-
या वर्षी मे महिन्यामध्ये ’धर्मवीर’ नावाचा चित्रपट चित्रपटगृहातून प्रदर्शित झाला. विषयाचा विचार करत त्यात हिंदुत्ववादी मंडळींनी त्याला अधिक उचलून धरले हे ओघाने आलेच. त्यांच्यासह इतरांनीही सध्या आलेल्या चरित्रपटांच्या लाटेतील एक चित्रपट इतकेच महत्त्व त्याला दिले. परंतु त्या चित्रपटाचे उद्दिष्ट केवळ मनोरंजन नव्हते किंवा राष्ट्रभक्ती वा धर्मभक्तीच्या प्रचारपटांच्या सध्याच्या प्रवाहाचा तो केवळ एक भागच होता असेही नाही. त्या पलिकडे त्या चित्रपटाला आणखी मोठे उद्दिष्ट साध्य करायचे होते. त्या चित्रपटाचे निर्माते, धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य म्हणवणार्या एकनाथ शिंदे यांनी या चित्रपटाद्वारे त्यांच्या नव्या राजकीय प्रवासाचा नारळ फोडला होता हे पुढे स्पष्ट झाले. एखाद्याचा वारसा सांगत आपली वाट सुकर करणे, बस्तान बसवणे याला मानवी इतिहासात खूप मोठी परंपरा… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
‘द वायर मराठी’ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
‘द वायर मराठी’ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बुधवार, २० जुलै, २०२२
‘तो देव, मी त्याचा प्रेषित’ : मानवी संस्कृतीचा उदयकाळ आणि अर्वाचीन राजकारण
शनिवार, २ जुलै, २०२२
फडणवीसांची बखर - ४ : मी पुन्हा आलो पण...
-
यापूर्वीचे भाग : « फडणवीसांची बखर – १ : भाजप नेतृत्वाचा प्रवास « फडणवीसांची बखर – २ : नवा साहेब « फडणवीसांची बखर – ३ : मी पुन्हा जाईन --- डिसेंबर २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर सत्तासंघर्ष जोरावर असताना 'द वायर-मराठी’मध्येच तीन दीर्घ भागांत ’फडणवीसांची बखर’ लिहिली होती. २००९ पूर्वी आमदारही नसलेले फडणवीस २०१४ मध्ये मोदींच्या कृपाहस्ताने थेट मुख्यमंत्रीपदावर आरुढ झाले होते. पाच वर्षे यशस्वीपणे मुख्यमंत्री पदावर राहून २०१९ मधील विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. या पाच वर्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षाला पुरते नामोहरम करतानाच, सहकारी पक्ष असलेल्या सेनेला त्यांच्या आमदारसंख्येच्या तुलनेत संख्येने नि महत्वाने कमी मंत्रिपदे घ्यायला भाग पाडून त्यांनी आपली पकड मजब… पुढे वाचा »
Labels:
‘द वायर मराठी’,
भाष्य,
राजकारण,
विश्लेषण,
सत्ताकारण
सोमवार, २० जून, २०२२
बिटविन द डेव्हिल अँड द डीप सी
-
तीन-चार महिन्यांपूर्वी हिजाबचा मुद्दा तापवला जात होता, तेव्हा पुरोगामी विचारांच्या मंडळींची चांगलीच कोंडी झाली होती. ’हिजाब घालण्याचे स्वातंत्र्य’ यात स्वातंत्र्य हे मूल्य आहे म्हणून ती बाजू घ्यावी, तर हिजाबसारख्या मागास पद्धतीची भलापण केल्याचे पाप पदरी पडते. आणि हिजाब विरोधकांचे म्हणणे योग्य म्हणावे, तर एका समाजाबाहेरच्या गटाने त्या समाजावर लादलेल्या निर्णयाचे समर्थन केल्याचे ( आणि व्यक्ति-स्वातंत्र्याला विरोध केल्याचे ) पाप पदरी पडते . आज ’अग्निपथ’ योजनेच्या निमित्ताने देशभरात ज्या घडामोडी चालू आहेत, त्यांनी साधकबाधक विचार करणार्यांची पुन्हा एकवार कोंडी केली आहे. ’तुम्ही आमच्या बाजूचे की विरोधकांच्या?’ हा एक प्रश्न, आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी सार्या जगालाच दिलेली ’तुम्ही आमच्या बाजूचे नसाल तर दहशतवाद्यांच्या… पुढे वाचा »
सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२
अखंड-हिंदुस्तानचे स्वप्न आणि वास्तवातील प्रश्न
-
