-
पुणे विद्यापीठ हे ‘गव्हर्नर हाऊस’ असण्याच्या काळात मुख्य इमारतीच्या बरोबर समोर, कुण्या ब्रिटिश साहेबाचा ऐसपैस डायनिंग हॉल होता, भक्कम दगडी बांधकामातला. काही शतकांपूर्वी मी पुणे विद्यापीठात शिकत असताना तिथे ‘ओल्ड कॅन्टिन’ या नावाने ओळखले जाणारे एक कॅन्टिन चालवले जात असे. घरचे जेवण नसेल तर कधीमधी दुपारच्या जेवणासाठी, आणि एरवी चहापानासाठी, तिथे फेरी होत असे. तिथे एक पोरसवदा वेटर होता. तो सदैव घाईत असे. एखाद्या टेबलपाशी ऑर्डर घेण्यास पोहोचला, म्हणून टेबलवरील दोघे-चौघे एकमेकाला विचारून ऑर्डर त्याला सांगेपर्यंत तो लगेच भटारखान्याकडे तरी पळे किंवा दुसर्या टेबलकडे तरी. सोशल मीडियावर यथेच्छ टाईमपास करुन काही कामासाठी किंवा ज्येष्ठ नागरिक आई-वडिलांसाठी वेळ द्यायचा म्हटले, हटकून ‘आयॅम किनी सो बिज्जी बाबा. इतरांसोबत इतर कामांना म्हणजे बघा, टाईमंच म… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
अर्थव्यवस्था लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
अर्थव्यवस्था लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शनिवार, ७ जून, २०२५
चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही
शनिवार, १९ एप्रिल, २०२५
हट्टमालाच्या पल्याड... ज्याचा त्याचा युटोपिया!
-
कित्येक वर्षांपूर्वी अमोल पालेकरांनी साजर्या केलेल्या ‘बादल सरकार महोत्सवा’च्या सीडीज मिळाल्या होत्या. त्यात ‘हट्टमालार आपोरे’ या शीर्षकाचे नाटक पाहण्यात आले होते. त्याचा तपशील इतक्या वर्षांनी विस्मरणात गेला असला तरी, ‘चलन/पैसा या संकल्पनेवर हलकेफुलके भाष्य करणारे नाटक’ आहे इतपतच ध्यानात होते. काल पुन्हा एकवार त्याचा प्रयोग पाहिला नि डोक्यात उजेड पडला. काही काळापूर्वी कॉ. दत्ता देसाईंशी तीन दिवस गप्पांचा कार्यक्रम आम्ही केला होता. त्यात मार्क्सला अपेक्षित समाजव्यवस्थेवर बोलणे झाले होते. त्याच्या मते खासगी मालमत्ता ही संकल्पना रद्दबातल केली की, माणसाला आज करावे लागते तसे ऊर फुटेतो काम करावे लागणार नाही. अन्न, वस्त्र, निवास यांची हमी व्यवस्थेनेचे घेतली, तर त्याला त्या व्यवस्थेप्रती आपल… पुढे वाचा »
सोमवार, ७ एप्रिल, २०२५
दिशाभुलीचे गणित
-
अध्यक्षीय निवडणुकीतील प्रचारा-दरम्यान आणि निवडून आल्यानंतरही बर्याच देशांना ‘धडा शिकवण्या’चा मनसुभा ट्रम्प यांनी वारंवार बोलून दाखवला होता. ‘हे देश अमेरिकेकडून आयात होणार्या मालावर अवाच्या सवा कर आकारतात; त्या तुलनेत अमेरिकेत त्यांच्याकडून आयात मालावर बराच कमी कर आकारला जातो. यातून त्या देशांतील निर्यातदारांना अधिक फायदा होतो आहे आणि पर्यायाने अमेरिका नि त्या देशांत होणार्या व्यापारामध्ये अमेरिकेचे नुकसान होते आहे’ अशी त्यांची तक्रार होती. ‘मी यावर तोडगा काढेन, अमेरिकेवर अन्याय करणार्या या देशांना धडा शिकवेन’ असे आश्वासन ते देत होतो. सामान्य नागरिकांना ‘तुमच्यावर अन्याय होतो आहे’, ‘तुमचे हित धोक्यात आहे’, ‘याला बाहेरचे लोक जबाबदार आहेत’, ’मी हा अन्याय झटक्यात दूर करेन’ अशा घोषणा आवडतात. आपल्या दुरवस्थेला इतर कुणीतरी– विशेषत: आपल्य… पुढे वाचा »
