Vechit Marquee

सूची: अनुक्रमे ▶ वर्गीकरण ▶ लेखमाला ▶ लक्षवेधी ◼
राजकारण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकारण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १२ जानेवारी, २०२६

me me me me meme(१), इलेक्शन वाले meme


  • साडेतीन-चार वर्षांपासून महाराष्ट्राने पक्षांतराच्या राजकारणात तळ गाठून आजवर हिणवलेल्या उत्तर भारतासमोर आपली लाज घालवली आहे. सध्या जवळजवळ नऊ वर्षांनी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरु आहे. इतकी वर्षे तुंबलेली अनेकांची राजकीय लालसा फसफसून वाहू लागलेली आहे. निलाजर्‍या राजकारणाचा हा चिखल शरम येईल इतका चिवडला जातो आहे. याची ना राजकारण्यांना लाज आहे ना ‘आपला पक्ष जिंकला ना, मग बास’ या मानसिकतेच्या मतदारांनाही. या सार्‍या विषण्ण करणार्‍या परिस्थितीवर कडवट हसून पुढे सरकण्याखेरीज सुज्ञांच्या हाती काही उरलेले नाही. काही दिवसांपूर्वी संगणकावरील इमेजेस पाहाताना एक-दोन चित्रांत निवडणूक-भाष्य चमकून गेले. पाहाता पाहात चोवीस तासांत तीस-एक मीम्स तयार झाली. त्यांची संगतवार मांडणी करताना दिसलेली छिद्रे भरून काढणार्‍या काही मीम्सची भर घालून त्यांना इथे एकत्रितरित्या मांडले आहे. - oOo- (१) चाल: https://www.youtube.com/watch?v=miuvtPz79Rs

    पुढे वाचा »

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

निवडणुका, प्रातिनिधित्व: अमेरिका आणि भारत


  • मागील आठवडाभर आमच्यासारख्या मूठभरांचं लक्ष न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीकडे होते. आपण ‘डेमोक्रॅटिक सोशलिस्ट’ असल्याचा दावा करणारे जोहराम ममदानी मोठ्या फरकाने निवडून आले. कुणी त्याला भारतीय वंशाचा म्हणवत ताट-वाटी घेऊन त्याने रांधलेल्या यशाचा एक तुकडा आपल्या पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न केला. कुणी ‘डेमोक्रॅटिक’ का होईना सोशलिस्ट आहे ना’ म्हणत विळा-कोयता उंच केला. मोकाट भांडवलशाहीचे आगर असलेल्या अमेरिकेच्या आर्थिक राजधानीमध्ये तिचे नाक कापल्याचा आसुरी आनंद आमच्यासारख्यां रिकामटेकड्यांना झाला... इस्रायलने मध्यपूर्वेत एक मुस्लिम मारला की आपल्याकडे काहींना होतो अगदी तसा. कुणी नुसताच आनंद व्यक्त केला, कुणी ‘तेव्हा कसे... आता का...’ हा भारताचा राष्ट्रीय तर्क वापरुन आपली हिणवत्ता सिद्ध केली. पण या सगळ्या कल्लोळामध्ये काही तपशील पाहायचे आपण विसरुन गेलो. ममदानी लढवत असलेल्या निवडणुकीत किमान सात उमेदवार रिंगणात होते. ममदानी विविध ठिकाणी प्रत्यक्ष वा व्हिडिओद्वारे मतासाठी आवाहन करत होते. या आवाहनामध्ये ते स्वत:ला मत तर मागत होतेच, पण त्या...

    पुढे वाचा »

