Vechit Marquee

सूची: अनुक्रमे ▶ वर्गीकरण ▶ लेखमाला ▶ लक्षवेधी ◼
भाष्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भाष्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?


  • वृद्धत्वाची जेथ प्रचिती... « मागील भाग --- मागील भागाच्या अखेरीस नेहरुंचा उल्लेख आला आहे, तोच धागा पकडून पुढे जाऊ. जिज्ञासा https://www.istockphoto.com/ येथून साभार. फेसबुकवर एके ठिकाणी कुरुंदकरांनी नेहरुंबाबत लिहिलेला एक उतारा पोस्ट केलेला होता. त्याखाली एका तरुणाने “लेखकाला टॅग करता येईल का? त्याच्या प्रोफाईलवर जाता येईल.” अशी कमेंट केलेली होती. समाजमाध्यमांवर बस्तान बसवून असलेल्या ट्रोलिंग मानसिकतेच्या कुणी एकाने त्याचा स्क्रीनशॉट पोस्ट म्हणून टाकला असता, त्यावर सुमारे शंभरेक जणांनी 'हा: हा:’ अशी प्रतिक्रिया दिलेली पाहिली. ( ‘नेहरु’ असा शब्द वाचूनच हा: हा: करणारे काही त्यात असतील. त्यांना वगळून ) इतक्या सार्‍यांना कुरुंदकर ठाऊक आहेत ही आनंदाचीच बाब आहे. कुरुंदकरांचे, त्यांच्या दृष्टिकोनाचे स्थान माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण असेच आहे. परंतु तरीही कुणाला तरी कुरुंदकर ठाऊक नाहीत याने माझी अस्मिता दुखावत नाही. विचारांना अस्मितेचे देव्हारे नसावेत अशा मताचा मी आहे. या प्रतिसादात हास्यास्पद काही आहे असे मला वाटत नाही. पोस...

    पुढे वाचा »

बुधवार, १८ जून, २०२५

वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १ : वृद्धत्वाची जेथ प्रचिती...


  • १. वार्धक्याची वाट प्रत्येक माणसाच्या प्रगतीचा आलेख हा दोन टोके धरून थोडे ताणलेल्या इंग्रजी ‘एस’ अक्षरासारखा असतो. लहानपणी परावलंबी काळात ती मंद असते, पौगंडावस्थेपासून ती वेगाने होते आणि एका टप्प्यानंतर, मध्यमवयानंतर तिचा वेग कमी होतो नि माणूस चढण सोडून सपाट रस्त्यावरुन आडव्या दिशेने पुढे सरकत जातो. वृद्धपणी भौतिक नि मानसिक पातळीवर एक स्थैर्यावस्था आलेली असते. पण तरीही भवतालामध्ये, जगण्याच्या बहुतेक पैलूंमध्ये बदल होतच असतात. ते स्वीकारण्यासाठी लागणारी स्वतंत्र बुद्धी आता वृद्धांकडे राहिलेली नसते. त्यांच्याकडची शारीरिक, बौद्धिक पुंजी ही त्यांच्या उदयकाळातील बदलांशी झगडण्यात खर्च झालेली असते. त्यामुळे आता होणारे बदल स्वीकारण्यासाठी गुंतवणूक करावी अशी ऊर्जा त्यांच्याकडे शिल्लक नसते. प्रगतीच्या नव्या वाटा जे बदल घडवून आणत असतात, त्यातून ‘त्यांचे जग’ म्हणता येईल अशी भौतिक, समाजिक, वैचारिक पातळीवरील त्यांची आकलनाची घडी विस्कटत असते. प्रवास करून एका निश्चित ठिकाणी पोहोचण्याची मानसिकता असलेल्या माणसाला, प्रगतीच्या वेगामुळे सतत प्रवासातच असल्...

    पुढे वाचा »