शनिवार, २९ मार्च, २०२५
अमेझिंग अॅमेझॉन
-
(कथा, प्रसंग नि एक पात्र काल्पनिक असले तरी अनुभव वास्तव आहे.) काल घरातील ‘धुलाई निर्जंतुकीकरण द्रव्य’ (laundry disinfectant) संपले होते. ते आणायचा होते. इतरही लहान-सहान गोष्टी आणायच्या होत्या म्हणून सकाळी-सकाळी अॅमेझॉनच्या दुकानात शिरलो. आत शिरताक्षणीच तेथील प्रतिनिधीने धडाधड माझ्या मागच्या खरेदी सूचीतल्या वस्तू समोर टाकायला सुरुवात केली. मी म्हटलं, “राजा थांब जरा. मला काय हवे ते मी पाहातो.” तर तो पुन्हा आतल्या दिशेन धावला बरीचशी माहितीपत्रके घेऊन परतला नि डिस्काउंट, एकावर-एक फ्री वगैरे स्कीम्सची माहिती देऊ लागला. मी म्हटलं, “मला फक्त लॉण्ड्री डिसइन्फेक्टन्ट हवा आहे. बाकी किरकोळ गोष्टी माझ्या मी घेईन.” “ओ: शोअर सर,” दोन्ही हात कमरेजवळ एकावर एक असे ठेवत तो अदबीने म्हणाला, कंबरेत किंचित झुकून त्याने एक पाऊल मागे घेतले नि धावत जाऊन (… पुढे वाचा »
रविवार, २८ एप्रिल, २०२४
अ.सं.सं. मध्ये मल्ल्यामहर्षी
-
(२०१६ मध्ये प्रथम विजय मल्ल्या यांच्या नंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी, नीतिन संदेसरा यांनीही आर्थिक गैरव्यवहाराच्या गुंत्यातून सुटण्यासाठी परदेशात पलायन केले. त्याच सुमारास भारतामध्ये झालेल्या नोटाबंदीच्या अनुषंगाने लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा थोडा विस्तार करुन लिहिलेली ही काल्पनिका.) --- नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार महान भारतीय अर्थशास्त्री विजय मल्ल्या ऊर्फ मल्ल्यामहर्षी यांनी युरपमधून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांकडे (अ.सं.सं.) गुपचूप गमन (१) केले. सुरक्षिततेच्या कारणास्तव ही बातमी तर गुप्त ठेवण्यात आलीच होती. अणुबॉम्ब निर्मितीच्या ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’च्या वेळी प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ नील्स बोर याला ज्या सफाईने अमेरिकेमध्ये नेण्यात आले होते, त्याच सफाईने हे ऑपरेशन पार पाडण्यात आले. प्रथम एका कार्गो विमानाने मल्ल्यामहर्षींना डलेस … पुढे वाचा »
Labels:
अर्थव्यवस्था,
जिज्ञासानंद,
मनोरंजन,
वक्रोक्ती
बुधवार, १७ एप्रिल, २०२४
गजरा मोहोब्बतवाला
-
सिंहगड रस्ता हा पुण्यातील काही प्रमुख रस्त्यांपैकी एक. पुण्याच्या दक्षिण भागाकडे जाणारा एकमेव मोठा नि म्हणून वर्दळीचा रस्ता. एका अस्मिताजीवी कोथरूडकर मैत्रिणीच्या मते ’ईं ऽऽऽऽ सिंहंगंडं रोंडं कांऽऽयं...’ असा प्रश्न विचारण्याजोगा असला, तरी रस्त्याचा आकार नि वर्दळीच्या गुणोत्तराच्या दृष्टीने पाहिले तर रस्त्यांमधला उच्चवर्गीय (उ.