लोकांनी त्य… पुढे वाचा »
Labels:
‘अक्षरनामा’,
जिज्ञासानंद,
मनोरंजन,
माध्यमे,
समाजमाध्यमे
रविवार, १७ जानेवारी, २०२१
चर्चा अजून संपलेली नाही...
-
चार वर्षांपूर्वी अमेरिकन सत्तांतराच्या वेळी लिहिलेली फेसबुकवर लिहिलेली पोस्ट. या आठवड्यात ट्रम्प पाय उतार होऊन बायडेन सत्तारुढ होत असताना पुन्हा एकवार वाचू. --- पोस्ट: या महिनाअखेर डेमोक्रॅटिक पार्टीचे ओबामा अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार होऊन रिपब्लिकन ट्रम्प अधिकारारूढ होणार आहेत. या निमित्ताने गेल्या आठ वर्षातील ओबामांच्या कार्याचा लेखाजोखा आणि ट्रम्प यांच्याकडून अपेक्षा याबाबत भारतीय तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. त्याबाबत आपणही आपली मते तपासून पाहू. प्रतिसाद १: मि. ओबामा आणि मि. ट्रम्प असे न लिहिता तुम्ही नुसतीच नावे लिहून आपला असंस्कृतपणा दाखवला आहे. ते दोघे काय तुमचे लंगोटीयार आहेत का? प्रतिसाद २: दोघांच्या पक्षांची नावे लिहून तुम्ही नक्की काय सुचवत आहात. प्रतिसाद ३: आपल्या देशातील … पुढे वाचा »
शुक्रवार, २४ जुलै, २०२०
त्याला खुर्ची आवडते
-
https://seenpng.com/ येथून साभार. ( कवी सौमित्र यांची क्षमा मागून) ह्याला खुर्ची आवडते, त्याला खुर्ची आवडते आघाडीत विसंवाद झाला की मन म्हणते, ’आधीच खुर्ची माझ्यापासून फार दूर नाही, सत्तेचं ह्याचं गणित खरंच मला कळत नाही.’ खुर्ची म्हणजे ऊब सारी, खुर्ची म्हणजे परिमळ खुर्चीविना राहायचे म्हणजे व्हायची नुसती परवड म्हणे- खुर्ची नियत खराब करते, खुर्ची जबाबदारी पण खुर्चीसोबत मिळते ना चोख जहागिरदारी खुर्ची करी आपली कामे, खुर्ची म्हणजे सर्व सुखात गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं केंद्रात. दरमहा संधी येते, दरमहा असं होतं खुर्चीवरुन निसटून पडून लोकांमध्ये हसं होतं हा आवडत नसला तरी खुर्ची त्याला आवडते ह्याने लवकर सोडावी म्हणून तो ही झगडतो रूसू… पुढे वाचा »
शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०
फेसबुक फुटकळांचा फळा
-
फेसबुक फुटकळांचा फळा काहीही खरडा आणि पळा म्हणती आम्हां कळवळा सकलांचा बालकांपायी घुंगुरवाळा माकडांहाती खुळखुळा पोस्ट-धार सोडे फळफळा खरासम विरेचक होई सकळां जरी बुद्धीने पांगळा तुंबला असे, मोकळा सहजची बुद्धिमांद्याची कळा कळकटांची चित्कळा घेई तज्ज्ञाचीही शाळा मूढ बाळ ररा म्हणे, हा वगळा विखारबुद्धी बावळा उच्छिष्टावरी कावळा भासतसे - रमताराम - oOo - पुढे वाचा »
सोमवार, १६ डिसेंबर, २०१९
कथा विकासाच्या कांद्याची
-
परवा सकाळी एका मित्राबरोबर चुलत-मित्राकडे (त्याचा मित्र) जाण्याचा योग आला. घरी पोचलो तेव्हा त्याच्या पत्नीने सांगितले की साहेब पूजाघरात आहेत. इतक्यात आतून ’आतच या’ असा निरोप आला. आत पोचलो तेव्हा साहेब हात जोडोनि देव्हार्यासमोर बसले होते. ’घ्या दर्शन घ्या’ अशी ऑफर आली. मित्राने हात जोडून नमस्कार केला. मी आपला आपद्धर्म म्हणून हात जोडण्यापूर्वी देव्हार्यात डोकावले नि दचकलोच. तिथे चक्क एक अंडे ठेवले होते. मी बुचकळ्यात पडलो. माझी अवस्था पाहून "मला वाटलेच होते, तुम्हाला आश्चर्य वाटणार म्हणून." चुलत-मित्र विजयी मुद्रेने म्हणाला. "अंड्याची पूजा? कशासाठी?" मी शंकेखोरपणे विचारले. "मी ज्युरासिक पार्क उभे करणार आहे." चुलत-मित्र सिक्रेट सांगताना वापरतात तशा मंद्रसप्तकातील षड्जाला आधारस्वर करुन बोलिला. माझी अवस्था तेल… पुढे वाचा »
गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९
ड्रायविंग सीट
-
निवडणुका संपल्या होत्या... सरकार-स्थापनेची दंगल सुरु होण्यापूर्वी, निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपाने निर्माण झालेली कटुता पुसून काढावी, भाषणे करुन आणि प्रचारातील दगदगीतून थोडा विसावा मिळावा, म्हणून काही सर्वपक्षीय नेते एका एअर-कंडिशन्ड मिनी-बसने के.डी. शिवकुमार यांच्या रिसॉर्टकडे निघाले होते. मुंबईहून पुणे, सातारा, कोल्हापूर, मग वळून कोकण असे करत एक एक नेत्याला घेत हा ’गरीब-रथ’ पुढे चालला होता. तेवढ्यात या ’श्रमपरिहार-यात्रे’त सहभागी होऊ न शकलेल्या विदर्भ नि मराठवाड्यातल्या एक-दोन नेत्यांचे, ’तुम्ही पुण्या-मुंबईवाल्यांचे नेहमी असेच असते. आम्हाला मुंबईला यायला लावता. आम्हाला डावलता.’ अशा तक्रारी करणारे फोन आले होते. उजवीकडील सर्वात पुढच्या बाकावर भाजपच्या नेत्याशेजारी सेनेचा नेता बसला हो… पुढे वाचा »
Labels:
‘द वायर मराठी’,
अन्योक्ती,
कथा,
जिज्ञासानंद,
मनोरंजन,
साहित्य-कला
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)