बुधवार, ११ जून, २०२५

काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता


  • (मागच्या पोस्टमध्ये ‘खाण्यावरती बोलू काही’ म्हणून जे बोलायचे ते बोलून घेतले. पण आता असे लक्षात आले की अजूनही थोडे बोलायचे राहिले आहे. एखादा पदार्थ आवडला की पोट भरल्यावरही भूक असल्याची भावना शिल्लक राहाते ना, तसे काहीसे. म्हणून ही खाद्यावरची दुसरी पोस्ट, वेगळ्या वाटेवरून जाणारी.) मराठी काव्यक्षेत्र हे निरंतर फळते-फुलते– काहींच्या मते फसफसते (म्हणजे द्रव कमी नि फेस जास्त) असे क्षेत्र आहे. माझ्या फेसबुक वास्तव्या-दरम्यान दररोज किमान दहा मराठी कवितांचे आगमन होते असा अनुभव आहे. पण अशा संपृक्त जगात जी विषमता दिसते, त्याने आमचे मन नेहेमी विषण्ण असते (१) . अगदी रांगोळी टिंबांच्या कहाण्या, हिमालयाची उशी करुन झोपण्याच्या वल्गना करणार्‍या किंवा कवितेची चूळ थुंकून जगाला भस्म करुन टाकू इच्छिणार्‍या महत्त्वाकांक्षा... वगैरे ‘हायर कविते’चे क्षेत्र तर सोडाच, पारंपरिक काव्यालंकारामध्येही मला ही विषमता चटकन दिसून येते. आता हेच पाहा ना. साधे उपमांचे क्षेत्र फुले, चंद्र, काटे, आदी केवळ दृश्य पैलूंमध्ये बंदिस्त आहे, याचा आम्हाला नेहमी विषाद वाटत आला आहे. माणसाला पंचेंद्रिये असतात (आणि तरीही १४५ कोटी...

    पुढे वाचा »

शुक्रवार, २३ मे, २०२५

सुजन गवसला जो


  • ‘गाणार्‍याला आधी गाणारं एक मन असावं लागतं, तरच गाणं संभवतं’ असं पुलंनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे एखादा काका/आजोबा किंवा मावशी/ताई (मी आजी म्हटलेले नाही, प्लीज नोट) मध्ये आपल्याप्रमाणे मूलपण दिसत असेल, तर बहुधा मुलांना परकाही आपला वाटत असावा. परक्याकडे मूल सहजपणे जाणं हे त्या परक्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलचे एक महत्त्वाचे स्टेटमेंट आहे असे मला वाटते. त्याबाबत मी सुदैवी आहे. बच्चे कंपनीचे नि माझे छान जमत असे. एखाद्या पिल्लाला ‘चल ये’ म्हटले नि ते माझ्याकडे आले नाही असे क्वचितच घडत असे. बहुधा माझ्यातही त्यांना त्यांचे प्रतिबिंब दिसत असावे. ‘असे’ आता म्हणावे लागते, कारण आता मी बराचसा एकांतवादी झाल्याने मोठ्यांचाच फारसा संपर्क येत नाही, नि त्यामुळे मुलांचाही. मध्यंतरी काही काळ मी मॉर्निंग वॉकला बाहेर पडे, तेव्हा नेमके एक पिलू आई/मम्मा किंवा बाबा/पप्पा यांच्या खांद्यावर बसून आपल्या दादाला शाळेच्या बसमध्ये बसवून देण्यासाठी आलेले दिसे. जाताजाता मुद्दाम मान तिरकी करुन त्याच्याकडे बघून अभिवादन केले, शिटी वाजवली, की बोळकंभर हसून प्रतिसाद देई. मग आप...

    पुढे वाचा »

रविवार, १८ मे, २०२५

बाबेलचा दुसरा मनोरा


  • फार फार... फार्फारच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा वर्षाला वर्षही म्हणत नसावेत. तेव्हाची भाषाच वेगळी होती. पृथ्वीवर मोजकीच मनुष्यजात वावरत होती. सारे गुण्यागोविंदाने राहात होते, एकच भाषा बोलत होते. ही जमात अर्थातच भूस्थिर, नागर नव्हती. अन्नापाठी फिरत फिरत ते आजच्या इराकमधील भूभागात पोहोचले. खाणं, जुगणं नि क्वचित यांच्यासाठी लढणं या पलिकडचा विचार करणार्‍या त्यांच्यातील काही सुज्ञांनी नुकताच विटेची यशस्वी चाचणी घेतली होती. तिचा वापर करुन आपण पक्क्या गुहा बांधू शकतो असा त्यांचा दावा होता. The Tower of Babel. पण त्यांचा नेता महत्त्वाकांक्षी होता. त्याला केवळ घर बांधायची नव्हती, त्याला महासत्तेची द्वाही फिरवायची होती. त्याने केवळ जमिनीवरची नव्हे तर एकावर एक अशी चळत स्वरूपात घरे बांधून एक मनोरासदृश शहरच बांधून काढण्याची योजना आखली. हा मनोरा थेट देवलोकापर्यंत चढवत नेऊन त्यांनाही आव्हान देण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली. एक भाषा बोलणारे, एकदिलाने राहणारे असल्याने सारा समाज त्याच्या पाठीशी उभा राहिला. परस्पर सहकार्याने हे काम वेगाने होऊ ...