र.) . माझ्या घराकडे यायचे तर या मुख्य रस्त्यावरून एका चौकात आत वळावे लागते. याच्या आजूबाजूला मोठी वस्ती पसरल्याने मुख्य रस्त्याच्या इतका नाही पण अगदी गल्लीही नाही असा– मध्यमवर्गीय रस्ता (म. र.). या रस्त्यावरूनही आमच्या सहनिवासाकडे (सोसायटी) यायचे तर एका गल्लीत वळण घ्यावे लागते. ही गल्ली अर्थातच निम्नवर्गीय रस्ता (नि.र.), जेमतेम एक लेनइतकी रुंद. आता मी सांगणार आहे तो किस्सा या म.र.कडून आमच्या नि.र.च्या वळणार घडलेला … पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
अर्थव्यवस्था,
आकलन,
जिज्ञासानंद,
समाज
शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४
फेक-फेसबुक, फसवणूक आणि गुंतवणूक
-
गेल्या दोन वर्षांत भांडवल-बाजाराने दिलेला जोरदार परतावा पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलेले आहे. एरवी ‘शेअर बाजार म्हणजे सट्टेबाजी’ असे टोकाचे मत घेऊन जगणार्यांचे कुतूहलही जागे झाले आहे... साधारण पंधरा वर्षांपूर्वीच्या ‘बुल-रन’च्या वेळी निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा दिसू लागली आहे. तेव्हा जसे घडले त्याच धर्तीवर या लालसा असलेल्या अडाण्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी पाहून शिकार्यांची (scamsters) भूछत्रेही वेगाने उगवू लागली आहेत. याचे प्रतिबिंब सध्या फेसबुक, ट्विटरसारख्या समाज(?)-माध्यमांवर दिसू लागले आहे. फेसबुकवरील फीडमध्ये तर सध्या फक्त शेअर-टिप्स देणार्या विविध तथाकथित पोर्टल्सच्या जाहिरातीच दिसत आहेत. बहुतेक सार्या फसव्या (scam/fraud) . इमेजमध्ये एखाद्या प्रसिद्ध ‘इकनॉमिक टाईम्स’सारखे अर्थपत्र वा गुंतवणूक-माध्यम व्यावसायिकाचे नाव द… पुढे वाचा »
शनिवार, ४ जानेवारी, २०२०
‘आठवडी बाजारा’ची मुशाफिरी
-
( राज कुलकर्णी यांच्या ’आठवडी बाजार आणि समाजजीवन’ या पुस्तकासाठी लिहिलेली प्रस्तावना ) आपल्या देशातील शिक्षणक्रमातील इतिहासाच्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने राजकीय आणि प्राचीन इतिहासावर भर असतो. जगण्याशी निगडित असणाऱ्या जड वस्तूच्या, आयुधांच्या आणि माणसाच्या जीवनशैलीचा जो अतूट संबंध असतो, त्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसते. याचे कारण ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये त्या त्या काळचे शासनकर्ते, राज्ये, साम्राज्ये आदींचा सनावळीसह काटेकोर उल्लेख असला, आणि त्याच्या अनुषंगाने सांस्कृतिक इतिहासाची काही पानेही जोडलेली असली, तरी त्या काळी प्रचलित असणाऱ्या वस्तू आणि मनोरंजनादि पैलूंचा वेध घेणाऱ्या जड वस्तूच्या इतिहासाची, विकासाची प्रामुख्याने उपेक्षाच दिसते. क्वचित कुठे असली, तरी विद्यार्थीच काय अभ्यासकांपैकी बहुसंख्य व्यक्तीदेखील त्यांना फार महत्त्व देताना… पुढे वाचा »
Labels:
अर्थकारण,
अर्थव्यवस्था,
जिज्ञासानंद,
पुस्तक,
समाजजीवन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