रविवार, २ नोव्हेंबर, २०२५

ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - २ : ट्रम्प आणि इस्रायल


  • भाग - १ « मागील भाग --- व्यवसायातील नफा वाढवायचा असेल, तर ‘वेतन-खर्च कमी करणे’ हा भांडवलशाहीतील हुकमी मार्ग आहे. आठ वर्षांत आपल्या कर्मचार्‍यांना जेमतेम एक टक्का वेतनवाढ दिल्याबद्दल बोईंगच्या सीईओला अमेरिकन सेनेट कमिटी सदस्यांनी धारेवर धरल्याचा एक व्हिडिओ यू-ट्यूबवर सापडेल. याचबरोबर इतर सुरक्षा नियम धाब्यावर बसवून, प्रवासी नि कर्मचारी यांचा जीवही धोक्यात घालून, कंपनीचा नफा वाढवण्याचे नव-नवे मार्ग त्याने शोधले. याबद्दल बक्षीस म्हणून त्याला एकाच वर्षांत ४५% इतकी घसघशीत वाढ देऊन, ३.३ कोटी डॉलर्स(!) इतके वार्षिक वेतन कंपनीच्या संचालक मंडळाने देऊ केले. कट्टर भांडवलशाहीसमर्थक अमेरिकेत अजिबात न शोभणारे याचे निदान त्याची झाडाझडती घेणार्‍यांपैकी एका सेनेटरने केले. तो म्हणाला, ‘मि. सीईओ, तुम्हाला कंपनीच्या हिताच्या आड येणारी समस्या शोधायची खटपट करायची गरज नाही. ती समस्या तुम्हीच आहात.’ alJazeera.com येथून साभार. जेव्हा राजकारणी हेच उद्योजकही असतात, तेव्हा ते व्यावसायिक यशाचे उपाय शासनव्यवस्थेतही अंमलात आणू लागतात. ट्रम्प यांच्यासाठी...

    पुढे वाचा »

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - १ : अमेरिकेमध्ये ट्रम्प


  • बहुप्रतीक्षित नोबेल शांतता पुरस्कार अखेर जाहीर झाला. सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या विरोधक असलेल्या, ‘आपल्या देशात अमेरिकेने लष्करी हस्तक्षेप करावा’ अशी मागणी करणार्‍या आणि जगभरात सर्वाधिक खनिज तेलाचे साठे असलेल्या त्या देशातील ते साठे भांडवलदारांच्या ओटीत टाकण्यास उत्सुक असणार्‍या, व्हेनेझुएलाच्या मारिया मच्याडो यांच्या पदरात हा पुरस्कार पडला. मच्याडो यांचा राजकीय दृष्टीकोन शांततावादी मुळीच नाही. नोबेल शांतता कमिटीने बहुधा ‘समाजवाद नि समाजवादी विरोधक = शांततावादी’ ही सोपी व्याख्या स्वीकारली असावी. विध्वंसाचे हत्यार असलेल्या डायनामाईटच्या विक्रीतून अमाप पैसा केलेल्या नोबेलने हा पुरस्कार ठेवलेला असल्याने अंतर्विरोध हा त्याचा स्थायीभाव असा पुन्हा-पुन्हा दिसतो. पण मच्याडोंना हा पुरस्कार मिळाला यापेक्षा, ‘मी आठ युद्ध थांबवली, मला नोबेल शांतता पुरस्कार द्या’ असं निर्लज्जपणे म्हणत देशोदेशी हिंडणार्‍या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पना अखेर नोबेल कमिटीने ठेंगा दाखवला याची चर्चा अधिक झाली. ट्रम्प यांचा स्वभाव पाहाता यांच्या यशापाठीमागे आपणच असल्याचा दावा अजूनही करु शकतात. मारिया यांनी आपला हा...

    पुढे वाचा »

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

अर्ध्यावरती डाव मोडला...


  • (कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या चरणी हे विडंबन सादर...) भातुकलीच्या खेळामधलीं तात्या आणिक कोणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥ तात्या वदला, “मला न कळली, शब्दांविण तव-भाषा घरी पोचतां, पुसिन तेथील, धुरकटलेल्या कोषा (१) ” का कमळीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी ? ॥१॥ कमळी वदली बघत एकटक लाल-लाल तो तारा “उद्या पहाटे दुसर्‍या वाटा, तिज्या गावचा वारा” पण तात्याला उशिरा कळली, गूढ अटळ ही वाणी ॥२॥ तिला विचारी तात्या, “का हे हात असे सोडावे ? त्या दैत्याने माझ्याआधी, तूंस असे कवळावे ?” या प्रश्नाला उत्तर नव्हते, कमळी लाजिरवाणी ॥३॥ का कमळीचे तुटले दावे (२) , आज दूर जाताना ? का तात्याचा डाव गंडला, ‘कर’पाशी (२) चुरताना? भ्रमरासम ती उडून गेली, भुलुनी लाल-फुलांनी ॥४॥ - रमताराम --- (१). शब्दकोष (२). या दोनही ठिकाणी श्लेषावर ध्यान असू द्या. ...