    पुढे वाचा »

शनिवार, २६ एप्रिल, २०२५

To Dumbo, with Love


  • फेसबुक नि त्यासारखी समाजमाध्यमे ही बव्हंशी पेंढा भरलेल्या बुजगावण्यांना आधार देऊन उभी करणारी काठी असते. नसलेल्या गुणांची जाहिरात करुन आपल्याला अपेक्षित अशी आपली ओळख वा व्यक्तिमत्त्व कृत्रिमरित्या उभे करण्यास साहाय्यभूत होणारे हे मंच. पण क्वचित हरवलेल्या संवाद नि संवेदनांच्या अभिव्यक्तीसाठी काही सुज्ञ मंडळी याचा वापर करतात तेव्हा सुखद धक्का बसतो. खाली दिलेली पोस्ट हा असाच एक सुखद धक्का होता. When Do We Lose Our Compassion? I was thinking about Dumbo the other day—the scene where they lock up Dumbo’s mom, calling her a “mad” animal just because she wanted to protect her baby. They tore them apart, and little Dumbo just wanted his mother. I remember how much that scene hurt as a child. I felt it. I knew it was wrong. But then I started wondering… at what point do we stop feeling so deeply? As kids, we see suffering, and we care. We don’t ask whether it’s “just the way things are” or whether someone des...

    पुढे वाचा »

बुधवार, १६ एप्रिल, २०२५

स्वप्नात पाहिले जे...


  • ‘स्वप्नं सत्यात उतरतात; पण ती उतरवावीही लागतात.’ राहीनं हे कुठं तरी वाचलं. कुठल्याशा प्रसिद्ध पुस्तकातलं वाक्य. ती विचारात पडली. त्यातून बुद्धिमत्ता असली की माणसाला प्रश्न पडतात; नसली की मग बरं असतं. ताप नाही- नि:स्वप्न निद्रा येते. इथं तसं नाही. आपण विचार करतो. प्रश्न विचारतो, स्वत:ला. आपल्याला स्वप्नं पडतात. मेंदूतल्या पेशी कशा ताणल्या जातात, एखाद्या तंबोर्‍याच्या तारेसारख्या- त्यावेळेस, स्वप्न पडत असताना. (म्हणजे हेही जाणवतं.) अंतस्थ रंग निळा-जांभळा असतो, मेंदूच्या आतल्या आत. मग ताणलेल्या पेशीपेशींमधून ते स्फुरतं- स्वप्न. एखादं गाणं स्फुरावं तसं. सहज आणि दु:खमय, अस्वस्थ. मग पडतं ते स्वप्नं वारंवार. एकच एक: आपण अथांग पोकळीत हरवून गेलो आहोत. पोकळीला अंत नाही, आरंभही नाही. म्हणजे पोकळीच कॅव्हिटी. आणि शोधतो आहोत काही तरी चाचपडत- तणावग्रस्त होऊन. काय शोधतो आहोत ते माहीत असेलच, म्हणजे स्वप्नात. म्हणून काय शोधायचं आहे हा प्रश्न काही आपण विचारत नाही स्वत:ला- स्वप्नात. म्हणजे दॅट इज नोन! नोन ऑलरेडी! मग जागं झाल्यावर स्वत:ला कसं विसरायचं, की काय माहीत आहे म्हणून? कारण त्यावेळेस स्वप्न स...

    पुढे वाचा »

गुरुवार, ६ जून, २०२४

आपले राष्ट्रीय खेळ


  • आयपीएल आणि निवडणुका हे आपले राष्ट्रीय खेळ आहेत... ! दोन्हीं प्रकारामध्ये नवा सीझन आला की ‘मोसम’ पाहून खेळाडू संघ बदलतात किंवा नवे मालकच त्यांना विकत घेतात. मालकांना आवडला नाही तर ते सीझन चालू असताना मध्येच कॅप्टन बदलतात. दोन्हींमध्ये गोलंदाज एकामागून एक चेंडू फेकत राहतात, फलंदाज ते मारत राहातात आणि ‘कमेंट्री बॉक्स’पासून (यात ‘X’-बॉक्सपण आला!) समाजमाध्यमांवरचे काही हजार, काही लाख लोक तो पकडायला धावाधाव करत असतात. प्रत्येक सामन्यातील एक डाव दिवसा नि एक रात्री खेळला जातो... क्वचित पहाटेसुद्धा! प्रत्येक सामन्यापूर्वी ‘प्रतिस्पर्धी कोण आहे’ याबरोबरच मैदानावरील ‘खेळपट्टी’ आणि ‘बाजूच्या हिरवळीची स्थिती’ आदि परिस्थितीजन्य घटकांचा विचार करून टीम निवडली जाते. चेन्नईमध्ये फिरकी गोलंदाजांना प्राधान्य असते, तर अहमदाबादमध्ये वेगवान गोलंदाजांची चलती असते. खेळ पाहण्यास बसलेल्या प्रेक्षकांना इच्छा नसूनही, समोरील जाहिरातींमध्ये काही तथ्य नाही हे ठाऊक असूनही, त्या पाहाव्याच लागतात. समोरची प्रसिद्ध व्यक्ती जे ग्यान देते ते निमूट ऐकून घ्यावेच लागते. पैसे खर्चणारे, एक टीम निवडून तिला प्रोत्स...