’अखंड-हिंदुस्तान’ नावाचा घोष हा अगदी लहानपणापासून ऐकत आलेला विनोद वा बागुलबुवा आहे. मुळात ’देशाची फाळणी कुणाच्या तरी लहरीखातर वा मूर्खपणामुळे झाली, एरवी तो आमचा भागच आहे’ हा दावाच खरंतर मूर्खपणाचा असतो. देश म्हणजे जमिनीचा तुकडा नव्हे. देश म्हणजे त्यातील माणसे, समाज, वारसा, इतिहास यांचा समुच्चय . ’पाकिस्तानही आमचाच आहे आणि तो परत आमच्या देशात सामील व्हावा’ म्हणताना त्यावर राहणार्या, आपल्याला नकोशा वाटणार्या माणसांचे काय करायचे? असा प्रश्न ’अखंड-हिंदुस्तान’वाल्या मुखंडांनी स्वत:ला विचारायला हवा. हा अवघड प्रश्न ते स्वत:ला विचारत नसतात, कारण उत्तर आपल्या सोयीचे येणार नाही, हे निदान त्यांतील विचारशील व्यक्तींना पक्के ठाऊक असते. कुण्या एकाचा वा कुण्या सत्तेच्या लहरीखातर फाळणी होत नसत… पुढे वाचा »
मंगळवार, ६ एप्रिल, २०२१
लॉकडाऊनची धुळवड
-
गेल्या वर्षी पहिला लॉकडाऊनमधील बंधने टप्प्या-टप्प्याने सैल करत दैनंदिन जीवन हळूहळू पूर्वपदावर येत होते. एक-दोन महिन्यात पुन्हा संसर्गाने उचल खाल्ली असता पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली. त्यावर पुण्यातील व्यापारी संघाचे अध्यक्ष म्हणाले, ’लॉकडाऊनमुळे काहीही फायदा झालेला नाही, कोरोना वाढतोच आहे.’ इतके ठाम विधान ऐकून मला हसू आले होते. अर्थात उलट दिशेने ’वा: लॉकडाऊनचा खूप फायदा झाला बघा’ म्हणून कुणी प्रत्युत्तर दिले असते तरी मला त्या ठामपणाचेही हसू आलेच असते. याचे कारण म्हणजे फायदा झाला नाही म्हणणारे ’नाही रे’ लोक किंवा झाला म्हणणारे ’आहे रे’ लोक हे दोघेही त्यांच्या पूर्वग्रह आणि मुख्य म्हणजे स्वार्थाच्या आधारे ’ठोकून देतो ऐसा जी’ करत असतात. त्या विधानांमागे माहिती, डेटा, विश्लेषण वा मूल्यमापनाचा भाग नसतो . … पुढे वाचा »
सोमवार, १ जून, २०२०
बेगिन, बालाकोट, बुश आणि अंधारातील अधेली
-
७ जून १९८१ रोजी इस्रायलने इराकवरील ’ओसिरॅक’ अणुभट्टीवर हल्ला करुन ती उध्वस्त केल्याचे जाहीर केले. ’या अणुभट्टीमध्ये अण्वस्त्रांना आवश्यक असणारे इंधन बनवले जात आहे’ असा इस्रायलने आरोप केला होता. ’भविष्यात एक अण्वस्त्रसज्ज शेजारी निर्माण झाल्याने आमच्या राष्ट्राचे सार्वभौमत्व धोक्यात येईल. त्याविरोधात ’pre-emptive strike करण्यात आला, धोक्याला अंकुर फुटताच आम्ही तो खुडून टाकला’ असा दावा इस्रायलने केला. या हल्ल्याला ’ऑपरेशन ऑपेरा’ असे नाव देण्यात आले होते. या हल्ल्यामध्ये ही ’अणुभट्टी उध्वस्त केली’ असे इस्रायलने जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात तिचे बाह्य नुकसानच झाले होते. गाभ्याला फारसा धक्का लागला नव्हता. ती उभारणार्या फ्रेंच तंत्रज्ञांनी नंतर तिची डागडुजी करुन ती पुन्हा कार्यान्वित केली. याच धर्तीवर पुढे २००३ मध्ये असंख्य संहारक अस्त… पुढे वाचा »
Labels:
‘द वायर मराठी’,
आंतरराष्ट्रीय,
इतिहास,
जिज्ञासानंद,
राजकारण,
सत्ताकारण
मंगळवार, ७ एप्रिल, २०२०
अजा पुत्रो बलिं दद्यात्
-
२०१४ मध्ये अजस्र पुतळे उभारण्याची अहमहमिका चालू झाली. पुढे एकदोन वर्षांनी एका चर्चेदरम्यान एका पुतळ्यावर केलेल्या खर्चात जनहिताची काय काय कामे करता येतील याबाबत विश्लेषण करत असताना एका पुतळासमर्थकाने ’आम्ही हे ही करु नि ते ही करु.’ असा दावा केला होता. पण सरकारी मालकीच्या कंपन्या विकून सरकारला पैसा उभा करावा लागत असताना हे जास्तीचे पैसे आणणार कुठून या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हते. काही महिन्यांपूर्वी एका कॉम्रेडशी झालेल्या चर्चेदरम्यान कम्युनिस्ट व्यवस्थेमध्ये ’सर्वांना हवे ते करता येईल, हवे ते मिळेल’ या दाव्यावर ’पुरवठा पुरेसा असेल तर हे शक्य आहे. तो अपुरा असला की प्राधान्यक्रम लावून काहींना नाराज करावेच लागेल.’असा आक्षेप नोंदवला होता. त्यावरचे अप्रत्यक्ष उत्तर ’माणसे फार गरजा वाढवून ठेवतात, त्या मर्यादित ठेवल्या की पुरवठा नेहमीच प… पुढे वाचा »
Labels:
‘द वायर मराठी’,
अर्थकारण,
आंतरराष्ट्रीय,
आरोग्यव्यवस्था,
कोरोना,
जिज्ञासानंद
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)