    पुढे वाचा »

गुरुवार, २९ मे, २०२५

मूषकान्योक्ती


  • १. सारी धुमश्चक्री संपली. सारे आवाज शांत झाले. थोडा वेळ गेला नि मूषकराज न्हाणीघराच्या बिळातून बाहेर डोकावता झाला. त्याने कानोसा घेतला. घरात शांतता असल्याची खात्री झाल्यावर तो बाहेर आला. तेथून तो माजघरात प्रवेश करता झाला. कानोसा घेऊन घरची स्त्री तिथे नसल्याची खात्री करुन घेतली. मग तो ओट्यावर चढला. त्याच्यासमोरील खिडकीतून बाहेर डोकावला. घरात नि घराबाहेर मघाशी झालेल्या हाणामारीतील जखमी मंडळी परसात नि मागच्या वाडीमध्ये दिसत होती. त्यांची तावातावाने काही चर्चा चालू होती. इतक्या दूरवरुन त्यातील तपशील ऐकू येत नव्हता. मूषकराज वैतागला. त्याने मागचे दार आतून बंद असल्याची खात्री करुन घेतली नि मग तो खिडकीच्या एका गजावर उभा राहिला. त्या सार्‍यांना दरडावणारे एक जोरदार भाषण त्याने ठोकले. पण खाली त्याच्या बिळातील पोराबाळांनाही केवळ किचकिचाट ऐकू आला. भाषण उरकून मूषकहृदयसम्राट पुन्हा आपल्या बिळात थाटात प्रवेशकर्ते झाले. बिळातून बाहेर येण्याचीही तसदी न घेतलेल्या त्याच्या पोराबाळांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले. २. रात्र पड...

    पुढे वाचा »

सोमवार, ७ एप्रिल, २०२५

दिशाभुलीचे गणित


  • अध्यक्षीय निवडणुकीतील प्रचारा-दरम्यान आणि निवडून आल्यानंतरही बर्‍याच देशांना ‘धडा शिकवण्या’चा मनसुभा ट्रम्प यांनी वारंवार बोलून दाखवला होता. ‘हे देश अमेरिकेकडून आयात होणार्‍या मालावर अवाच्या सवा कर आकारतात; त्या तुलनेत अमेरिकेत त्यांच्याकडून आयात मालावर बराच कमी कर आकारला जातो. यातून त्या देशांतील निर्यातदारांना अधिक फायदा होतो आहे आणि पर्यायाने अमेरिका नि त्या देशांत होणार्‍या व्यापारामध्ये अमेरिकेचे नुकसान होते आहे’ अशी त्यांची तक्रार होती. ‘मी यावर तोडगा काढेन, अमेरिकेवर अन्याय करणार्‍या या देशांना धडा शिकवेन’ असे आश्वासन ते देत होतो. सामान्य नागरिकांना ‘तुमच्यावर अन्याय होतो आहे’, ‘तुमचे हित धोक्यात आहे’, ‘याला बाहेरचे लोक जबाबदार आहेत’, ’मी हा अन्याय झटक्यात दूर करेन’ अशा घोषणा आवडतात. आपल्या दुरवस्थेला इतर कुणीतरी– विशेषत: आपल्या टोळीबाहेरचे लोक जबाबदार आहेत ही अतिशय सोयीची भूमिका त्यांना आवडत असते. समाजात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली, की अशा वल्गना करणार्‍यांकडे सामान्य लोक आशेने पाहू लागतात. माणसाला बाहुबलाचे आकर्षण अजूनही आहे, कारण त्याच्यामध्ये टोळीभावना अजून जिवंत आह...

    पुढे वाचा »