    पुढे वाचा »

रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

दूध देणारे ईव्हीएम आणि बेकन खाणारा मित्र


  • आज सकाळी फिरुन येताना एक परिचित काका भेटले. हे काका वयानं नसले तरी मनाने अजूनही ‘सालं ब्रिटिशांचं राज्य बरं होतं. आपल्या लोकांच्या पाठीवर हंटरच हवा.’च्या वयाचे. काकांच्या हातात दांडी असलेली स्टीलची बरणी होती. माझं ‘राम राम’ त्यांचा ‘जय श्रीराम’ झाल्यावर मी औपचारिकपणे विचारलं, “फिरायला का?” “नाही...” काका छाती एक से.मी. पुढे काढून म्हणाले– जणू ‘सकाळी फिरायला जाणे हे मेकॉलेच्या शिक्षणातून आलेले खूळ आहे’ हे वाक्य न बोलता माझ्या तोंडावर फेकत आहेत. “... दूध आणायला आलो होतो.” हातातील बरणी उंचावत ते म्हणाले. “काय काका, पिशव्यांमध्ये घरपोच दूध येत असताना हा आटापिटा कशाला?” मी कळ काढली नि काका ‘हर हर महादेव...’ म्हणत माझ्यावर तुटून पडले. संतापाच्या भरात ‘जऽऽऽऽऽऽय श्रीऽराऽऽऽम.’ ही नवी रणघोषणा असल्याचा फतवा ते विसरले. https://onlineresize.club/ येथून साभार. पाश्चरायजेशनने दुधातील सकस तत्त्वे कशी जातात, पाश्चात्त्यांचे हे खूळ आपण स्वीकारल्याने भारतीय तरूण कसे शारीरिकदृष्ट्या दुर्बल होत चालले आहेत वगैरे नेहमीचे दळलेले मु...

    पुढे वाचा »

गुरुवार, ६ एप्रिल, २०२३

भाषा: राष्ट्र... आणि हत्यार!


  • (प्रसिद्ध उर्दू शायर नि कवी जावेद अख़्तर यांनी २०१५ मध्ये ‘जश्न-ए-रेख़्ता' या वार्षिक ऊर्दू संमेलनामध्ये केलेल्या भाष्याचा व्हिडिओ यापूर्वी ‘वेचित चाललो...’ वर शेअर केला होता. त्या अनुषंगाने भाषा, राष्ट्र ही संकल्पना आणि तदनुषंगिक विद्वेषाचे राजकारण यावर काही भाष्य केले होते. अख़्तर यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांना खडे बोल सुनावल्याच्या पार्श्वभूमीवर त्या लेखातील बहुसंख्य मुद्दे घेऊन ‘तत्रैव’ नियतकालिकाच्या जाने-फेब्रु २०२३ च्या अंकासाठी लिहिलेला लेख.) पु. ल. देशपांडे यांनी एका दंगलीच्या काळातील एक गंमतीशीर किस्सा सांगितला आहे. त्या काळात संघाचे स्वयंसेवक गस्त वगैरे घालत असत. एकदा पुलं नि त्यांचे काही मित्र रात्री उशीरा घरी परतत असताना एका अंधाऱ्या बोळातून आवाज आला, ‘थांबा. कोण आहे, मित्र की शत्रू?’ पुलंनी खोडसाळपणे उत्तर दिले, ‘शत्रू!’ काही क्षण शांतता होती. मग आवाज आला, ‘जा.' किस्सा गंमतीचा असला तरी त्यातून आपली मानसिकता दिसते. समोरून आलेली व्यक्ती ही आपली मित्र असू शकते किंवा शत्रू. याच्या अधले-मधले काही संभवतच नाही, असा बहुसंख्...

    पुढे वाचा »