मंगळवार, १८ मार्च, २०२५

वांझ राहा रे


  • (कालच्या नागपूर दंगलीच्या निमित्ताने...) हे जे काही भयंकर घडते आहे ते ‘त्यांच्यामुळे’ यावर समस्तांचे एकमत झाले... . . ... प्रत्येकाच्या मनात ‘ते’ कोण याची व्याख्या वेगळी होती इतकंच. कुणी म्हणाले हे मुस्लिमांचे पाप (आणि रमताराम अर्बन नक्षल आहेत) कुणी म्हणाले हे हिंदुत्ववाद्यांचे पाप (आणि रमताराम छुपे संघी आहेत) कुणी म्हणाले हे बामणांचे पाप (आणि रमताराम मनुवादी आहेत) कुणी म्हणाले हे फ्रस्ट्रेटेड बहुजनांचे पाप (आणि रमताराम ब्रिगेडी आहेत) कुणी म्हणाले हे पुरोगाम्यांचे पाप (आणि रमताराम अंधभक्त आहेत) कुणी म्हणाले, हे मध्यमवर्गीयांचे पाप (आणि रमताराम वर्गद्रोही आहेत) --- रमताराम म्हणाले: Photo by Maan Limburg on Unsplash तुमच्या बीजातच विष आहे! वांझ राहा रे, वांझ राहा. तुमच्या मेंदूतून, भुजांतून, आणि ज्याच्याभोवती तुमच्या सुखाच्या सार्‍या कल्पना घोटाळत राहातात, एकशेचाळीस कोटींच्या देशातील तुम्ही ज्याला एकमेव उत्पादक अवयव मानता, त्या जननेंद्रियांतूनही उगवलेल्या, पसरलेल्या मानवी विषवृक्षाच्या फांद्या, मुळ्या ...

    पुढे वाचा »

बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

‘ग्लॅड फॉर ग्लाड?’ : ग्लाड, वीरभूषण आणि मी


  • (‘थँक यू, मि. ग्लाड’ या अनिल बर्वे लिखित कादंबरी/नाटक यांबाबत विवेचन करणारे दोन लेख ‘वेचित चाललो’ वर लिहिले होते. विषयसंगतीनुसार काही तपशील वगळून हा मजकूर एकत्रितरित्या ‘तत्रैव’ नियतकालिकाच्या नोव्हेंबर-डिसेंबर-२०२४ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.) पुस्तक : ‘थॅंक यू, मिस्टर ग्लाड’ लेखक : अनिल बर्वे प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन आवृत्ती सहावी, दुसरे पुनर्मुद्रण (२०२०) —काही झाले तरी ग्लाडसाहेबांची राजनिष्ठा मोठी कडवी होती हे खरे. प्राण गेला तरी साहेब खाल्ल्या मिठाला जागल्याशिवाय राहिला नसता. बेचाळीसच्या चळवळीत हाती सापडलेल्या सत्याग्रह्यांना कारणे शोधून शोधून ग्लाडसाहेबाने गुरासारखे बडवून काढले होते. पण युनियन जॅक उतरून तिरंगा वर चढला, तेव्हा ग्लाडसाहेबाने दु:ख आवरून एक कडक सॅल्यूट ठोकला नि आपली सेवा तिरंग्याला रुजू केली. ग्लाडसाहेबांची जेवढी निष्ठा फिरंग्याला होती तेवढीच आता तिरंग्याला होती... (पान ७). ... नक्षलवादी चळवळीचा वाढता जोर पाहून साहेबाच्या उरात धडकी भरे. भारतात खरेच ‘कम्युनिस्ट रेव्होल्यूशन’ होणार असे त...

    पुढे वाचा »

शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

दोन बोक्यांनी...


  • AI-Generated Image for this article (Courtesy: deepai.org) फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे... एक लहानसं गाव होतं. गावाचं नाव होतं... पण ते नावाचं जाऊ द्या. ते महत्त्वाचं नाही, कुठल्याही गावासारखं ते एक गाव होतं. गावात शेत कसणारे कुणबी होते, नांगर ओतणारे लोहार होते, चपला बांधणारे चांभार होते, मडकी घडवणारे कुंभार होते, घाणा चालवणारे तेली होते... या सार्‍यांवर राज्य करणारे पाटील होते, त्यांच्या मदतीला कुलकर्णी होते. शाळा चुकवणारी पोरे होती, पारावरची पाले होती; नदीवरची धुणी होती, चोरट्या प्रेमाची कहाणी होती. कुठे कुणाचे दाजी होते, कुठे कुणाचे ‘माजी’ होते; काही काही पाजी होते, बाकी उडदामाजि होते... गावाच्या गरजा मर्यादित होत्या. अन्नाची गरज शेती व गावालगतचे जंगल यांतून भागत असे. इतर किरकोळ गरजा भागवण्यास गावात महिन्यातून दोनदा एक व्यापारी येई. त्याचं नाव पुरुषोत्तमभाई. गावात न मिळणार्‍या वस्तू घेऊन येई, त्याच्या बदल्यात चोख दाम मोजून घेई. कुणाला पैशाचीच नड असेल, तर पुरुषोत्तमभाई त्यांच्याकडचे किडुकमिडुक विकत घेई नि त्या बदल्यात त्या ...

    पुढे वाचा »